Thursday, 29 July 2021

ऑनलाइन मेडिसिन चे धाबे दणाणले,FDA चा दणका...

 मुंबई, दि. 29 : गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit (MTP) KIT) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तपासणीकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रशासनाने एकूण 34 ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी केली.

त्यानुसार अॅमेझॉन या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदविली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी दोन वेळा अॅमेझॉनवर स्वीकारून त्याची गुरुनानक इंटरप्राइजेस, लखनऊ, उत्तर प्रदेश व चौधरी फार्मास्युटिकल्स /पिरामल लि., कोरापूर, ओरिसा या संस्थेकडून औषधे पुरविण्यात आले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय MTP kit औषधाची ऑनलाईन विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन आहे. प्रशासनाने अॅमेझॉन व संबंधित वितरक यांना यासंदर्भात नोटीस बजावली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची मागणी नोंदविली असता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दोनवेळा औषधाची मागणी स्वीकारण्यात आली व ते पुरविण्यात येणार असल्याचे देखील संकेतस्थळावरुन एसएमएस संदेशद्वारे कळविण्यात आले. वास्तविक गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांची डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस होकार दर्शविणे, हे देखिल कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याने फ्लिपकार्ट या कंपनीस नोटीस बजाविण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

नुकतेच पुणे येथे अॅमेझॉन या संकेतस्थळावरुन MTP Kit ची विक्री पुण्यातील औषध विक्रेत्यास केल्याने औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तकार दाखल केली होती. या तक्रारी अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करुन यामध्ये सामील असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे प्रत्यक्ष जावून चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुध्द पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Tuesday, 27 July 2021

गंज खाललेला गावठी कट्टा जप्त,LCB चे मोठे यश,धाडशी कारवाई

आज दिनांक 27/07/2021 रोजी
  मा. पोलिस पोलिस निरीक्षक  श्री किरण कुमार बकाले सो.यांना गुप्त बातमीदार यांचे कडून   बातमी मिळाली की यश राजेंद्र पाटील रां सुंदर नगरी यावल यांचे जवळ गावठी कट्टा आहे . 
 बाबत सांगितले . व  सूचना आणि मार्गदर्शन केले होते.  

त्या नुसार खालील पथक रवाना केले होते.
   
  त्या  वरून  आम्ही यावल येथे येऊन यश राजेंद्र पाटील यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करता .व अंगझडती घेता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा मिळून आला.
       त्यास ताब्यात घेऊन त्याचे वर 
                               यावल  पो.स्टे .भाग 6.    गु. र. न.
85/2021 अर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

        
आरोपी नाव  

   1) यश राजेंद्र पाटील वय 20 रा.सुंदर नगरी यावल 

     वर नमूद आरोपी कडून   20000 रू. किमतीचे 01 गावठी कट्टाअसा मुद्देमाल मिळून आला आहे .
 
       आता सदर आरोपीस  वैदेकिय तपासणी करून मुद्देमाल सह पुढील कायदेशीर कारवाही साठी          यावल 
 पो. स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.

कारवाही पथक


1) स.फौ.अशोक महाजन
2) स.फौ.शरीफ काझी
3) पो.ना.युनुस शेख
4) पोना किशोर राठोड
5) पोकाँ. विनोद पाटील
6) पोकाँ रणजित जाधव

सालार नगर मेहरून अंडरपास चे काय झाले?

*अजिंठा चौफुली उड्डाणपूल व सालार नगर जवळील नाल्या वरील सुरू असलेल्या चुकी च्या कामाबाबत तक्रार अर्ज दाखल*

 जळगाव शहरातून जात असलेल्या चौपदरीकरण महामार्गाचे अजिंठा चौफुलीवर उड्डाण फुल याची आवश्यकता असल्याचे जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे तसेच सालार नगर जवळील नाल्यावरील चुकीच्या कामा बाबत सुद्धा दुसरे तक्रार अर्ज दाखल केले.
*नाल्याचे पाण्याचे प्रवाह विरुद्ध विस्तारीकरण*

