Saturday, 13 November 2021
मुख्यमंत्री ठाकरे की सेहत के लिए नियाजे पाक--अजमेर दौरा..
Friday, 27 August 2021
शिवसेना आंदोलना मूळे ,भाजपा कार्यालय शुद्धीकरण
Tuesday, 24 August 2021
कोरोना काळातही जैन इरिगेशन ने दिला रोजगार..
कोरोनाकाळातही जैन इरिगेशनने
नवीन १०६० जणांना दिली कायमस्वरूपी नोकरीची संधी
जळगाव दि. २४ प्रतिनिधी - दोन वर्षाच्या कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी वेळोवेळी पूर्णतः लॉकडाऊन आणि काही वेळा निर्बंध घातल्याचा प्रतिकूल परिणाम उद्योग-व्यवसाय-व्यापारावर झाला. बहुतांश उद्योगांमध्ये कामगार यांना दीर्घ सुटी देण्यात आली किंवा कामगार कपात करावी लागली तर काहींनी वेतन कपात केली. अशाही स्थितीत जळगावमधील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. मध्ये असे काहि न करता विविध कामांसाठी पदांवर नव्याने १०६० जणांना कायमस्वरूपी नोकरीची संधी देऊन सामावुन घेतले आहे.
जैन इरिगेशन आणि संलग्न उत्पादक कंपन्यांवर सध्या वित्त पुरवठा विस्कळीत झाल्याचे संकट आहे. तरीही सामाजिक बांधिलकी ठेऊन नियमित सहकारी (कामगार) शिवाय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. सध्या जैन इरिगेशनच्या जळगाव स्थित आस्थापनामधे ६२५० कायमस्वरूपी सहकारी आहेत याशिवाय सरासरी २५०० ते ४५०० कंत्राटी कामगार गरजेनुसार सेवा पुरवित आहे.
मार्च २०२० पासून भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला. जुलै २०२० पासून विषाणूच्या संसर्गाने बाधित रूग्ण संख्या सप्टेंबरपर्यंत लाखांच्यावर पोहचली. केंद्र सरकारने सलग तीन वेळा लॉकडाऊन वाढवले. त्यामुळे उद्योगातील उत्पादन निर्मिती थांबली. कच्चामाल पुरवठा थांबला. जे उत्पादन तयार होते ते पोहचवले जात नव्हते. अशा स्थितीत आर्थिक अडचणी अजून वाढल्या. हे सर्व अनुभवाला येत असतानासुद्धा जैन इरिगेशनच्या व्यवस्थापनाने महामारी व लॉकडाऊन काळात नियमित कामगाराचा रोजगार कमी करायचा नाही असा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला.
खाजगी संस्थाना लस विकत घेण्याची परवानगी मिळालेनंतर जैन इरिगेशनने कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करून सर्व सहकाऱ्यांना टोचणी करून घेतली. या लसीकरणाचा लाभ ४६०० कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याशिवाय कामावर येणाऱ्या सर्व सहकारी-कामगारांची लसीकरणाची व्यवस्था करून या सहकाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व तपासणी करण्यासाठी १० डॉक्टर तसेच १७ वैद्यकीय सहाय्यकांचे पथक रोज कार्यरत होते व आहे. जैन इरिगेशन व्यवस्थापनाने वेळोवेळी सहकारी-कामगारांशी परिपत्रकांद्वारे संपर्क करून कोरोनाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, आजारपणात घ्यायची काळजी, आजार बरा झाल्यानंतर पश्चात घ्यायची काळजी याविषयी कामगार व त्यांच्या कुटुंबात जागृती केली आणि करीत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपर्कातून होतो हे लक्षात घेऊन उत्पादन निर्मिती पाळ्यांमध्ये अर्धा तासाचे अंतर वाढविले. या काळात योग्य पद्धतीने कामाची जागा सॅनिटायझर केली. या शिवाय कामगारांमधील अंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार राखले. कंपनीच्या आवारात जेवणाची व्यवस्था बदलली. बंदिस्त जागेतून खुल्याजागेत योग्य अंतरावर बसायची व्यवस्था केली आहे. काही कामगारांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आली. बाहेरगावाहून कंपनीत कामावर येणाऱ्यांसाठी आरोग्याची माहिती देणारे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होते. रोज कामावर येणार्या सहकार्यांची प्रवेशद्वारावर ऑक्सिमीटर व थर्मामीटरने वेळोवेळी तपासणी केली जाते. तेथे साबणाने हात धुवून सॅनिटायझर फवारणीची व्यवस्था केली आहे.
