india365live

Sunday, 22 November 2020

डॉ. उल्हास पाटिल यांचा विशेष सन्मान..

*डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालया चे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांचा गौरव*

 जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात चालवली जाणारी एकमेव वैद्यकीय संस्था म्हणून  डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय असून कोविड या महामारी मध्ये शासनाला १००℅ सहाय्य करणारी ती एकमेव वैद्यकीय संस्था ठरली असून त्याच सोबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुद्धा कार्य त्यांनी हाताळले व रुग्णांना सेवा दिली त्याबद्दल अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांचा जळगाव कोविड केअर युनिट व नशिराबाद मन्यार बिरादरी तर्फे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


 *कोविड , नॉन कोविड व सामान्य रुग्णालयाची जबाबदारी* 


मार्च महिन्यात अकस्मातपणे लॉक डाऊन घोषित झाल्यावर कोविंड संशयास्पद व पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असताना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे अपूर्ण पडल्याने व इतर खाजगी रुग्णालयांनी शासनाला असहकार्य दर्शीवल्याने  तत्कालिन जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव चे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्वरित जळगावकरांच्या सेवेसाठी सदर महाविद्यालय व तेथील स्टाफ उपलब्ध असून त्यांनी त्वरित सेवा देण्याची तयारी दर्शविली त्या दिवसा पासून आज पर्यंत डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड रुग्णा सोबतच नॉन कोविड व जिल्हा सामान्य रुग्णालयाची भूमिका पार पाडत आहे.


 *शासनाचे देयके अद्याप थकीत*

 सर्वसामान्यांचा एक गैरसमज आहे की कोविड अथवा इतर रुग्णां बाबत शासनाच्या विविध योजना आहेत त्या माध्यमाने त्वरित अनुदान मिळते परंतु महात्मा गांधी फुले योजना असो अथवा इतर मंजुरी मिळाल्यानंतर सुमारे एक ते दीड महिन्याच्या आत पेमेंट मिळते परंतु आपण बघितले की आजही शासनाच्या खर्चामध्ये आरोग्य विभागावर महाराष्ट्र शासनाचे खर्चाचे प्रमाण तिसऱ्या क्रमांकावर आहे याचा अर्थ त्यांनी वैद्यकीय संस्थांना अद्याप शासनाने अनुदान दिलेले नाही किंवा कमी प्रमाणात दिलेले असावे त्यामुळे डॉक्टर उल्हास पाटील महाविद्यालयाला सुद्धा पूर्णपणे अनुदान मिळालेले नाही.


 *रुग्णांची सेवा हेच माझे कर्तव्य -डॉक्टर पाटील*

  शनिवारी जळगाव कोविड केअर युनिट चे संस्थापक समन्वयक फारुक शेख, औशोधोपचार वाटप समितीचे प्रमुख अतिक शेख,  नशिराबाद  बिरदारीचे प्रमुख रियाज शेख व इस्माईल शेख यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलला जाऊन पाहणी, तपासणी व रुग्णां सोबत चर्चा केली असता जे खरोखरच गरीब रुग्ण होते परंतु त्यांच्याकडे योजने च्या माध्यमातून  खर्च करण्या साठी कागदपत्र नसल्यामुळे अथवा त्या कागदपत्रात तांत्रिक दुरुस्तीमुळे ते योजनेपासून वंचित राहिल्याने त्यांना खर्च करणे परवडत नव्हते म्हणून डॉक्टर उल्हास पाटील यांची भेट घेतल्यावर त्यांनी त्वरित त्या तिन्ही  लहान बाळा ची फी  माफ केली.


 *योजने च्या सवलती साठी कागदपत्र जवळ बाळगा*


 आजही समाजातील गोरगरीब व्यक्तींकडे रेशन कार्ड व आधार कार्ड नाही असल्यास त्यावर आडनाव नावांमध्ये तफावत किंवा पत्ता बदललेला असतो त्यामुळे त्या योजनेत रुग्णाला सवलत मिळत नाही.