 सालार नगर जवळील अस्तित्वात असलेल्या  नाल्या वरील पुलाचे चौपदरीकरणाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून ते  काम नाल्याच्या पाण्याच्या  प्रवाहाच्या विरोधात असून पाण्याच्या प्रवाहाच्या समांतर पुलाचे कॉलम अथवा भिंती घ्यायला हव्या होत्या त्या न घेता  त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुलाखालुन येणारे पाणी हे पूर्ण पणे अस्तित्वात असलेल्या कासमवाडी व मासूम वाडी या नागरी वस्तीत घुसेल व त्या मुळे  आर्थिक व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही अशी तक्रार सुद्धा दुसऱ्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

 *अजिंठा चौफुली उड्डाणपूलाचे काम होत असल्यास सालार नगर उड्डाण पूलाचा प्रश्न सुटेल*

 अजिंठा चौक उड्डाण पुलाचे काम झाल्यास सालार नगर चे अंडरपास आटोमॅटिक अस्तित्वात येईल व त्या साठी निधीची आवश्यकता सुद्धा लागणार नाही कारण राजमार्ग प्राधिकरण चे संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी २६ जुलै रोजी लोकमत च्या  प्रतिनीधीशी बोलताना अजिंठा चौफुली वरील उड्डाणपुलाची आवश्यकता विविध संघटनांकडून होत असल्याने त्या ठिकाणी उड्डाणपूल करावा याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विचार करीत असल्याची बातमी २७ जुलै रोजी प्रसिद्ध  झाल्यामुळे आज मंगळवारी शहरातील मर्यादित सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व  अभियंता यांनी चंद्रकांत सिन्हा यांची भेट घेऊन अजिंठा चौफुली वरील उड्डाण पुलाचे कार्य हाती घ्या म्हणजे सालार नगर- अकसा नगर यामधील अंडरपास चे काम सुद्धा सोईस्कर रित्या पूर्ण करता येईल व मागील दोन वर्षापासून आपण जो एचपी पेट्रोल पंपासमोर बॉक्स(अंडर पास) तयार 
 करून देण्याचे आश्वासन देत आहात ते सुद्धा होत  नसल्याने आपण याच अजिंठा उड्डाण पुलाला लागूनच सदरचे अंडरपास तयार करुन देण्यांत यावे अशी मागणी केलेली आहे.

*यांची होती उपस्थिती*

 सदर निवेदन देताना जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, आरको रोडवेज चे बशीर बुर्‍हानी, मनसे चे जमील देशपांडे, ईदगाह ट्रस्ट चेअनिस शाह, अपनी गल्ली चे अताउल्लाह खान, इंजिनिअरिंग असोसिएशनचे इंजि. जाहिद शेख व जळगाव शहर महानगर काँग्रेसचे अध्यक्ष नदीमकाझी,अल्पसंख्याक शिव सेना महानगर प्रमुख झाकीर पठाण,राष्ट्रवादीचे मझहर खान, अडव्होकेट आमीर शेख, यांची उपस्थिती होती.
*दोन्ही कामा बाबत सकारात्मक*
चंद्रकांत सिन्हा यांनी दोन्ही निवेदन,तक्रार अयकुन घेतली व दोन्ही मागण्या बाबत सकारात्मक बाजू वरिष्ठ कार्यालयास त्वरित कळवून आपणास सम्पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले।

फोटो- 
प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना निवेदन देतांना बशीर बुऱ्हानी सोबत फारूक शेख व नदीम काझी दिसत आहे

Tuesday, 13 July 2021

नगररचना विभागातील अधिकारीवर आक्षेप,गंभिर आरोप

 *जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक श्री. आर. एम. पाटिल यांच्या नियुक्तीला  अमोल कोल्हेंचा आक्षेप नियुक्तीच्या चौकशीची केली मागणी*

       जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक या पदावर श्री. आर. एम. पाटिल यांची नुकतीच नियक्ती / नेमणुक करण्यात आलेली आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी श्री. आर. एम. पाटिल हे जळगाव येथे नगररचनाकार पदावर कार्यरत असतांना त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरलेली होती . नागरिकांशी तुसडेपणाने वागणे , अत्यंत भ्रष्ट हेतूने प्रकरणांमध्ये त्रुटी काढणे , कामात टाळाटाळ व दिरंगाई करणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध होत्या . तसेच यापूर्वी असलेल्या नियुक्तीच्या  ठिकाणी सुद्धा त्यांच्या विषयी गंभीर आरोप झालेले असुन  चौकशी सुरू आहे . 