कामगारांसाठी विशेष योजना
लॉकडाऊन काळात काही कामगारांचे येणे-जाणे सुरक्षित व्हावे यासाठी व्यक्तिगत दुचाकी वाहन खरेदी योजनेत कंपनीकडून ६० टक्के उचल दिली गेली. त्यात १४४ महिला तसेच २५५ पुरूष अशा एकूण ३९९ कामगारांनी लाभ घेतला. कंपनीमध्ये कोरोनाच्या तपासणी शिबिर घेऊन ५३६७ सहकारी-कामगारांची ॲन्टीजन टेस्ट करून घेतली. एवढी काळजी घेऊनही जे कामगार कोरोना संसर्गामुळे आजारी झाले त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी खास पथक आहे. या पथकाचे नियंत्रण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्याकडे आहे. या पथकाने वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्ला-मसलत केली. कामगारांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. संसर्ग बाधित कामगाराला दवाखान्यात बेड-गरजेनुसार ऑक्सिजन, इतर उपकरणे उपलब्ध करून दिली यासह रूग्ण कामगार व कुटुंबाची भोजन व्यवस्था केली.
कामगारांच्या वारसांना रोजगार व शिष्यवृत्ती
कोरोना प्रकोपाच्या काळात योग्य काळजी घेऊनही दुर्दैवाने जैन उद्योग समुहातील काहि सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्या कामगारांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत दिली गेली या सह त्या कामगारांच्या वारसाला त्याच्या शिक्षण व गुणवत्तेनुसार कायम स्वरुपाचा रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण घेत असलेल्या पाल्याच्या मूलभूत शिक्षणाचा खर्चही कंपनी उचलणार आहे. काही कामगाराचे पाल्य, पत्नी हे कामावर रुजू ही झालेले आहेत.
कोट...
करोना काळात सर्वच उद्योगांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले याही परीस्थितीत जैन इरिगेशनने कामगार कपाती याऐवजी नव्याने १०६० लोकांना कायमस्वरूपी सामावून घेतले यासह त्यांचा सुरक्षिततेसाठी संपूर्ण लसिकरण, दुचाकी वाहन योजना, आरोग्याची पुरेपुर काळजी घेत असल्याने कंपनी आपले उत्पादन नियमीत सुरू ठेऊ शकत आहे.
- अतुल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमीटेड
Monday, 23 August 2021
जवान गोपालच्या कुटुंबाचे पालकमंत्रीनी केले सांत्व
*दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका सुरु* जळगाव, (जिमाका) दि. 23 - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच 19-सीपी-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 25 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावेत. या अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनादेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा. शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.00000
Thursday, 12 August 2021
मोहर्र्म के बारे मे कलेक्टर महोदय के निर्देश
Wednesday, 4 August 2021
वाहन लिलाव-11 आगस्ट रोजी
Tuesday, 3 August 2021
'भंगार' प्रेमीं साठी 'सुवर्णसंधी
Thursday, 29 July 2021
ऑनलाइन मेडिसिन चे धाबे दणाणले,FDA चा दणका...
मुंबई, दि. 29 : गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit (MTP) KIT) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तपासणीकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रशासनाने एकूण 34 ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी केली.
त्यानुसार अॅमेझॉन या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदविली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी दोन वेळा अॅमेझॉनवर स्वीकारून त्याची गुरुनानक इंटरप्राइजेस, लखनऊ, उत्तर प्रदेश व चौधरी फार्मास्युटिकल्स /पिरामल लि., कोरापूर, ओरिसा या संस्थेकडून औषधे पुरविण्यात आले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय MTP kit औषधाची ऑनलाईन विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन आहे. प्रशासनाने अॅमेझॉन व संबंधित वितरक यांना यासंदर्भात नोटीस बजावली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची मागणी नोंदविली असता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दोनवेळा औषधाची मागणी स्वीकारण्यात आली व ते पुरविण्यात येणार असल्याचे देखील संकेतस्थळावरुन एसएमएस संदेशद्वारे कळविण्यात आले. वास्तविक गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांची डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस होकार दर्शविणे, हे देखिल कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याने फ्लिपकार्ट या कंपनीस नोटीस बजाविण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
नुकतेच पुणे येथे अॅमेझॉन या संकेतस्थळावरुन MTP Kit ची विक्री पुण्यातील औषध विक्रेत्यास केल्याने औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तकार दाखल केली होती. या तक्रारी अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करुन यामध्ये सामील असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे प्रत्यक्ष जावून चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुध्द पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
Tuesday, 27 July 2021
गंज खाललेला गावठी कट्टा जप्त,LCB चे मोठे यश,धाडशी कारवाई
सालार नगर मेहरून अंडरपास चे काय झाले?