वैद्यकीय महाविद्यालय व  हॉस्पिटल चालवण्यासाठी पैशांची सुद्धा गरज असल्याने डॉक्टर पाटील वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा पैसे आकारते त्या मुळे समाजात गैरसमज निर्माण होतो म्हणून जेव्हा आम्ही डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा ज्या ठिकाणी योजनेला शासकीय मान्यता आहे त्या ठिकाणी जाताना आपल्याजवळ आधार कार्ड रेशन कार्ड न चुकता घेऊन जाणे असे आवाहन सुद्धा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केलेले आहे.


फोटो

डॉ उल्हास पाटील यांचा गौरव कर त्यांना फारुक शेख सोबत डावीकडून इस्माईल शेख रियाज शेख अतीक शेख व जाकिर मौजन आदी दिसत आहे

Posted by India365live at 09:01 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Sunday, 18 October 2020

प्रत्येक वेळी डॉक्टरच चुकीचे असतात काय??

 *हा सूर्य हा जयद्रथ..*


*डॉ. उल्हास पाटिल यांचा त्वरित प्रतिसाद व पाठपुरावा...*


*गोदावरी मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलबद्दल मिळालेली माहिती निघाली चुकीची...*


*पत्रकारितेत आला विचित्र अनुभव,मात्र अनुभवानेच वाचवली संभाव्य चूकीची बातमी..*


कदाचित, प्रत्येक वेळेस डॉक्टर आणि रुग्णालयच चुकीचे असेल अशे नाही....


न घडलेली बातमी-

(✒️अयाज मोहसिन,रिपोर्टर 'न्यूज24' चॅनल)

----------------------------

आज दुपारी एका नॉनकोविड रुग्णा संदर्भात फोन आला की ,एक रुग्ण काल पासून गोदावरी फौंउडेशन संचलित 'डॉ.उल्हास पाटिल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल'मध्ये मृत झालेला आहे मात्र रुग्णाची परिस्थिती हलाखीची असल्याने 60,000 रु बिल भरण्याची क्षमता त्याच्या कुटुंबियांकडे  नाही,पैसे नसल्याने रुग्णालय व्यवस्थापन पेशन्ट चे पार्थिव देण्यास टाळाटाळ करित आहे.


खरं बघितलं तर कोविड च्या या महासंकट काळात ही मोठी ब्रेकिंग न्यूज ठरली असती मात्र पत्रकारिता नितीमूल्या नुसार माहिती ची शहानिशा करणे अत्यावश्यक होते.यासंदर्भात माहिती घेण्यासाठी डॉ उल्हास पाटिल यांना कॉल लावला.डॉक्टरांनी सांगितले की लगेच फॉलोअप घेऊन कॉल बॅक करतो.थोड्या वेळात जनसंपर्क अधिकारी राहुल कुळकर्णी यांचा सुध्दा फोन आला की 2 मिनिटात सर्व माहिती देतो.त्यानुसार  डॉ उल्हास पाटिल यांचा फोन आला,त्यांनी स्वतः संबंधित रुग्णाबद्दल,त्या वार्डात कार्यरत असलेले डॉक्टर यांच्याशी चर्चा केली असता धक्कादायक माहिती मिळाली की सदर रुग्ण हा जिवंत असून,तो कालच मेला ही माहिती पुर्णतः चुकीची आहे,शिवाय रुग्ण गंभीर जरी असला तरी त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत याची कल्पना नातेवाईकाना वेळोवेळी दिली जात आहे.तुम्ही स्वतः रुग्णालयात येऊन शहानिशा करू शकता...


हे ऐकून मी चकित झालो, कारण जी माहिती मला मिळाली होती ती अगदीच उलट होती.कदाचित बातमी 'ब्रेक' करण्याच्या उत्साहात न्यूज लावली गेली असती तर चुकीचा संदेश गेला असता,मात्र अनुभव अशावेळी कामी आला की थोडा वेळ उशीर झाला तरी चालेल मात्र शहानिशा न करता चुकीची बातमी लागायला नको.शिवाय डॉ उल्हास पाटिल यांनी त्वरित दखल घेत,लगेच प्रतिसाद दिल्याने गैरसमज दूर झाला.. *हा सूर्य,हा जयद्रथ*.