     तरीही अशा परिस्थितीत त्यांना जळगाव जिल्ह्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.  इतकेच नव्हे तर त्यांना जळगाव महानगरपालिका नगररचनाकार या पदाचा देखील चार्ज देण्यात आलेला आहे . पदाधिकाऱ्यांकडुन वारंवार नगरविकास विभागास या बाबींची जाणीव करून दिलेली असतांना सुध्दा नगरविकास विभागातील अधिकारी हे अशा प्रकारच्या भ्रष्ट आरोप असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक जळगाव शहरात करून काय साध्य करू ईच्छितात यामागे निश्चितच काही काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही . 

          अधिक माहिती घेतली असता असे कळले की , श्री. आर. एम. पाटिल यांनी जळगाव शहरातील एका वादग्रस्त बिल्डर कडुन बराच मोठा खर्च नगरविकास विभागात करून तसेच महसूल विभागातील कार्यरत एका अधिकाऱ्याची स्वतःला जळगाव जिल्ह्याच नव्हे तर जळगाव महापालिकेत नियुक्त करून घेतले आहे .

        जळगाव नगररचना विभाग बि. जे. मार्केट येथे कार्यरत झाल्याबरोबर श्री. आर. एम. पाटिल ( सहाय्यक संचालक नगररचना ) यांचे नागरिकांशी फटकळ बोलणे,  विशिष्ट मग्रूरीत राहणे या स्वभावाचा प्रत्यंतर येत आहे .

        तरी जळगाव येथे श्री. आर. एम. पाटिल यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी करण्यात यावी असे जनहीतार्थ  निवेदन  छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी नगरविकास मंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे यांना दिलेले असुन त्याची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव , मा.प्रधान सचिव , ( न.वि. 1 ) नगरविकास विभाग , मुंबई , महाराष्ट्र ., मा. संचालक , नगररचना विभाग , पुणे  ,महाराष्ट्र . यांना पाठवली आहे .


Thursday, 8 July 2021

'*लर्निंग लायसन्स' संदर्भात ऑनलाइन अडचण असल्यास RTO विभागाला संपर्क साधन्याचे आवाहन*

*शिकाउ अनुज्ञप्ती ऑनलाईन अर्जात येणाऱ्या अडचणी निवारणासाठी*
*संपर्क साधण्याचे परिवहन विभागाचे आवाहन* 
  जळगाव (जिमाका) दि. ८ - घरबसल्या शिकाउ अनुज्ञप्ती प्राप्त करण्याबाबतची योजना दिनांक 14 जुलै, 2021 पासून सुरु करण्यात आलेली आहे. परंतु बऱ्याच प्रकरणात आधार प्रणालीतील उमेदवाराचा डाटा इतरांशी जुळून येत असेल किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र (नमुना 1 अ) ईसाईनसह अपलोड केलेले नसेल तर अशावेळी उमेदवारास घरबसल्या शिकाउ अनुज्ञप्ती करीता ऑनलाईन अर्ज करतांना तपासणी न होणे किंवा उतीर्ण झाल्यानंतर शिकाउ अनुज्ञप्ती क्रमांक जारी न होणे व प्रिंट न निघणे याबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत.
  अशा प्रकरणात संबंधित उमेदवार या कार्यालयात मुळ आधारकार्डसह समक्ष हजर झाल्यानंतर सहायक मोटार वाहन निरीक्षक हे संबंधित उमेदवारांचे आधारकार्डनुसार ओळखीबाबत खातरजमा करुन तपासणी करतील जेणेकरुन अशा उमेदवारांना घरबसल्या शिकाउ अनुज्ञप्तीची चाचणी उत्तीर्ण झाल्यास शिकाउ अनुज्ञप्तीची प्रिंट काढता येईल. याबाबत सर्व नागरिकांनी शिकाउ अनुज्ञप्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००

बक़रीद के बारे में कलेक्टर के निर्देश

*बकरी ईद साजरी करण्यासाठी*
*जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्यात मार्गदर्शक सुचना*
  जळगाव, (जिमाका) दि. ८ - कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी धोका अद्यापही कायम असल्याने यावर्षी २१ जुलै, २०२१ रोजी बकरी ईद (चंद्र दर्शनावर अवलंबुन) असून ती अत्यंत साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वानी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही असे शासनाने कळविले आहे. 
  कोविड-१९ मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. 
  कोविड-१९ मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील, नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दुरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain  दि. ४ जून, २०२१ आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील, त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. 
  बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, कोविड-१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००

Friday, 2 July 2021

जैन इरिगेशन ची उत्तुंग भरारी


 जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निकाल जाहीर

जळगाव, 1 जुलै (प्रतिनिधी):- चौथ्या तिमाहीतील (Q4) जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 19.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली. जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या आणि भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ने काल घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजूरी देऊन जाहीर केले. 