Tuesday, 13 July 2021
नगररचना विभागातील अधिकारीवर आक्षेप,गंभिर आरोप
*जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक श्री. आर. एम. पाटिल यांच्या नियुक्तीला अमोल कोल्हेंचा आक्षेप नियुक्तीच्या चौकशीची केली मागणी*
जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक या पदावर श्री. आर. एम. पाटिल यांची नुकतीच नियक्ती / नेमणुक करण्यात आलेली आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी श्री. आर. एम. पाटिल हे जळगाव येथे नगररचनाकार पदावर कार्यरत असतांना त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरलेली होती . नागरिकांशी तुसडेपणाने वागणे , अत्यंत भ्रष्ट हेतूने प्रकरणांमध्ये त्रुटी काढणे , कामात टाळाटाळ व दिरंगाई करणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध होत्या . तसेच यापूर्वी असलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या विषयी गंभीर आरोप झालेले असुन चौकशी सुरू आहे .
तरीही अशा परिस्थितीत त्यांना जळगाव जिल्ह्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना जळगाव महानगरपालिका नगररचनाकार या पदाचा देखील चार्ज देण्यात आलेला आहे . पदाधिकाऱ्यांकडुन वारंवार नगरविकास विभागास या बाबींची जाणीव करून दिलेली असतांना सुध्दा नगरविकास विभागातील अधिकारी हे अशा प्रकारच्या भ्रष्ट आरोप असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक जळगाव शहरात करून काय साध्य करू ईच्छितात यामागे निश्चितच काही काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही .
अधिक माहिती घेतली असता असे कळले की , श्री. आर. एम. पाटिल यांनी जळगाव शहरातील एका वादग्रस्त बिल्डर कडुन बराच मोठा खर्च नगरविकास विभागात करून तसेच महसूल विभागातील कार्यरत एका अधिकाऱ्याची स्वतःला जळगाव जिल्ह्याच नव्हे तर जळगाव महापालिकेत नियुक्त करून घेतले आहे .
जळगाव नगररचना विभाग बि. जे. मार्केट येथे कार्यरत झाल्याबरोबर श्री. आर. एम. पाटिल ( सहाय्यक संचालक नगररचना ) यांचे नागरिकांशी फटकळ बोलणे, विशिष्ट मग्रूरीत राहणे या स्वभावाचा प्रत्यंतर येत आहे .
तरी जळगाव येथे श्री. आर. एम. पाटिल यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी करण्यात यावी असे जनहीतार्थ निवेदन छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी नगरविकास मंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे यांना दिलेले असुन त्याची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव , मा.प्रधान सचिव , ( न.वि. 1 ) नगरविकास विभाग , मुंबई , महाराष्ट्र ., मा. संचालक , नगररचना विभाग , पुणे ,महाराष्ट्र . यांना पाठवली आहे .
Thursday, 8 July 2021
'*लर्निंग लायसन्स' संदर्भात ऑनलाइन अडचण असल्यास RTO विभागाला संपर्क साधन्याचे आवाहन*
बक़रीद के बारे में कलेक्टर के निर्देश
Friday, 2 July 2021
जैन इरिगेशन ची उत्तुंग भरारी
जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निकाल जाहीर
जळगाव, 1 जुलै (प्रतिनिधी):- चौथ्या तिमाहीतील (Q4) जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 19.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली. जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या आणि भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ने काल घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजूरी देऊन जाहीर केले.
ठळक वैशिष्ट्येः
चौथ्या तिमाहीतील जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 19.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
2021 या आर्थिक वर्षात एकत्रित उत्पन्न 5666.9 कोटी रूपयांवर पोहोचले आणि एकल उत्पन्न 2156.4 कोटी रूपये नोंदवले.
एकत्रित कर, व्याज व घसारापूर्व नफ्याचा मार्जिन चौथ्या तिमाहीत1 टक्क्यांवरून 11 टक्के इतका वाढला आणि आर्थिक वर्ष 2021चा 21 5टक्क्यांपासून 8टक्क्यांपर्यंत वाढला.