यानिमित्ताने पुन्हा एकदा  पत्रकारितेच्या त्या गुरुवर्यांचे स्मरण झाले ज्यांनी पत्रकारिता शिक्षणा दरम्यानच हे शिकविले होते की कुठलीही बातमी ही एकांगी न लावता योग्य ती परिपूर्ण माहिती घेऊन तसेच नैसर्गिक न्याय हक्काने दुसऱ्या बाजूला सुध्दा खुलासा सादर करण्याची पुरेपूर संधी द्यावी,हे बाळकडू पुन्हा अनुभवास आले..


कदाचित, प्रत्येक वेळेस डॉक्टर आणि रुग्णालयच चुकीचे असेल अशे नाही....


Posted by India365live at 05:20 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 23 September 2020

अब इंजेक्शन के खाली वायल भी जमा करने होंगे


 कोरोना के महासंकट काल मे कुछ हॉस्पिटल/डॉक्टर/मेडिकल/होलसेलर/बिचौलिए/नॉन लायसन्स धारी कॉविड पेशंट की मजबुरी का लाभ उठाते हुए, Remdesivir,Tocilizumab इंजेक्शन और अन्य अत्यावश्यक दवाईयो की कालाबाजारी करने की शिकायते सरकारी प्रशासन को हर दिन प्राप्त हो राही है.परिजानो की शिकायते आ रही है के कोरोना पेशंट के लिये आवश्यक इंजेक्शन मार्केट मे(मेडिकल मे) या तो उपलबद्ध नही है,या तो ब्लॅक मे दुगने तिगुणे दामो मे बेचे जा रहे है,या कुछ असप्ताल का कहना है कि ये इंजेक्शन सिर्फ उनके हॉस्पिटल मे ऍडमिट पेशंट को ही दिया जायेगा. ईस तरह के कई कारणो से पेशन्ट इंजेक्शन्स की अर्जंट सेवा प्राप्त नही कर पा रहे है.कुछ हॉस्पिटल मे ये इंजेक्शन अवेलेबल भी है,लेकिन वे पेशन्ट को ओरिजिनल बिल नही देते या फिर इंजेक्शन का ओरिजिनल रेट बिल पर लगाकर गुप्त मे अलग से पैसा ले लेते है.


इन सभी शिकायतो के चलते फूड & ड्रग्स विभाग ने एक पत्रक जारी करते हुए कडी चेतावणी जारी की है.23 सप्टेंबर,2020 को FDA के आला अधिकारी डॉ.अनिल माणिकराव ने फर्मान जारी किया है के ---प्रिस्क्रिप्शन अपडेटेड हो,हॉस्पिटल के लेटरहेड पर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर की सिग्नेचर और सिक्का लगा हो.इसके अलावा सभी अत्यावश्यक कागझ (कोविड पोजिटीव्ह रिपोर्ट, आधार कार्ड,प्रिस्क्रिप्शन) रजिस्टर्ड फार्मासिस्ट को देकर,कितने इंजेक्शन लिये ईसका सप्लाईड की मोहर लगाकर, लिगल बिल लेकर ही इंजेक्शन खरीदे.Remdesivir/Tocilizumab इंजेक्शन पेशन्ट को लगाने के बाद,पेशन्ट या परिजनो को खाली बचे हुए वायल लौटाने होगे,और उनका रेकॉर्ड जतन करना होगा.

अगर इन सुचनाओ का उल्लंघन कोई हॉस्पिटल/डॉक्टर/मेडिकल/होलसेलर/या कोई बिचोलीया करता है तो उसकी शिकायत FDA अथवा जिलाधिकारी,इनसिडन्ट कमांडर,नोडल अधिकारी,स्वास्थ अधिकारी अथवा संबंधित विभाग या अधिकारी से की जा सकती है.

Posted by India365live at 09:01 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 21 September 2020

सावधान कोविड रुग्णांना लुटनाऱ्यांनो

 *सावधान,कोविड रूग्णांना लुटणाऱ्यांनो*


(इंडिया365,---9273403088)


*कोविडच्या औषधांचा काळाबाजार करणा-यांविरुध्द* 

*कारवाईचे अधिकार आता इंन्सिडंट कमाडंरला*

  जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) - जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 या विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-यांविरुध्द कारवाई करण्याचे अधिकार आता जळगाव जिल्ह्यातील सर्व इंन्सिडंट कमांडर (Incident Commander) यांना प्रदान करण्यात आले आहे. तसे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे. 

