Monday, 30 September 2024

*युवासेनेतर्फे 1 ऑक्टोबर जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन,9 मुलांचे व 5 मुलींचे संघ होणार सहभागी*

*युवासेनेतर्फे 1 ऑक्टोबर जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन*
9 मुलांचे व 5 मुलींचे संघ होणार सहभागी

जळगाव- युवासेनेतर्फे मंगळवार दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी जी. एच. रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड, जळगाव येथे सलग चौथ्या वर्षी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या फलकाचे अनावरण नुकतेच शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना तथा युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेजकक्षचे जळगाव लोकसभा युवाधिकारी प्रितम शिंदे, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, चंद्रकांत शर्मा, सुरज पाटील, उपमहानगर युवाधिकारी प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, पियुष हसवाल, अजय खैरनार, यश मोरे आदि उपस्थित होते. 
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून कुमार वयोगटातील 9 मुलांचे तसेच 5 मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे तांत्रिक आयोजन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे व सहकारी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.

आपला -
प्रितम रविंद्र शिंदे
कॉलेजकक्ष युवाधिकारी
जळगाव लोकसभा 
जळगाव
9588411488

Saturday, 28 September 2024

तुषार चोरडिया का अंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट मे चयन..

*श्री डूंगरगढ निवासी जलगाँव प्रवासी नोरतमल चौरडिया के सुपुत्र तुषार चौरडिया का  इंटरनेशनल टेनिस बॉल क्रिकेट मेच सीरिज 2024 मे चयन*
जलगाँव-  श्रीडूंगरगढ निवासी जलगाँव प्रवासी तेरापंथी सभा, जलगाँव के उपाध्यक्ष नोरतमल चौरडिया के बड़े सुपुत्र  *तुषार चौरडिया* का  *इंटरनेशनल टेनिस बॉल क्रिकेट मैच सीरीज2024* में खेलने के लिए चयन हुआ है। 
 *मालदीव में यह मैच सीरिज 3 अक्टूबर से 7 अक्टूबर 2024 तक आयोजित होगी।*

 तुषार चौरडिया ने हैदराबाद, दिल्ली एवं दुबई में कोच की ट्रेनिंग ली हैं, एवं कवियित्री बहिणाबाई चौधरी उतर महाराष्ट्र विद्यापीठ में क्रिकेट टीम के कप्तान रहे हैं, एवं पिछले दो महीनों से  निम्स यूनिवर्सिटी, शिरपुर मे क्रिकेट प्रशिक्षक(कोच) के पद पर कार्यरत हैं। तुषार चोरडिया को जलगाव क्रिकेट जगत मे 'लाला' के उपनाम से भी जाना जाता हैं. जलगाव जिले मे जैन समाज द्वारा आयोजित JPL टूर्नामेंट मे भी अपना लोहा बार बार मनवाया हैं. हम इंडिया 365 लाईव्ह की ओर से चोरडिया परिवार को शुभकामनाये और ढेंरो बधाईया देते हैं.

Friday, 27 September 2024

*इकरा युनानी मेडिकल कॉलेज मध्ये तीन दिवसीय एच एस इ टी (MET) कार्यशाळा संपन्न ...*

*इकरा युनानी मेडिकल कॉलेज मध्ये तीन दिवसीय एच एस इ टी (MET) कार्यशाळा संपन्न ...*

इकरा युनानी मेडिकल कॉलेज मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या निर्देशीत Basic workshop on health Science Education (MET) कार्यशाळेचे आयोजन  दिनांक 25/09/2024 ते 27/09/2024 रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन शासकिय आयुर्वेद कॉलेजचे तसेच एच एस इ टी चे को-ऑर्डिनेटर डॉ. राजेश कोलारकर, इकरा युनानी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या मध्ये आयुर्वेद, युनानी व  होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांनी तीन दिवसिय कार्यशाळेत सहभाग घेतला. या कार्यशाळे मध्ये डॉ. राजेश कोलारकर, डॉ. राजेश सुरवाडे, जि एम सी, जळगाव, डॉ. शर्मिली सुर्यवंशी, डॉ. योगीता बाविस्कर, डॉ. सुमेध सोनावने, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. विलास मालकर, डॉ. शोएब शेख यांनी गेस्ट लेकचरर म्हणुन Basic workshop on health Science Education या विषयावर उपस्थित प्राध्यापकांचे लेकचर घेतले. या कार्यशाळेचे आयोजन इकरा युनानी कडून करण्यात आले. दिनांक 27/09/2024 रोजी दुपारी कार्यशाळेचे समापन करण्यात आले. या कर्यशाळेत डॉ. मुजफ्फर शेख, युनानी विभाचे बि ओ एस चैरमन यांना इकरा युनानी मेडीकल कॉलेज कडून “निशाने इकरा” मोमेंटो देऊन संमानित करण्यात आला. तसेच कार्यशाळेचे को-ऑर्डिनेटर डॉ. राजेश कोलारकर यांना सुद्धा  “निशाने इकरा” मोमेंटो देऊन संमानित करण्यात आले.  इकरा  इकरा युनानी मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दुस व डॉ. शोएब शेख यांनी आलेले सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व फॅकल्टी गेस्ट लेकचरर यांचे आभार मनले. व आपण या तीन दिवसिय कार्यशाळात सहभाग घेतला त्या बद्द्ल त्यांचे अभिनंदन केले.

