Wednesday, 1 January 2025

पाळधी लूटमार व आग लावणारे गुन्हेगारांना अटक करा.**नुकसानग्रस्त प्रत्येक व्यक्तींना प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्या - एकता संघटनेची मागणी*


*पाळधी लूटमार व आग लावणारे गुन्हेगारांना अटक करा.*
*नुकसानग्रस्त प्रत्येक व्यक्तींना प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्या - एकता संघटनेची मागणी*

पाळधी येथे ३१ डिसेंबरच्या रात्री काही राजकीय व्यक्तीच्या हस्तकांनी मुस्लिम समाजातील  लोकांची दुकाने जाळून खाक केली व वाहने सुद्धा जाळण्यात आली या संपूर्ण प्रकाराची व घटनेची सविस्तर चौकशी करून जे गुन्हेगार प्रत्यक्ष घटनेत सहभागी होते  व त्यांना प्रोत्साहन देणारे, पुरस्कृत करणारे त्यांनाही कायदेशीर रित्या अटक करून त्यांच्यावर  कडक कारवाई करावी, नुकसानग्रस्त त्या १२ कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, गुन्हेगारांना मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करून त्यांना तडीपार  करण्यात यावे. एवढेच नव्हे तर पाळधी गावात सतत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी.
 शासनाने प्रशासनाने वेळीच मागण्या मान्य केल्या नाही तर जळगाव जिल्हा एकता संघटना ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या शासनाकडे मांडतील अशी एकमुखी मागणी तक्रार अर्ज द्वारे जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे करण्यात आली.
 
*जिल्हा दंडाधिकारी यांचेशी चर्चा* 
प्रथमताच जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांना आम्ही निवेदन देण्यासाठी नव्हे तर चर्चा व रिझल्ट साठी प्रशासनाच्या  दंडाधिकारी यांचे कडे आलो असून आपण आमच्या तक्रारीची दखल घ्यावी म्हणून त्यांनी तक्रार अर्जातील प्रत्येक बाबी वर चर्चा करून समाधानकारक उत्तरे दिली. तसेच या शिष्टमंडळाला शासनातर्फे जे काही करता येईल ते करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.
 
*मुख्यमंत्री सचिवालय कक्षाला सुद्धा तक्रार अर्ज सादर*

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या तहसीलदार श्रीमती ज्योती रामसिंग वसावे यांना सुद्धा या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून तक्रार अर्ज देऊन चौकशीची मागणी केलेली आहे.
 
*जिल्हा एकता संघटनेतर्फे यांचा होता समावेश* 

संघटनेचे समन्वयक फारुक शेख, संघटक नदीम मलिक, सईद शेख, वासिफ अली व शेख मुजम्मिल (नशिराबाद), अनिस  शाह,वसीम हैदर, अन्वर खान, जकी पटेल, युसुफ खान, सय्यद इरफान अली, महमूद पिंजारी (शिरसोली), मुजाहिद खान, साजिद खान,सय्यद (नशिराबाद) आरिफ देशमुख, अजीमुद्दीन शेख, मजहर पठाण, सलीम इनामदार, सय्यद मन्सूर अली व लूकमान शेख (चोपडा)असलम पिंजारी, रहीम शेख व मुजाहिद शेख (एरंडोल) इमरान शेख आदींचा समावेश होता.

फोटो
१)जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित एकता संघटनेचे पदाधिकारी 
२) जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांना तक्रार अर्ज देताना फारुख शेख व सहकारी 
३)मुख्यमंत्री सहायता कक्ष प्रमुख तहसीलदार श्रीमती वसावे यांना तक्रार अर्ज देताना फारुक शेख व सहकारी