FY21 चा एकत्रित करव्याजघसारापूर्व नफा 468 कोटी नोंदला गेला आणि एकल करव्याजघसारापूर्व नफा 165.2 कोटी रूपयांवर पोहेचला.
चौथ्या तिमाहीतील एकत्रित करपश्चात नफा 63.9 कोटी रूपये झाला आणि एकल करपश्चात तोटा 22.2 कोटी रूपये होता.
आर्थिक वर्ष 2021 चा एकत्रित करपश्चात तोटा 368.7 कोटीवर पोहेचला आणि एकल करपश्चात तोटा 307.32 कोटी रूपये झाला.
जागतिक मागणी पुस्तकात 4190 कोटी रूपयांच्या ऑर्डर्स आहेत.
कोट
“आम्हाला कंपनीचे चौथ्या तिमाहीचे (Q4) आणि 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात (FY21) आर्थिक निकाल जाहीर करतांना अतिशय आनंद होत आहे. याआधील तिमाहींपेक्षा चौथ्या तिमाहीत कामकाजाचा स्तर जास्त होता. याचे मुख्य कारण म्हणजे कोविडची लाट सौम्य झालेली होती. चौथ्या तिमाहीत (Q4) एकत्रित1उत्पन्नात 93 टक्के वाढ झाली आणि एकल उत्पन्नात 8 टक्के वाढ नोंदवली. नफ्याच्या बाबतीत दोन्ही एकल आणि एकत्रित आर्थिक निकालात सकारात्मक बदल झालेला आहे. निरंतर प्रयत्नांमुळे आणि व्यवस्थापनाचे लक्ष अंतर्गत आणि बहिर्गत आव्हानांना सामोरे जातांना कंपनीचे काम सुधारण्यावर केंद्रीत केले. त्याचा हा परिणाम आहे.
कंपनीतून पूर्ण 2021 आर्थिक वर्षात 525 कोटी रूपयांची निर्यात केली. त्यामुळे कंपनीचे उत्पन्नाचे स्त्रोत भक्कम आहे. कंपनीच्या उत्पादनांना भारतात आणि जगात खूप मागणी आहे कारण कृषीक्षेत्रात चांगली वाढ याही वर्षी होईल. एकल कामकाजातील खेळत्या भांडवलाची कार्यक्षमता 10 टक्क्यांनी वाढली. तसेच कंपनीचे एकत्रित निव्वळ कर्ज 416 कोटी रूपयांनी घटले आहे.
कंपनीच्या कर्ज निराकरणाच्या बाबतीत सातत्याने प्रगती झाली आहे. ग्रुपमधील कंपन्यांच्या कर्ज निराकरणातही खूप प्रगती झालेली आहे. सध्याच्या योजनांनुसार आम्ही सगळ्या प्रयत्नांच्या यशस्वीतेसाठी आशावादी आहोत. आम्ही सगळ्या भागधारकांचे - सहकारी, बँका, आर्थिक संस्था, भागधारक, पुरवठादार आणि ग्राहक – त्यांच्या आधारासाठी धन्यवाद देतो.”
अनिल जैन, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.
Sunday, 6 June 2021
'रत्न' पुरस्कार हाजिसाहब को मरणोपरांत घोषित
इंडिया365,अयाज मोहसिन.
मरहूम हाजी डॉक्टर गफ्फार मलिक,इन्हे मनपा की ओर से मरणोत्तर "जलगाव रतन" की घोषणा की गयी है.ये घोषणा महापौर जयश्री ताई महाजन द्वारे की गइ,आप को बता दे के जब
हाजी गफ्फार मलिक हयात थे तभि उन्हे मानद PHd डॉक्टरेट प्रदान की गायी थी,साथ ही मे "भारतरत्न डॉ ए पी जे कलाम-अवॉर्ड ऑफ एक्सलेन्स" भी प्राप्त था.
अब जैसे ही उचित परिस्थिती आयेगी,एक शानदार समारोह मे उनके प्रतिनिधी को 'जलगाव रतन" प्रदान किया जायेगा.
Friday, 4 June 2021
हॅप्पी न्यूज-दोन दिवसानंतर लॉक डॉउन 'अनलॉक'
*व्हेरी हॅप्पी न्यूज*
*अखेर राज्य लोकडोउन मुक्त होणार,नक्की वाचा काय काय सुरू होणार?*
( *"इंडिया365"*,अयाज मोहसिन)
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.