Thursday, 26 September 2024

अर्ज न केलेल्या बहिणींनी देखील तत्काळ अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज भरावा--आ.राजूमामा भोळे यांचे आवाहन

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेसंदर्भात अंगणवाडी सेविकांची बैठक 

महानगरपालिकेत आ. राजूमामा भोळे यांनी घेतला आढावा 

जळगाव (प्रतिनिधी) : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" या योजनेसंदर्भात आज गुरुवारी दि. २६ रोजी अंगणवाडी सेविका यांची महानगरपालिका येथे आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षम होत असून त्यामुळे परिवार सक्षम पर्यायाने समाज व देश सक्षम होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज न केलेल्या बहिणींनी देखील तत्काळ अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज भरावा. म्हणजॆ त्यांना लाभ मिळेल, असे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. 

महानगरपालिका येथे दुसऱ्या मजल्यावर "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" या योजनेसंदर्भात आज गुरुवारी दि. २६ रोजी बैठक उत्साहात पार पडली. यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, गणेश चाटे, सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, सुमित जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी गायत्री पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. अंगणवाडी ताईंनी त्यांना आलेल्या विविध अनुभवांची माहिती दिली. 

तसेच, या योजनेमुळे महिलांना आर्थिक हातभार लागत असल्याने त्यांनी राज्य सरकारचे आभार मानल्याचेही अनुभव अंगणवाडी सेविकांनी सांगितले.बैठकीत आ. राजूमामा भोळे यांनी येणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात जाणून घेतले. तसेच, योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बहिणींच्या अर्जावर लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनीदेखील समस्या जाणून घेऊन जर प्रक्रियेत काही त्रुटी असतील तर लवकरच दूर केल्या जातील असे आश्वासित केले.

Wednesday, 25 September 2024

*महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच*

*महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच*

*जळगाव दि.२५ प्रतिनिधी* -  जैन इरगेशन सिस्टीम्स लि. च्या स्पोर्ट्स विभागातील प्रशिक्षक मुशताक अली हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंच परीक्षेत यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या अधिकृत पंचांच्या यादीत त्यांनी स्थान पटकावले आहे. क्रिकेट खेळाडू ते क्रिकेट प्रशिक्षक व आता क्रिकेटचे अधिकृत पंच हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुशताक अली हे आता जिल्ह्यातील चौथे अधिकृत पंच ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे सहसचिव अविनाश लाठी, जळगावचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनच्या पंच समितीचे सदस्य संदीप गांगुर्डे यांच्यासह जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

Friday, 13 September 2024

राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने सुरू-आमदार राजू मामांच्या प्रयत्नांना यश.

राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने सुरू

आ. राजूमामा भोळे यांच्या सूचनेची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण राहण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून महामार्गावर गतिरोधक टाकण्याची विनंती केली होती. अखेर शुक्रवारी दि. १३ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम सुरू झाले आहे. 

गेल्या १५ दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भीषण अपघात होऊन तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर काही जण जखमी देखील झाले होते. या पार्श्वभूमीवर जनमानस संतप्त झाले होते. काही नागरिकांनी आंदोलन देखील केले होते. त्यामुळे शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी दालनात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध सूचना मांडल्या होत्या. त्यामध्ये महामार्गावर अपघात होण्याचे जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत असेही आ. भोळे यांनी सांगितले होते. 

आमदार राजूमामा भोळे यांच्या सूचनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. बिबानगर पासून कालिका माता मंदिर पर्यंत गतिरोधक टाकण्यात येतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीने मिळत आहे. यामुळे नागरिकांनी आमदार राजूमामा भोळे यांनी आभार मानले आहेत.

फोटो विथ आमदार खासदार...

अचानक रद्द झाल्या रेल्वेगाड्या, खा. वाघ, आ.भोळे यांच्या प्रयत्नांनी मिळाली "एक्स्प्रेस" !

विद्यार्थ्यांसह प्रवाश्यांनी आभार मानत काढले फोटो 

जळगाव (प्रतिनिधी) : अचानक रेल्वेगाड्या रद्द झाल्याने १५० ते २०० प्रवाशांचे पाचोरा, चाळीसगाव जाण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे खा. स्मिता वाघ व आ. राजूमामा भोळे यांनी तत्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून विद्यार्थ्यांना रेल्वे उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी आभार मानले. 