  कोविड-19 या विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-या होलसेल, किरकोळ औषध विक्रेते, डॉक्टर्स, रुग्णालये व अन्य इतर संबंधित आस्थापना यांचेविरुध्द सापळा रचून अथवा अचानक धाडी टाकून सर्व इंन्सिडंट कमांडर (Incident Commander) व संबधित कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणी औषधांचा काळाबाजार अथवा साठेबाजी होते अगर कसे, याची खात्री करावी. संबंधित ठिकाणी औषधाची साठेबाजी, काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याबाबतची सविस्तर माहिती सर्व इंन्सिडंट कमांडर व संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांनी औषधी निरीक्षक ( Drug Inspecter) अन्न व औषध प्रशासन,  जळगाव यांना तात्काळ द्यावी. 

  जळगाव जिल्ह्या वर नमूद केल्याप्रमाणे जर कोणी कोविड -19 शी संबंधित औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर भा.द.वि. कलम 420 जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 परिच्छेद 26 Drugs Price Control Order 2013 जीवनाश्यक वस्तू कायदा कलम 3 (2) (C) नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई औषध निरीक्षक (Drug Inspecter) अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांना तात्काळ करावी. जळगाव जिल्ह्यातील सर्व औषधी मालाचे किरकोळ व ठोक व्यापारी/दुकानदार यांनी त्यांच्याकडून विकल्या जाणा-या प्रत्येक औषधींची लेखी  पावती (बील) प्रत्येक ग्राहकास देणे बंधनकारक आहे. 

  जळगाव जिल्ह्यातील सर्व औषधी मालाचे किरकोळ व ठोक व्यापारी/दुकानदार यांनी ग्राहकास जादा दराने औषधांची विक्री करण्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द देखील भा.द.वि. कलम 420 जीवनाश्यक वस्तू कायदा 1955 परिच्छेद 26, Drugs Price Control Oder 2013 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 (2)  (C) नुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई औषधी निरीक्षक (Drug Inspecter) अन्न व औषध प्रशासन यांनी तात्काळ करावी. 

  या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 आपत्ती  व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव श्री. राऊत यांनी आदेशात म्हटले आहे. 

00000

Posted by India365live at 05:24 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

चितळे उद्योग समूहातर्फे राज्यातील 10 मान्यवरांचा 'बाप्पा ची मूषक सेना म्हणून गौरव,फारूक शेख यांचा मोठा सन्मान'

 (मनीषा बागुल- एच आय व्ही सह जगणारी व अध्यक्ष जाणीव संघटना- जळगाव- मो 9518515561-- यांजकडून)


*बाप्पाची मूषक सेना द्वारे जळगाव चे फारुक शेख सन्मानित*


राज्यातील १० पुरस्कारथी मध्ये एकमेव मुस्लिम


जळगाव शहरातील क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये कायमच चर्चेत असणारं एकमेव नाव म्हणजे फारूक शेख


 जळगाव शहरातील मुस्लिम इदगाह व  कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी, जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीचे अध्यक्ष व जळगाव कोविड केअर युनिटचे समन्वयक तथा प्रसिद्धीप्रमुख *विशेष म्हणजे डब्ल्यूएचओ आणि महाराष्ट्र शासनाने पन्नास वर्षांवरील व्यक्ती आणि मधुमेहाच्या रुग्णांनी घराच्या बाहेर न पडता घरातच स्वतःला सुरक्षित ठेवावे अशी सूचना दिलेली असतांना देखील फारुक शेख हे २६ वर्षा पासून मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांचे वय  ५९ वर्ष आहे तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आपणही काही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून  या कोरोना महामारी च्या झंजावती वादळात आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून गरीब,कष्टकरी वर्गाला आपल्या मदतीची ज्योत अखंडपणे तेवत ठेवली*  लॉकडाऊन पासून आज घडीपर्यंत एक कोरोणा योद्धा म्हणून सातत्याने कार्य पार पाडत आहे.


 गरिबांसाठी, रुग्णांसाठी ,कोरोना रुग्ण व कोरोना बाधित मृता साठी

जंग जंग पछाडत आहेत अशा या  अवलियाचा चितळे उद्योग समूहाने बाप्पाची मूषक सेना द्वारे सलाम करून त्यांना स्मृतिचिन्ह  व प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.