काल 4 जूनला मध्यरात्री याविषयी आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत ५ स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. प्रत्येक आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे पहिला टप्पा जिथे ५ % पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ % ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.
१ली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ %, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
२री लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
३री लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते 10 % असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
४थी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट १० ते 20 % असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर
५ लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे
दुसर्या टप्प्यात ६ जिल्हे
तिसरा १० जिल्हे
चौथ्या टप्प्यात २ जिल्हे
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ ( पहिल्या टप्प्यातील जिल्हे )
रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये १०० % सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० % सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस १०० % क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे
मुंबई
मुंबई उपनगर
अहमदनगर
अमरावती
हिंगोली
नंदुरबार
दुसऱ्या टप्प्यात काय सुरु?
५० % हाॅटेल सुरू, माॅल चित्रपटगृह – ५० % ,लोकल- नाही सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाॅक सायकल सुरू, शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली, क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९, संध्याकाळी ५ ते ९ सुरू – इनडोअर आणि आऊटडोर, शुटिंग चित्रपट सुरू, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के खुले, लग्न सोहळा मॅरेज हाॅल ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत, अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल,मिटींग आणि निवडणूक ५० % उपस्थितीत, बांधकाम, कृषी काम खुली, इ काॅमर्स सुरू, जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा ५० % सुरू, शासकीय बस आसाम क्षमता १०० % सुरू, जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल
तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे
अकोला
बीड
कोल्हापूर
उस्मानाबाद
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील
माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० % खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील, लोकल रेल्वे बंद राहतील.
मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा, ५० % खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू, आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार, स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल, मनोरंजन कार्यक्रम ५० % दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार
लग्नसोहळ् ५० % क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील, बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा, कृषी सर्व कामे मुभा, ई काॅम्रस दुपारी २ पर्संत, जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील
चौथ्या टप्प्यात – पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे
अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु, सरकारी खासगी कार्यालयात २५ % उपस्थिती राहणार, क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही, लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार
अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार, बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार
शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार, ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध
संचार बंदी लागू असणार, सलून, जिम ५० % क्षमता सुरु राहणार, बसेस ५० % विना उभे राहणारे प्रवाशी
५ वा टप्पा, रेड झोनमध्ये, पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये, ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड ७५ % फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील
Friday, 14 May 2021
अब्बू ईद के दिन भी कम्प्युटर से चिपके
युनुसची मुलगी ॲनी म्हणाली, *ईद के दिन भी अब्बू कंप्युटर पे लगे रहते है*
*अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील युनुस शहा यांची सलग दुसरी ईदही कर्तव्य पाळून साजरी*
(संकलन-अयाज मोहसिन, इंडिया365 लाईव्ह) 9273403088.
अमरावती--- अब्बू जब देखो तब कंप्युटरपे लगे रहते है… कोरोना साथीच्या काळात गत वर्षापासून सतत कार्यरत असलेल्या युनुस शहा यांची ॲनी अस्मिर ही चार वर्षांची चिमुकली सांगत होती. कोरोना साथीच्या काळात आयसीएमआर व आरोग्य यंत्रणेसाठी डेटा संकलनाची व समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या युनुस शहा यांची सलग दुसरी ईदही कर्तव्य पाळून साजरी झाली.
श्री.शहा हे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत आहेत. कोविडबाधितांवरील उपचारांना गती देण्याबरोबरच आरोग्य यंत्रणेचे काम विविध पातळ्यांवर सुरु असते. सीएस ऑफिसमधील सहकाऱ्यांना कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल वेळोवेळी मिळवणे, याद्या तयार करणे, त्यासाठी लॅब, रुग्णालये व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय राखणे, आयसीएमआर पोर्टलसाठी डेटा संकलन करणे, त्यात वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेऊन तशा नोंदी घेणे अशी अनेकविध कामे अव्याहतपणे करावी लागतात.
दवाखान्यात नवे रूग्ण येणे, नव्या चाचण्या, नवे निष्कर्ष प्राप्त होणे, नव्याने काही दुरुस्त्या कराव्या लागणे हे सातत्याने सुरुच असते. या सगळ्या नोंदी त्या-त्या वेळीच घ्याव्या लागतात. त्यामुळे थांबून चालत नाही. सगळ्या बाबी नीट लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे मी व माझ्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. गौरव इंगळे, शिवानी गहलोत, अविनाश शेंडे, साखरकर मॅडम, श्रीकांत शहाणे, दीपक लकडे, विशाल काळे, अनिकेत खाडे असे अनेक सहकारी कोविड रिपोर्टिंग सेंटरमध्ये अविरत कार्यरत आहेत…युनुस शहा सांगत होते.
