Tuesday, 3 April 2018

अजित दादानी घेतला मोठ्ठा पंगा- शिवसेनेला म्हटले "गांडूळानची अवलाद"

शिवसेना ही गांडुळाची अवलाद
अजित पवार यांची टिका

कोल्हापूर :  भाजपसोबत सत्तेत बसायचं, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता द्यायची आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा असे सांगत अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे. त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही तशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याची घणाघाती टिका माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नेसरी येथे हल्लाबोल यात्रेच्या जाहीर सभेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नेसरी येथील जाहीर सभेने झाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सभेलाही अलोट गर्दी लोट होती. या सभेत अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर जोरदार टिका केली. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये साडे तीन वर्ष खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपला साथ देणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.साडे तीन वर्ष भाजप आणि शिवसेना यांचा भोंगळ कारभार सुरु आहे. भाजप आणि शिवसेना ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेनेला शेतीतलं काय कळतं.या शिवसेनेचे नेते मुंबईत राहतात.त्यांच्या नेत्यांची एक गुंठेही शेती नाही त्यांना शेती काय कळणार अशी खरमरीत टिका पवार यांनी केली.
हे सरकार शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे असते तर हे सरकार शेतकऱ्यांसोबत असे वागले नसते.या सरकारची इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघू शकतो परंतु या सरकारची काही करण्याची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप त्यांनी केला.लोकसभा-विधानसभा काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून द्या.नाही तुमचे प्रश्न सोडवले तर पवारांची अवलाद सांगणार नाही अशी इच्छाशक्ती पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांची टिका

(मुम्बई नगरी या संकेत स्थळाच्या हवाल्याने बातमी)

Friday, 23 March 2018

अध्यक्षांविरोधातील विरोधकांचा अविश्वास ठराव अजूनही कायमच.-RKVK

भ्रष्टाचार व कायदा सुव्यवस्थेवरची चर्चा टाळण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी पळ काढला ! विखे पाटील यांचा आरोप

अध्यक्षांविरोधातील विरोधकांचा अविश्वास ठराव अजूनही कायमच.

मुंबई, दि. २३ मार्च २०१८

सत्ताधारी पक्षानेच सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची नवीन प्रथा सुरु करुन, स्वतःचे अपयश झाकण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेवर कोणतीही चर्चा सभागृहात सरकारला होऊ द्यायची नसल्यामुळेच सत्ताधारी पक्षांनी सभागृह बंद पाडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेला अविश्वास ठराव चर्चेला न आणता सत्ताधारी पक्षाने आज विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडून गोंधळात तो संमत करुन घेतला. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी सरकारच्या या कृतीवर कडक शब्दात टीका करुन सरकारनेच संसदीय परंपरा आणि प्रथांना काळीमा फासला असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाची चर्चेची तयारी असतानाही सरकार पक्षाने सभागृहातून पळ काढणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्याचाच प्रकार आहे. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

     सभागृहात घडलेल्या घडामोडींची माहिती देताना विखे पाटील म्हणाले की,५ मार्चला आम्ही अध्यक्षांविरोधात आम्ही अविश्वास ठराव दाखल केला.१४ दिवसांच्या मुदतीमध्ये हा ठराव सभागृहाच्या कामकाजपत्रिकेवर येणे अपेक्षित होते. याबाबत सभागृहात दोनवेळा आम्ही मागणी करुनही हा अविश्वास ठराव कामकाज पत्रिकेवर येऊ दिला नाहीच उलट अधिकार नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच आम्ही योग्यवेळी मांडू असे सांगितले होते. मात्र आज मुख्यमंत्र्यांनीच कार्यक्रम पत्रिकेवर कोणताही उल्लेख नसताना विश्वास ठराव मांडून तो काही अवधीत संमत करुन घेतला यासाठी त्यांनी २००६ सालचा संदर्भ दिला पण विरोधक चर्चा करायला तयार असतानाही सत्तारुढ पक्षानेच सभागृहात गोंधळ घातला. तुमच्याकडे जर बहुमत होते तर मग सभागृहातून पळ का काढला ? असा सवालही विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला.

     सभागृहातील प्रथा आणि परंपरांना काळीमा फासण्याचा हा प्रकार दुर्दैवी असून सभागृहातील कामकाजही सत्ताधारी पक्षांनी आज उरकून घेतले. वास्तविक विरोधी पक्षाचा २९३ च्या ठरावाची चर्चा सभागृहात सुरु होती. कायदा, सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराबाबतची चर्चा सरकारला होऊच द्यायची नव्हती यामुळेच सभागृहातील कामकाज सत्ताधारी पक्षानी जाणीवपूर्वक बंद पाडले असले तरी अद्यक्षांविरोधात आम्ही दाखल केलेला अविश्वास ठराव अजूनही कायम असून सोमवारी हा ठराव कार्यक्रम पत्रिकेवर घ्यावा अशी मागणी विधानसभा सचिवांकडे आम्ही केली असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.

