Wednesday, 13 November 2024

'राजे छत्रपती' 'स्वराज्य रक्षक' फेम अभिनेते तथा संसदरत्न खासदार अमोल कोल्हे सावद्यात गुरुवारी सकाळी...


*ॲड.खडसे रोहिणी एकनाथराव यांच्या प्रचारार्थ सावदा शहरात खासदार अमोल कोल्हे यांचा रोड शोचे आयोजन* 
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यातील सावदा शहरात संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांचा रोड शो गुरुवार (दि.१४) सकाळी ११ वाजता होणार आहे.

 रोड शो बस स्टॅन्ड समोरील दुर्गा माता मंदिरापासून सुरू होईल व शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन महाविकास आघाडीच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबुन रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार अमोल कोल्हे हे नागरिकांना करतील.त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.    

तरी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या  नागरिक बंधू भगिनींनी  या रोडशोला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

Sunday, 10 November 2024

औदयोगिक जगत राजुमामा यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही....


जळगाव (प्रतिनिधी) :  येथील लघुउद्योग भारतीची बैठक रविवारी संध्याकाळी घेण्यात आली. बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प पदाधिकारी व सदस्यांनी केला.

बैठकीमध्ये लघु उद्योग भारतीचे विभागीय सचिव समीर साने, अध्यक्ष संतोष इंगळे, नंदूशेठ अडवाणी, माजी अध्यक्ष किशोर ढाके मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांचे स्वागत पदाधिकाऱ्यांनी केले.यानंतर अध्यक्ष संतोष इंगळे यांनी मनोगत व्यक्त करून, विकास कामांची कास धरणारे आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी राहण्याचे आवाहन केले 

यावेळी आ. राजूमामा भोळे म्हणाले की, जळगाव शहरात एमआयडीसी आहे. ही एमआयडीसी अधिक विस्तारित करून तेथील असलेल्या समस्या पुढील पंचवार्षिक काळात सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे माझे व्हिजन आहे. आपल्याला आणखी एक एमआयडीसी मंजूर झालेली असून निवडणूक झाल्यानंतर तिचेही विस्तारीकरण होणार असल्याची माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिले. उद्योग व्यवसायांमध्ये बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याबाबत उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आ. राजूमामा भोळे यांनी केले.

यावेळी पाईप असोसिएशनचे पदाधिकारी रवींद्र लढा, भाजप उद्योग आघाडीचे कांती सानप,  लघुउद्योग भारतीचे माजी अध्यक्ष रवींद्र फालक, हर्षल चौधरी, जयंतीभाई पटेल, महेश चौधरी, मानस बोरोले यांच्यासह लघुउद्योग भरतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.