मुंबईहून जळगांवकडे येत असताना खा. स्मिताताई वाघ व आ. राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगांव रेल्वे स्टेशनला उतरले त्यावेळी रेल्वे स्टेशनवर रोज ये-जा करणारे नोकरदार वर्ग तसेच कॉलेजची मुलं मुली विद्यार्थ्यांची परीक्षा होती. त्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांना माहिती दिली की आज भुसावळ-इगतपुरी ७:१५ वाजताची मेमो अचानक रेल्वे प्रशासनाने रद्द केली 

आम्ही सर्व १५० ते २०० प्रवाशांना आता पाचोरा-चाळीसगाव जाण्यासाठी एकही गाडी नाही. तेव्हा खा. स्मिताताई वाघ यांनी डीआरएम भुसावळ यांच्या सोबत बोलण करून गाडी नंबर २२१८४ साकेत सुपर फास्ट एक्सप्रेसला जळगांव स्टेशनला २ मिनिटाचा थांबा देऊन पुढील पाचोरा, चाळीसगाव स्टेशनला पण थांबा देण्याचे निर्देश दिले. त्यावेळी सर्व विद्यार्थिनी व प्रवाश्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांचे आभार मानले. अनेक मुलांना खा. स्मिता वाघ व आ. राजूमामा भोळे यांच्यासोबत त्याठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नाही.

Monday, 9 September 2024

डॉक्टरांच्या अनंत कोटी अडचणी दूर व्हाव्यात --IMA चे राज्यपालांना साकडे..

प्रति, 
महामहिम, 
श्री. सी. पी. राधाकृष्णन,  
महाराष्ट्राचे राज्यपाल,  
राज भवन,  
मुंबई.  

विषय: इंडियन मेडिकल असोसिएशन, जळगाव शाखेचे निवेदन सादर करणे

माननीय महोदय,

आम्ही, इंडियन मेडिकल असोसिएशन, जळगाव शाखेचे सदस्य, आपल्या कळकळीने लक्षात आणू इच्छितो की खालील मुद्द्यांवर विचार करण्याची विनंती करतो:

1] महात्मा फुले जनआरोग्य योजना (MPJY), आयुष्यमान भारत आणि कर्मचारी राज्य विमा योजना (ESIS) यांसारख्या सरकारी आरोग्य योजनांमध्ये सुधारणा  
• उपचारांचे पॅकेजेस खूप जुने आहेत आणि त्यांचे पुनरावलोकन होणे आवश्यक आहे.  
• नवीन आजार आणि उपचार पॅकेजेसचा समावेश होणे आवश्यक आहे. 
• खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा आरोग्य योजना समित्यांमध्ये समावेश व्हावा. 
• रुग्णालये आणि डॉक्टरांना वेळेवर देयके मिळणे.  
• योजना अंमलबजावणीमध्ये रुग्णालयांना येणाऱ्या अडचणींवर समाधान मिळण्यासाठी रुग्णालयांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण प्रणाली असावी.  
• आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या शेजारच्या राज्यांमधून आलेल्या रुग्णांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसंदर्भात रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात.  
• रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये समाविष्ट रुग्णालये आणि उपचारांच्या सुविधांबाबत बऱ्याच गैरसमजुती आहेत. या योजनांचा कार्यकाळ सुरळीत चालण्यासाठी एक प्रणाली विकसित केली पाहिजे.  
• समावेशन प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि ती सुलभ असावी. काही विभागांकडून समावेशनासाठी लाखो रुपयांच्या लाचांच्या मागण्या होतात.  
• या योजना सर्व रुग्णालयांसाठी खुल्या असाव्यात, आणि जिल्हा आणि तालुका स्तरावर सिंगल विंडो नोंदणी प्रणाली असावी, ज्यामुळे रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार मिळू शकतील.

2] महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा आणि बायोमेडिकल कचरा या बाबत:- 
• वापरकर्त्यासाठी सुलभ संयुक्त परवानगी मंजुरी.  
• ५० पेक्षा कमी खाटांचे रुग्णालये असतील, तर  सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची सक्ती नसावी. महाराष्ट्र वगळता बहुतेक राज्यांमध्ये अशी सक्ती नाही.  
• काही अधिकारी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही परवानगी देत नाहीत. परवानगी निश्चित वेळेत स्वयंचलितपणे मिळाली पाहिजे.  
• परवानगीसाठी आवश्यक असलेल्या बँक गॅरंटीची अट रद्द केली पाहिजे. महाराष्ट्र वगळता इतर कोणत्याही राज्यात अशी अट नाही.  
• फॅक्टरींसाठी असलेल्या पोर्टलपासून वेगळे, रुग्णालयांसाठी स्वतंत्र वेब पोर्टल असावे.

