Saturday, 13 September 2025
*रामानंदनगर पोलिसांची धडक कारवाई,गावठी कट्टा, 1 काडतूस,सह सराईत पकडला..*
मा. पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, मा.अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी नितिन गणापुरे यांनी विविध अधिकाऱ्यांना पोलिस स्टेशन रेकॉर्ड वरील आरोपी गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यांची खबरदारी घेण्याची सूचना केली होती, या सूचनेनुसार प्रेरित होऊन रामानंद नगर पोलिसांनी 1 सराईत संशयित महेंद्र (दादू ) सपकाळे ला 1 गावठी कट्टा, 1 काडतूस सहित धरले. आरोपी मूळे पिंप्राळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.रामानंद नगर पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी कमालीची गोपनीयता राखत सदर आरोपीच्या मुसक्या आवळल्या.या टिम मधे PSI सचिन रनशेवरे,पोहेका जितेंद्र राजपूत, सुधाकर अंबोरे,जितेंद्र राठोर, सुशील चौधरी,हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे,रेयांनंद साळुंके, योगेश बारी,विनोद सूर्यवंशी, गोविंदा पाटिल यांचा समावेश होता. पुढील तपास PSI सचिन रानशेवरे करीत आहेत.
Friday, 12 September 2025
LCB ची अभूतपूर्व कामगिरी--चोरी गेलेली बकरी परत आणली.. मोठ्ठा पराक्रम.
*LCB दलाची धाडसी, अभूतपूर्व कामगिरी,(रिपोर्ट अयाज मोहसीन, इंडिया 365 न्यूज) गुन्हेगारांचे धाबे दणाणले, जिल्हा भरात एकच कौतुक,कुठलाही सुगावा नसताना निव्वळ आपली अलौकिक बुद्धिमत्ता वापरून *"चोरी गेलेली बकरी परत आणली'''- मुक्या जनावराच्या चेहऱ्यावर आभाराचे भाव...शनी पेठ हद्दीतील प्रेरणादायी किस्सा..अलिकडे ड्रग्स प्रकरण,विविध कंट्रोल जमा/ निलंबन,नियमित होणारे खून,अधिकाऱ्या वर बलात्काराचे आरोप,फोफावलेला वेश्या व्यवसाय,निरंकुश अवैध धंद्याचे आरोप अशा अनेक कारणा मूळे खाकीची प्रतिमा मलिन झाली आहे, आता मात्र या मोठ्ठ्या यशस्वी कामगिरी मूळे,प्रतिमा सुधारण्या मधे 'बकरी प्रकरणाचा" नक्कीच योगदान असेल.विशेष म्हणजे विविध सणांचे बंदोबस्त असतांना देखील योग्य वेळी खाटकाच्या सूरी खालून निष्पाप बकरीचे जिव वाचविण्याचा अचाट पराक्रम LCB ने तसेच पर्यायाने जिल्हा पोलिस दलाने केलाय.*
जळगाव जिल्हा पोलिस दलाने मागील काही वर्षात 'डिटेक्शन' क्षेत्रात एका पाठोपाठ यश शिखरे पादाक्रांत करत कामगिरी चा आलेख उंचावला आहे. *"बाईक चोर धरला "...*
*"गंज चढलेला गावठी कट्टा मिळाला(किंमत हजार रु)."..."पाकिट चोराच्या मुसक्या आवळल्या"..."गावठी दारूचा अड्डा उध्वस्त".."मर्डर केसेस मधे आरोपी स्वतः जमा"-24 तासात सेकण्ड हॅन्ड मोबाईल चोर पकडला...(किमत हजार पाचशे)*
*या टिम ने उचलला बकरी परत आणण्यात "सिंहाचा वाटा"*
👇
*IPS SP मा. रेड्डी साहेब यांचे प्रगल्भ नेतृत्व, ASP नखाते साहेब यांचा अनुभव, जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले DYSP गणापुरे साहेब, ज्यांच्या वर मोठ्या विश्वासाने LCB PI ची जबाबदारी टाकण्यात आली असे इन्स्पेक्टर राहुल गायकवाड साहेब,LCB PSI शरद बागल,APSI अतुल वंजारी,प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर,विजय पाटिल, नितिन बाविस्कर, किशोर पाटिल, रतन हरी गिते,सिद्धेश्वर डापकर,प्रदिप चावरे, अक्रम शेख, रविंद्र कापडणे तसेच सर्व ज्ञात अज्ञात सहकार्य करणारे. आता या नंतर हा तपास शनिपेठ पोलिस स्टेशन ला देण्यात येईल तेथे पो. नि. कमलाकर कावेरी ताई यांची टिम तपास करेल.*
Monday, 8 September 2025
गणेशउत्सवा निमित्त ईकरा युनानी कॉलेज तर्फे मेडिकल कॅम्प.
*अनंत चतुर्दशी निमित्त इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालय तर्फे मोफत मेडिकल कॅम्प*
आज दि. ०६/०९/२०२५ रोजी इच्छादेवी चौक येथे गणेश विसर्जन मिरवणूक मधील गणेश भक्तांसाठी इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालय तर्फे मोफत मेडिकल कॅम्प व प्रथमोचार चे आयोजन करण्यात आले या कॅम्प ठिकाणी प्रमोद खटके साहेब (उपअधीक्षक), राहुल तायडे साहेब (पोलीस उपनिरीक्षक), प्रशांत नाईक ( माजी नगरसेवक), अब्दुल करीम सालार, मुफ्ती हारून नदवी साहब, अजीज सालार, खालिद बागवान, इरफान सालार, ॲड.शरीफ शेख कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर शोएब शेख तसेच आसिफ खान, इमरान शेख, मोहसीन शेख व महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. गणेश विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना या कॅम्पमध्ये मोफत उपचार देण्यात आले असून त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाले.
Subscribe to:
Posts (Atom)