 महाराष्ट्र राज्यातील फक्त दहा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यात एकमेव मुस्लिम समाजातील शेख हे होय.


*फारुक शेख यांनी कधीच जातीच्या चौकटीमध्ये काम न करतात् त्यांची नेहमीच सर्वसमावेशक अशी भूमिका राहिलेली आहे. एच आय व्ही च्या सुमारे ३०० बालकांचे पालक म्हणून ते पाच वर्षां पासून सेवा देत आहे म्हणूनच त्यांना या अगोदरही अनेक सामाजिक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे*.


 कोरोना च्या संकटकाळात अनेक घटक कार्यरत असून सामाजिक क्षेत्रातील असंख्य संघटना व व्यक्ती तर अधिक काम करून समाजात आदर्श उदाहरण निर्माण करीत आहे त्यात  जळगावकरांना क्रीडा क्षेत्राशी अवगत असलेले  फारुक शेख अब्दुल्ला हे आज कोरोना योध्दा म्हणून परिचित झालेले आहे. 


 जळगावातील कोरोना बाधित आणि मृत्यू पावलेले प्रथम दोन्ही  इसम म्हणजे मेहरुण व  सालार नगर मधील मुस्लिम समाजाचे होते. व त्यातल्या त्यात म्हणजे  शेख यांच्या घरातीलच एक नव्हे तर दोन सख्खे मेहुणे  ठाणे व जळगाव येथील (मोठी बहीण व लहान बहिणीचे पती ) हे सुद्धा कोरोना आजाराने मृत पावले परंतु ते दुःख कवटाळत न बसता घरातील कोरोना ने मृत झालेल्या व्यक्तीच्या वेदना काय असतात या जाणिवेतून आपण समाजासाठी काहीतरी करावे म्हणूनच त्यांनी जळगावात सर्व सामाजिक संघटनांना एकत्रित करून जळगाव केअर युनिट ची स्थापना केली .


*मेडिकल सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिरे*

 जळगाव कोविड केअर युनिट च्या माध्यमाने सर्वप्रथम जळगाव शहरात व ग्रामीण भागातील खास करून मुस्लिम समाजातील लोकांची व त्या समाजात जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची भीती दूर करण्यासाठी त्यांनी  ठीक ठिकाणी कौटुंबिक सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले त्याद्वारे समुपदेश व मोफत औषधी यांचे वाटप केले सुमारे पंचवीस शिबिराच्या माध्यमातून पन्नास ते साठ हजार रुग्णांना औषधे दिली तर जे काही या कोरोना चे संशयास्पद आढळून आले त्यांच्यावर औषधोपचार करुन त्यांना बरे करण्यात आले. सुमारे सव्वा ते दीड लाख कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले व त्यांच्या मनातील भीती दूर केली त्याच प्रमाणे डॉक्टरांच्या मदतीने वार्ड क्लिनिक सुरु करण्यास डॉक्टरांना प्रोत्साहित केले.


*डॉक्टर व दवाखाने बाबत दक्षता*

ज्या रुग्णावर उपचार सुरू आहे,त्यांच्या उपचारावर,तसेच दवाखाने व तेथील सेवा सवलती बाबत एवढेच नव्हेतर वेळप्रसंगी निष्काळजीपणा करणारे डॉक्टर व दवाखाने बाबत ची लेखी तक्रार सुद्धा शेख करीत आहेत.



लॉक डाउन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना त्यांनी

*हजारो कुटुंबीयांना रेशन किट वाटप*


 लॉकडाउनच्या काळात फारुक शेख यांनी जळगाव जिल्हा मानियार बिरादरी च्या हे माध्यमाने शहरात व ग्रामीण भागात सुमारे ३५२५ कुटुंबीयांना रेशन  किट वाटप केले होते त्यात गहू, तांदूळ ,दाळ, गोडेतेल ,साखर, चहा व  चटणी इत्यादींचा समावेश होता.