3] क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायदा  
• सीईए २०१० हा पूर्णपणे अमान्य आहे.  
• राज्य बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट २०२१ मध्ये कोणतेही बदल होऊ नयेत.  
• ५० पेक्षा कमी खाटांचे रुग्णालये सीईए अंतर्गत आणू नयेत.  
• डे केअर रुग्णालये जसे की नेत्र रुग्णालये, यांना नर्सिंग होम नोंदणीपासून मुक्त करणे आवश्यक आहे.

4] मेडिक्लेम आणि विमा :- 
• कॅशलेस दावा मंजूरी लवकर व्हावी आणि विमा किंवा टीपीए कंपन्यांकडून शोषण होऊ नये. संपूर्ण प्रणाली नव्याने विकसित होणे आवश्यक आहे.

5] डॉक्टरांवरील हिंसाचार प्रतिबंधक कायद्यात बदल होऊन आरोपीला किमान ७ वर्षांची आणि अजामीनपात्र शिक्षा होणे आवश्यक आहे.

6] गर्भपातासंबंधी औषधे तस्करीस कठोरपणे आळा घालणे आवश्यक आहे. अनेक रुग्ण हे औषधे अवैधपणे घेतात आणि त्यामुळे गंभीर प्रसूतीसंबंधी गुंतागुंत निर्माण होते.

7] डीएमएलटी तंत्रज्ञांकडून चालवल्या जाणाऱ्या पॅथोलॉजी लॅब्सवर कठोरपणे देखरेख केली पाहिजे आणि त्याठिकाणी पॅथॉलॉजिस्टची प्रत्यक्ष उपस्थिती असावी.

8] वैद्यकीय उपकरणे आणि औषधे जीएसटीमधून मुक्त केली पाहिजेत.

9] आम्ही डॉक्टर शासनाला लक्षणीय प्रमाणात कर जमा करतो. आम्ही विनंती करतो की "लाडकी बहिण" आणि "भाऊ" यासारख्या सुविधा बंद केल्या जाव्यात.

10] आयुर्वेदिक डॉक्टरांनी – चिकित्सक आणि शल्यविशारदांनी – त्यांच्या रुग्णालयांच्या पाट्या आणि प्रिस्क्रिप्शन पेपरांवर 'आयुर्वेदिक' असा स्पष्ट उल्लेख करावा. यावर सरकारी यंत्रणेचे नियंत्रण असावे आणि सामान्य लोकांनाही याची माहिती असावी. अनेक लोक त्यांना ॲलोपथिक सर्जन किंवा चिकित्सक समजून उपचार घेतात.

आपल्या उत्तम नेतृत्वाखाली या सर्व मुद्द्यांना योग्य न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे.

आम्ही, आपल्याकडून या बाबींवर योग्य ती कृती करण्याची आणि विचार करण्याची विनंती करतो.

आपले विश्वासू,  
अध्यक्ष  
सचिव  
आयएमए जळगाव टीम

Friday, 6 September 2024

बेरोजगाराना सुवर्णसंधी, मुख्यमंत्री योजनादूत...

*‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

मुंबई दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

Wednesday, 4 September 2024

राजुमामा आणि मामिनी केले जलपुजन

       
*वाघूर धरण जलपूजन ;*
*दोन वर्षांची जळगाव शहरासाठी पाण्याची चिंता मिटली आ सुरेश भोळे राजुमामा व सौ सीमाताई भोळे यांनी केले खन नारळ ची ओटी भरून केले जल पूजन
*जळगाव, ता. 4 :* जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे 100 टक्के पूर्ण भरले आहे. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज बुधवार, दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी शहराचे आमदार सुरेश भोळे राजूमामा व  माजी महापौर सौ.सीमाताई भोळे यानी सपत्नीक धरणस्थळी. वाघूर नदीचे साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले.यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता.या प्रसंगी आ.राजूमामा भोळे यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव 100 टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली. वाघूर धरणाचे बांधकाम 1978 मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते चार वेळा 100 टक्के भरले आहे. पुढील दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून नागरिकांची जलचिंता ही मिटली आहे.


Monday, 2 September 2024

*वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांची बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन*

*वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांची बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन*

जळगाव दि. 2 ( जिमाका )  वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील 02 दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील 4 गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच मदतकार्याची गती वाढविणेबाबत सूचना केल्या.
    वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्याने जीवितहानी वा पशुधनाची हानी झालेली नाही मात्र वित्तहानी झालेली आहे.  बाधित गावांत आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणेत येत आहे. मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) ही मागविणेत आलेले असून त्यांच्याद्वारे आवश्यक मदतकार्य करणेत येत आहे. तसेच जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इ. ठिकाणीही मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) नियुक्त करण्यात आलेले आहे. 
    तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जावु नये तसेच पशुधन ही नेऊ नये.  आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 02572217193 संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.