Sunday, 25 January 2026

इकरा महाविद्यालय _77 व्या प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण संपन्न*

*77 व्या प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण निमित्त कार्यक्रम आयोजन*
         दिनांक 26/01/2026 रोजी  77 व्या प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते ध्वजारोहण इकरा एज्युकेश्नल कॉम्प्लेक्स, शिरसोली रोड येथे करण्यात आले. या वेळी त्यांनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना 77 व्या प्रजासत्ताकदिनाचे शुभेच्छा दिल्या. या मध्ये इकरा युनानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस,  उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, इकरा बी.एड. कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर इरफान शेख, इकरा डिएड कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर सईदा वकील, इकरा पब्लिक स्कुलचे मुख्यध्यापक शकिल शेख,   तसेच सर्व महाविद्यालयाचे शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी , हॉस्पिटल स्टाफ़, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. या निमित्त सोसायटीचे अध्यक्ष यांनी प्रजा सत्ताकदिनाचे महत्व व त्याची कार्य पद्धती आपल्या देशात कशा प्रकारे करण्यात येते व त्याची अमलबजावणी या बाबत आपले मनोगत व्यक्त केले. आणि साक्षरता शपथ सर्व विद्यार्थी, विद्यार्तीनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देण्यात आली.

Wednesday, 14 January 2026

प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार - ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांचा इशारा

*प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार - ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांचा इशारा*

जळगाव: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी, प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व बोगस आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

*नेमके प्रकरण काय?*
नुकतीच निवडणूक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे समोर आले होते. या यादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळा असणे, प्रभागात राहत नसतानाही नावे नोंदवणे आणि संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी करणे असे प्रकार उघडकीस आले होते.

ॲड. पियूष पाटील यांचा आक्रमक पवित्रा
या संदर्भात बोलताना ॲड. पियूष पाटील यांनी थेट आरोप केला आहे की, निवडणूक जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक बोगस मतदारांची मोठी फौज उभी केली गेली आहे. त्यांनी म्हटले की:
> "एकाच मतदाराचे नाव वेगवेगळ्या प्रभागात असणे किंवा एकाच पत्त्यावर अनेक अनोळखी व्यक्तींची नावे असणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. आम्ही या सर्व नावांची सखोल पडताळणी केली असून, पुराव्यांसह प्रशासनाकडे तक्रार दिली आहे. जे लोक बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील."

*प्रशासनाकडे तक्रार दाखल*
प्रभाग क्रमांक ५ मधील या बोगस मतदार प्रकरणाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. यामध्ये खालील 

*मागण्या करण्यात आल्या आहेत:*
 * दुबार नावांची तात्काळ छाटणी करावी.
 * संशयास्पद मतदार नोंदणीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी.
 * बोगसगिरी करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करावेत.