*शेकडो बाधितांचा दफन विधी*


 जळगाव मुस्लिम कब्रस्तान चे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत असल्याने दफनविधी ची मुख्य जबाबदारी सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडे आली व कोरोना पॉझिटिव रुग्णाचा दफन विधी चा पहिला अनुभव जळगाव कर म्हणून त्यांना आला शहरातील दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तिसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याने  त्या डेथ बॉडी ला कब्रस्तान मध्ये मनपा चालकाने  शव वाहिके द्वारे आणले व तो चालक  आपल्या वाहनापासून स्वतःह १०० मीटर लांब जाऊन उभे राहून गेले. त्या ठिकाणी आलेले एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा ३०० मीटर लांब जाऊन उभे राहीले. अशावेळी फक्त मयत व्यक्तीचे तीन मुलं, फारुक शेख त्यांचे सहकारी अनिस शाह  यांनी त्या मृताचे दफनविधी केले तेव्हा मनातील भीती दूर झाली व आजपर्यंत शेकडो पॉझिटिव्ह कोरोना बाधित मृतांचे दफन विधी केले आहे व करीत राहणारआहे.

कबरस्थान ट्रस्ट च्या कार्याची दखल मनपा वेळो वेळी घेत असून आज पर्यंत एकही मृत व्यक्तीच्या नाते वाईकांची तक्रार नाही वा नकारात्मक बातमी सुद्धा नाही.


 *कोरोना योध्दा म्हणून अनेक संस्थांनी केले सन्मानित*


फारूक शेख  हे ज्या संघटना मार्फत कार्य करीत  आहे त्याच्या या कार्याची दखल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका, तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेस, वेल्फेअर मेमन (डब्ल्यू एम ओ) मुंबई , होप फाउंडेशन नाशिक व वर्ड मेमन ऑर्गनायझेशन (एन आय सी ), दुबई. सह नुकतेच पुणे येथील उत्सव विघ्नहर्त्याचा बाप्पांच्या मूषक सेनेच्या सेनेचा हा चितळे उद्योग समूहाने शेख यांचा गौरव करताना प्रमाणित केले आहे की *आजच्या आपमतलबी जगात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना मदत करणे, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी हात देण ही भावना दुर्मिळ झाली आहे. परंतु आपण सर्व एकाच समाजात राहतो म्हणून समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे हे आपण कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात काम करून दाखवून दिलंत. आपण केलेल्या कार्याला आमचे अभिवादन*

 म्हणून भागीदार चितळे उद्योग समूहाचे संजय चितळे यांनी त्यांचा गौरव केलेला आहे.


 *सेवा ही  "सलह" म्हणजे ईश्वर सेवा होय*

फारुक शेख म्हणतात की भुकेलेल्याना अन्न -जेवण देणे, रुग्णाची सेवा व काळजी घेणे, मृतांचे दफन विधी करणे हे इस्लाम धर्मात अत्यंत चांगले व पवित्र असे सेवाकार्य म्हणून पवित्र कुराणात व अंतिम प्रेषित यांच्या जीवन चारित्रा वरून दिसून येते  व त्याचे पुण्य मोठया प्रमाणात मिळते या तत्त्वानुसार आम्ही  हे कार्य करीत असून त्यात मला अनुभवाच्या च्या आधारे जास्त काम करण्याचे श्रेय मिळत असल्याने इतर संस्था मला वैयक्तिक पुरस्कार देत आहे. वास्तविक तो माझा एकट्याचा पुरस्कार नसून सर्वांचा आहे. आम्ही कधीच ,कोणत्याही जातीपातीचा किंवा धर्म व पंथाचा विचार करत नाही. माणुसकीचा, रुग्णसेवेचा, आपला धर्म आधी पाळायला हवा असे फारूक शेख यांना वाटते.



मानियार बिरादरी असो इदगाह कब्रस्तान ट्रस्ट असो की जळगाव कोविड केअर युनिट असो या तिन्ही संघटना विविध प्रकारे सेवा करीत आहे म्हणूनच जीवाची परवा न करता *"ईश भय"**ठेवून माणुसकीच्या धर्मासाठी आम्ही काम करीत असलो तरी इतरांच्या तुलनेत आमचे व माझे योगदान खूपच कमी असल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

 या समाज कार्या साठी मुफ्ती अतिकउर रहेमान,हाजी गफ्फार मलिक,मजीद राणाणी, सैयद चाँद,डॉ जावेद,अनिस शाह, आबीद हारून,सलीम शेख,डॉ सुयोग चौधरी,डॉ मंधान पंडित व सर्व बीयूएमएस डॉक्टर  सह आपले पूर्ण कुटुंबीयांचे सुद्धा आभार मानले आहे.