फ़ौजदारांची क्रूर चेष्टा

''फौजदार साहेब" या शब्दामधेच या पदाचा मां आणि दरारा लक्षात येतो.सीनियर हवलदार पदपासुन पद'उन्नत' झालेल्या राज्यातील हजारो फ़ौजदारांची पद'अवनति' झाल्याने ते पुनः हवलदार दादा झाले आहेत.या संदर्भात काही 'पीड़ित' अधिकार्यान्शी संपर्क साधला असता त्यांनी , ''नाव न सांगन्याच्या अटिवर" प्रतिक्रिया दिली की "ही तर क्रुरचेष्टा होय".

Wednesday, 7 March 2018

महाराष्ट्राच्या महिला खासदार

जागतिक महिला दिन :

(महाराष्ट्र परिचय केंद्र च्या सहकार्याने* )

*गेल्या ६६ वर्षात संसदेत ८१८ महिला खासदार*

*नवी दिल्ली दि ७* भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत गेल्या ६६ वर्षात ८१८ महिला खासदार निवडून आल्या आहेत, यामध्ये लोकसभेच्या ६३२ तर राज्यसभेच्या १८६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेत गेल्या ६६ वर्षात २१ महिला खासदारांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे.

सन १९५२ पासून आजतागायत देशात १० हजार ९७० खासदार निवडले गेले आहेत, यामध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांची संख्या ही ८८५५ इतकी आहे तर  २११५ खासदार राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

*महाराष्ट्रातून ४६ महिला खासदार लोकसभेत*

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते आजपर्यंत महाराष्ट्रातून ६८७ खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत, यामध्ये ४६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेवर आजतागायत निवडल्या गेलेल्या २११५ खासदारांपैकी महाराष्ट्रातून १५१ खासदार निवडले गेले, यामध्ये महाराष्ट्रातील १४ महिला खासदारांचा समावेश आहे.

*आजपर्यंत २१ महिला खासदार नामनिर्देशित*

राष्ट्रपतींनी आजपर्यंत देशातील १३३ खासदारांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले ,यामध्ये २१ महिला खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून आजपर्यंत ७ महिलांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे.

*सोळाव्या लोकसभेत सर्वाधिक ६५ महिला खासदार*

सध्याच्या १६ व्या लोकसभेत सर्वाधिक ६५ महिला खासदारांची नोंद झाली आहे, यामध्ये महाराष्ट्रातील ६ महिला खासदारांचा समावेश आहे. पंधराव्या लोकसभेतील एकूण ५६० खासदारांपैकी ६४ महिला खासदार होत्या. पहिल्या लोकसभेत ५४३ खासदार होते,यामध्ये २४ महिला खासदार होत्या. दुसऱ्या लोकसभेतही २४ महिला खासदारांचा समावेश होता.

*उत्तर प्रदेशातून सर्वाधिक १२१ महिला खासदार*

पहिल्या लोकसभेपासून ते आजपर्यंत उत्तर प्रदेश या राज्याने १३९४ खासदार लोकसभेवर निवडून दिले ,यामध्ये  १२१ महिला खासदारांचा समावेश आहे. पश्चिम बंगालने ६५, मध्यप्रदेश- ६२, बिहार- ५९, महाराष्ट्र- ४६, आंध्रप्रदेश- ४५, राजस्थान- ३०, गुजरात -२७, पंजाब- २४ ,तामिळनाडू- २३,ओडिशा- १६,  कर्नाटक १५, आसाम - १५, तर दिल्लीतून १३ महिला खासदार आजपर्यंत लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

*नजमा हेपतुल्ला ६ वेळा राज्यसभेवर*

राज्यसभेवर सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदारांमध्ये श्रीमती नजमा हेपतुल्ला या ६ वेळा राज्यसभेवर निवडून आल्या आहेत, यापैकी त्या चार वेळा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. याबरोबरच श्रीमती अंबिका सोनी ( ५ वेळ), श्रीमती जया बच्चन (३ वेळ), श्रीमती रेणुका चौधरी ( ३ वेळ) श्रीमती झरणा दास, श्रीमती काझीमोनी, श्रीमती निर्मला सीतारामन, श्रीमती वानसुक,श्रीमती विप्लव्वा ठाकूर ( २ वेळ) यांचा समावेश आहे.

Hi