ठळक वैशिष्ट्येः

चौथ्या तिमाहीतील जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 19.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

2021 या आर्थिक वर्षात एकत्रित उत्पन्न 5666.9 कोटी रूपयांवर पोहोचले आणि एकल उत्पन्न 2156.4 कोटी रूपये नोंदवले.

एकत्रित कर, व्याज व घसारापूर्व नफ्याचा मार्जिन चौथ्या तिमाहीत1 टक्क्यांवरून 11 टक्के इतका वाढला आणि आर्थिक वर्ष 2021चा 21 5टक्क्यांपासून 8टक्क्यांपर्यंत वाढला.

FY21 चा एकत्रित करव्याजघसारापूर्व नफा 468 कोटी नोंदला गेला आणि एकल करव्याजघसारापूर्व नफा 165.2 कोटी रूपयांवर पोहेचला.

चौथ्या तिमाहीतील एकत्रित करपश्चात नफा 63.9 कोटी रूपये झाला आणि एकल करपश्चात तोटा  22.2 कोटी रूपये होता.

आर्थिक वर्ष 2021 चा एकत्रित करपश्चात तोटा 368.7 कोटीवर पोहेचला आणि एकल करपश्चात तोटा  307.32 कोटी रूपये झाला.

जागतिक मागणी पुस्तकात 4190 कोटी रूपयांच्या ऑर्डर्स आहेत.


कोट


“आम्हाला कंपनीचे चौथ्या तिमाहीचे (Q4) आणि 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात (FY21) आर्थिक निकाल जाहीर करतांना अतिशय आनंद होत आहे. याआधील तिमाहींपेक्षा चौथ्या तिमाहीत कामकाजाचा स्तर जास्त होता. याचे मुख्य कारण म्हणजे कोविडची लाट सौम्य झालेली होती. चौथ्या तिमाहीत (Q4) एकत्रित1उत्पन्नात 93 टक्के वाढ झाली आणि एकल उत्पन्नात 8 टक्के वाढ नोंदवली. नफ्याच्या बाबतीत दोन्ही एकल आणि एकत्रित आर्थिक निकालात सकारात्मक बदल झालेला आहे. निरंतर प्रयत्नांमुळे आणि व्यवस्थापनाचे लक्ष अंतर्गत आणि बहिर्गत आव्हानांना सामोरे जातांना कंपनीचे काम सुधारण्यावर केंद्रीत केले. त्याचा हा परिणाम आहे.


        कंपनीतून पूर्ण 2021 आर्थिक वर्षात 525 कोटी रूपयांची निर्यात केली. त्यामुळे कंपनीचे उत्पन्नाचे स्त्रोत भक्कम आहे. कंपनीच्या उत्पादनांना भारतात आणि जगात खूप मागणी आहे कारण कृषीक्षेत्रात चांगली वाढ याही वर्षी होईल. एकल कामकाजातील खेळत्या भांडवलाची कार्यक्षमता 10 टक्क्यांनी  वाढली. तसेच कंपनीचे एकत्रित निव्वळ कर्ज 416  कोटी रूपयांनी घटले आहे.


कंपनीच्या कर्ज निराकरणाच्या बाबतीत सातत्याने प्रगती झाली आहे. ग्रुपमधील कंपन्यांच्या कर्ज निराकरणातही खूप प्रगती झालेली आहे. सध्याच्या योजनांनुसार आम्ही सगळ्या प्रयत्नांच्या यशस्वीतेसाठी आशावादी आहोत. आम्ही सगळ्या भागधारकांचे - सहकारी, बँका, आर्थिक संस्था, भागधारक, पुरवठादार आणि ग्राहक – त्यांच्या आधारासाठी धन्यवाद देतो.”


अनिल जैन,  उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.