Tuesday, 26 August 2025

*शिक्षण फक्त पदव्या नव्हे तर जाणीवेची ओळख आहे* – डॉ. अब्दुलकरीम सालार

*शिक्षण फक्त पदव्या नव्हे तर जाणीवेची ओळख आहे* – डॉ. अब्दुलकरीम सालार
बुरहानपूर प्रतिनिधी:
मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी, बुरहानपूर व ऑल इंडिया उर्दू संपर्क समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, २४ ऑगस्ट रोजी एका भव्य पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रांताध्यक्ष सय्यद आरिफ अज़ीज यांनी भूषविले.

या सोहळ्यात बुरहानपूरातील एकूण १०५ यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला इमरान खान (मुंबई), नियाज अहमद (सतना), मुश्ताक मलिक (सनावद), लुकमान मसूद (खंडवा), मुइत खान, सफियान काझी (खंडवा), विनोद गोर (सनावद), हाजी वाजिद इकबाल, अजय रघुवंशी, मुशर्रफ खान, हामिदुल्ला डायमंड, फहीम हाशमी, मुश्ताक भाई जलेबीवाले, सलीम मास्टर, फजलुर्रहमान व इजाज अशरफी यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

समारंभाचे प्रमुख आकर्षण होते खानदेशातील आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते डॉ. अब्दुलकरीम सालार (अध्यक्ष – इक़रा एज्युकेशन सोसायटी, जळगाव). त्यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात सध्याच्या शैक्षणिक स्थितीवर प्रकाश टाकत मुस्लिम समाजाच्या अधोगतीवर भाष्य केले. यशस्वी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी म्हटले – “शिक्षण फक्त पदव्या नव्हे, तर जाणीवेची ओळख आहे. समाज आज शिक्षण घेतलेल्या पण कृतीशून्य लोकांनी भरला आहे. खरी पदवी तीच जी कृतीतून दिसते.”

तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे आवाहन केले व सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसूद रियाज, अता उल्ला खान, सुहैल अहमद, अझहर हुसेन, हिकमत मुकादम, अकबर पठाण, इकबाल कौसिन, अफसर अली, तन्वीर अली आदींनी मोलाचे योगदान दिले.
समारंभाचे आयोजन मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी बुरहानपूर जिल्हाध्यक्ष सय्यद जौझर अली यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले. माजी आमदार अब्दुल हमीद काझी व फरीद सेठ यांचे मार्गदर्शन व आश्रय कार्यक्रमाला लाभले.

Thursday, 14 August 2025

सुलेमान मोबलिंचिंग--स्वातंत्र्यदिनी मुस्लिम समाजाने घातला पालकमंत्रीना घेराव. SIT ची मागणी.

*जामनेर : बेटावद खुर्द मॉब लिंचिंग – मुख्य आरोपींना तात्काळ अटक, मकोका  सह संगनमत कलम लावा व पीडिताच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची एकता संघटनेची मागणी*
*एस आय टी व संगनमत कलम वाढविणार: पोलिस अधीक्षक* 

जळगाव :
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे ११ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या अमानवी मॉब लिंचिंग प्रकरणातील मुख्य आरोपी, जो राजकीय प्रभावाचा मानला जातो, याला अद्याप अटक न झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मुख्य आरोपी व कॅफे चालक यांना तात्काळ अटक, गुन्ह्यात संगनमत सह मकोका लावून आणि फिर्यादीच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी केली आहे. या वेळी पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी,  जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांची सुद्धा उपस्थिती होती.

या हल्ल्यात पीडित व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून हत्या करण्यात आली.
एकता संघटनेचे शेख यांनी स्पष्ट केले की आरोपी हा संघटित टोळीचा भाग असून, त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचा इतिहास आहे. त्यामुळे मकोका व बी एन एस ६१(२) संगनमत हे कलम लाऊन  कठोर कारवाई केल्याशिवाय न्याय होणार नाही.
*एकता संघटनेच्या ठाम मागण्या*


मुख्य आरोपी व कॅफेचालक यांना तात्काळ अटक.

भा.दं.सं. कलम १२०(ब) म्हणजे बी एन एस 61(2) अंतर्गत कटकारस्थानाचा गुन्हा दाखल करा.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) तात्काळ लागू करणे.
तपास त्वरित एस आय टी कडे सोपवणे.

पीडित कुटुंबास २५ लाख रुपयांची मदत व एक सदस्यास शासकीय नोकरी.

साक्षीदार संरक्षण योजना तात्काळ लागू करणे.

सी आर पी सी कलम २४(८) अंतर्गत पीडिताच्या निवडीनुसार विशेष सरकारी वकील नेमणे

संघटनेने आपल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सह दाखले दिलेले आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने, कठोर कायदेशीर कारवाई व निष्पक्ष तपास अत्यावश्यक आहे.

या प्रसंगी संघटनेचे मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगर, मजहर पठाण,आरिफ देशमुख, अब्दुल अजीम शेख, मौलाना इमरान, रज्जाक पटेल, मौलाना कासिम नदवी , खान शकील,अरबाज शेख, इरफान शेख, हसन सैयद, उमर पटेल, नजमोद्दीन शेख, गुफरान शेख,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर निवेदनाच्या प्रती मा. गृहमंत्री, मा. आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मा. अल्पसंख्यांक आयोग, मा. मानव अधिकार आयोग, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देण्यात आलेले आहे. 
फोटो कॅप्शन 
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करताना फारुक शेख व निवेदन देताना मुफ्ती खालीद सह शिष्टमंडळ दिसत आहे

Wednesday, 6 August 2025

*अनामिका मेहरा सहित जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित*

*अनामिका मेहरा सहित जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित*

उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्यानगर जळगाव येथील असून सर्व तीनही  भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. 
परंतू  मा.  जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार उत्तरकाशी येथील Maount Bhagirathi Home Stay Harshil
या स्टे हाऊस शी जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क केला असता सदर  *मेहरा कुटुंबातील* अनामिका मेहरा .आरोही मेहरा,रुपेश मेहरा –  हे उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक  अयोध्या नगर जळगाव येथील असून सर्व तीनही  भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. 
     सदर भाविकांचे वडील श्री चंद्रशेखर नरवरिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कशात आले असता त्यांचा उपरोक्त स्टे हाऊस मालकाशी संपर्क करून दिला आहे.

सूत्र - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जळगाव