Posted by India365live at 03:59 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 14 July 2020

बकरी ईद बद्दल सरकार ची भूमिका

*कोरोनाविरुद्धचा मुकाबला जोरात सुरू*

*बकरी ईद बद्दल बैठक*

  *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत सर्व संबंधितांचे एकमत* 

            मुंबई दि १४ : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
      बकरी ईद संदर्भात आज आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी देखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी, असे आवाहन केले.
        मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
       यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको.
*उपमुख्यमंत्री*
            महाराष्ट्रातील सर्व जनतेने जात-पात, धर्म-पंथ न मानता कोरोना विरुद्धच्या लढ्यात जे सहकार्य केले, केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यासाठी ज्या यंत्रणा लढल्या, जीवाची जोखीम पत्करली, त्यांचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आभार मानले. ते म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळाले. बकरी ईदमध्ये देखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरे करावी. सण साजरे करताना आरोग्याचा विचार देखील करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
*गृहमंत्री*
गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, कोरोना साथरोगाविरुद्ध लढाई लढताना गेल्या चार महिन्यात जे
सण-उत्सव आले त्यात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य बकरी ईद निमित्त करावे. साधेपणाने हा सण साजरा करावा. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल. कंटेंनमेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसेच पोलीसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी.

   या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार सर्वश्री अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्धीकी यांनी यावेळी मत व्यक्त करून आवश्यक सूचना मांडल्या.

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस. चहल, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

००००
Posted by India365live at 10:14 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

देशमुख यांना भावपूर्ण श्रधान्जली

* *मोहम्मद जाहिद देशमुख यांना विविध संघटनांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*

 जळगाव येथील देशमुख ऍड्वर टाईज चे मालक,मील्लत एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव जिल्ह्याचे ३५ वर्ष अध्यक्षपदी राहिलेले मोहम्मद जाहीद देशमुख यांचा वृद्धापकाळाने १० जुलै रोजी जळगाव येथील त्यांच्या रहाता घरी शनी पेठ येथे निधन झाल.

  आज जळगाव शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांतर्फे त्यांना  भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी फैजपूर येथील तथा महाराष्ट्र प्रदेश चे जमात ए इस्लामीचे प्रमुख अब्दुल रऊफ हे होते.
व्यास पिठावर मुफ्ती अतिकुर रहेमान, गफ्फार मलिक,डॉ अमानउल्लाह शहा,अब्दुल समी, अल्लाउद्दीन सेठ,करीम सालार, फारूक शेख,मुश्ताक मिर्झा, आरिफ देशमुख,साजिद देशमुख,डॉ जावेद शेख आदी होते.

 या सभेचे आयोजन जमियत उलमा ए हिंद,जमात ए इस्लामी, कुल जमाती कौन्सिल, वाहिदात ए इस्लामी, मुस्लिम ईदगाह ट्रस्ट, व एमपीजे यांच्या माध्यमाने ईदगाह  मस्जिद मध्ये करण्यात आले होते.
 या सभेत  येणाऱ्या लोकांचे हात द्वार वर सानिटायझेर करून घेण्यात आले तसेच त्यांना काही सामाजिक अंतर ठेवून बसवण्यात आले होते.
 व्यासपीठावरील खुर्च्या  सुद्धा सामायिक अंतरावर ठेवण्यात आल्या होत्या.
 कार्यक्रमाची सुरुवात मील्ली अहद यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली.