डेटा अपडेशन सतत सुरु असते
जे काम जी व्यक्ती करत असते, तिने एक दिवसही थांबून चालत नाही. कारण, त्याच्या वर्गीकरणाच्या पद्धती, आयसीएमआरचे नियम, रुग्णालयांची माहिती व समन्वय प्रक्रिया याबाबतची अनेकविध प्रकारची माहिती ते काम नित्य करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच अधिक चांगले अवगत असते. साथीच्या या काळात हे काम अधिकाधिक निर्दोष होणे आवश्यक आहे. त्यामुळे रजा घेता येत नाही व अनेक कामे एकहातीही करावी लागतात. सायंकाळी ऑफिस सोडले तरी घरी गेल्यावर उशिरापर्यंत काम सुरूच असते. सकाळी उठल्यावरही माहिती अपडेशनचे काम सुरु होते.
घरी गेल्यावर कुटुंबासोबत असतो, मात्र, कार्यालयीन काम सुरुच ठेवावे लागते. मध्ये मध्ये मुलांशी खेळायला वेळ मिळतो. युनुसला ॲनी अस्मिर ही चार वर्षांची मुलगी व दीड वर्षांचा अकदस हा मुलगा आहे. आज मुलांसोबत राहून पण आपले कार्यालयीन कर्तव्य पूर्ण करून युनुसने ईद साजरी केली. अब्बू जब देखो तब कंप्यूटर पे लगे रहते है, अशी त्याच्या चिमुकलीची तक्रार आहे.
Monday, 19 April 2021
फुफ्फुस सोपी टेस्ट
*फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती*
मुंबई, दि. १९: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
*चाचणी कोणी करावी*
ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.
*अशी करावी चाचणी*
ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.
सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.
*चाचणीचा निष्कर्ष*
जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्या सारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे.
ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये, ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालुन ही चाचणी करू शकतात.
Friday, 2 April 2021
रेमदेसीविर-MRP वर विकू नये
रेमदेसीविर इंजेक्शन संदर्भात होणारा काळाबाजार,कृत्रिम टंचाई,साठेबाजी थांबविण्या बाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिशानिर्देश नव्याने 3 एप्रिल रोजीजारी केले आहेत
*आता रेमदेसीविर इंजेक्शन पेशन्ट ला विकताना नेट प्राईस+10 टक्के,फक्त इतक्या मर्यादेतच विकता येईल*
1) होलसेलर विक्रेत्यांनी रेमदेसीविर, Tosilizumab,Itiizumab विकतांना सरकारी कोविड सेंटर,जिल्हा शल्य चिकित्सक (C.S.) यांनी मान्यता दिलेले कोविड सेंटर, यांना प्राधान्य देण्यात यावे.परवाना धारक औषध विक्रेते,शासन मान्य वैद्यकीय व्यवसयी यांनाच पुरवठा करावा.
2)शासनमान्य वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर च्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खासगी व्यक्ती ला सदर इंजेक्शन विकू नये.
3) सदर औषधे यांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी,औषध होलसेल आणि रिटेल यांनी घ्यावी.
रेमदेसीविर विक्रीवर लागला प्रोटोकॉल
रेमदेसीविर इंजेक्शन संदर्भात होणारा काळाबाजार,कृत्रिम टंचाई,साठेबाजी थांबविण्या बाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिशा निर्देश जारी केले आहेत
1) होलसेलर विक्रेत्यांनी रेमदेसीविर, Tosilizumab,Itiizumab विकतांना सरकारी कोविड सेंटर,जिल्हा शल्य चिकित्सक (C.S.) यांनी मान्यता दिलेले कोविड सेंटर, यांना प्राधान्य देण्यात यावे.परवाना धारक औषध विक्रेते,शासन मान्य वैद्यकीय व्यवसयी यांनाच पुरवठा करावा.
2)शासनमान्य वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर च्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खासगी व्यक्ती ला सदर इंजेक्शन विकू नये.
3) सदर औषधे यांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी,औषध होलसेल आणि रिटेल यांनी घ्यावी.