 यात खालील वक्त्यांनी मोहम्मद जाहिद देशमुख यांच्या आठवणी थोडक्यात विशद केल्या त्यात प्रामुख्याने मौलाना अहद मिल्ली,सोहेल अमीर , ज़ाकिर ख़ान सर,मुश्ताक़ मिर्ज़ा, इकबाल शाह,फारूक शेख,डॉ. अमानुल्लाह शाह, जमील देशपांडे, अब्दुल करीम सालार,अब्दुल समी खान,सैय्यद चाँद अमीर,अलाउद्दिन सेठ,अलहाज अब्दुल गफ्फार मालिक,मुफ़्ती अतिकुर्ररहमान,आरिफ देशमुख,जावेद देशमुख, अब्दुल रऊफ शेख, आदी ची भाषणे झाली.
यात प्रामुख्याने डॉ प्रो एम इकबाल,इंजिनिर अल्तामश खान,  ताजुद्दीन शेख,फरीद शेख,आबिद शेख,अझीझ सालार,सलीम मानियार,नदीम काझी,ताहेर शेख,तय्यब शेख,अहेमद सर,महेमुद खान,आदी उपस्थित होते
 या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जावेद शेख यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिस शहा, महमूद खान, फारुक शेख, मोहसिन सय्यद ,जाकीर खान व मुस्ताक मिर्झा आदींनी प्रयत्न केले.
Posted by India365live at 06:53 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

ईकरा यूनानी कॉलेज मधे 50 ऑक्सीजन युक्त बेड,100 आइसोलेशन.

*इकरा युनानी महाविद्यालयातील *
*डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी*
*कोरोना बाधित रुग्णांसाठी ५० ऑक्सिजनयुक्त बेड तर* 
*१०० व्यक्तींसाठी अलगीकरणाची सुविधा उपलब्ध *
  जळगाव, (जिमाका) दि. १४ - जिल्ह्यातील कोरानाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावे. याकरीता जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावे याकरीता प्रशासनाने येथील इकरा युनानी महाविद्यालयात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार केले आहे. याठिकाणी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, इकरा एज्युकेशन सोसायटी व विविध सामाजिक संस्था, व दानशूर व्यक्तींच्या मदतीने ५० ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्यात आले असून ५० बेडची सुविधा तयार करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय याठिकाणी १०० व्यक्तींच्या अलगीकरणाचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 
  या हॉस्पिटलला आज सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन येथील सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच याठिकाणी आवश्यक असणारा वैद्यकीय स्टॉफ जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपलब्ध करुन दिला असून अजून आवश्यकता भासल्यास स्टाफ देण्याच्या सुचना संबंधितांना केल्यात. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्या बाधित रुग्णांना कोरोनाची मध्यम व सौम्य लक्षणे आहेत, परंतु त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात तीव्र लक्षणे असणाऱ्या ५० रुग्णांना बेड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याठिकाणी दाखल होणाऱ्या रुगणांवर चांगल्या प्रकारचे उपचार करतानाच त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा, चहा, नाश्ता, जेवण चांगल्या दर्जाचे व वेळेवर उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही  श्री. राऊत यांनी सर्व संबंधितांना दिलेत. 
  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकणी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांचेसह इकरा एज्युकेशन सोसायटीचे अब्दुल करीम सालार, अब्दुल गफार मलीक, इक्बाल शाह, रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेनन, अनिल कांकरीया, डॉ. शोएब शेख आदि उपस्थित होते. 
  यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या हस्ते कोविड हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मदत करणारे तसेच जिल्ह्यातील नागरीकांना मोफत वाटप करण्यात येणाऱ्या आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांच्या निर्मितीसाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कोविड हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कौतुक करुन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलसाठी दानशूर व्यक्तींने पुढे येण्याचे आवाहन केले. 

Posted by India365live at 05:23 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 9 July 2020

दुबे का ENCOUNTER

*आखीरकार विकास दुबे का Encounter*

8 पुलिसकर्मियों की हत्या का मुख्य आरोपी विकास दुबे को कानपुर ला रही STF टीम की गाड़ी पलट गई। इस बीच सूत्रों के हवाले से खबर आ रही है कि गाड़ी पलटने के बाद विकास दुबे ने पुलिसकर्मियों से हथियार छीनकर भागने की कोशिश की और वह मुठभेड़ में मारा गया है। हालांकि, अभी आधिकारिक पुष्टि नहीं हुई है।
गाड़ी में मौजूद एसटीएफ के दो कर्मचारी भी घायल हुए हैं। घायलों को हैलेट अस्पताल पहुंचाया गया है। विकास दुबे को भी अस्पताल लागाय गया है। वह जिंदा है या मारा जा चुका है अभी पुलिस ने इसकी आधिकारिक पुष्टि नहीं की है। बताया जा रहा है कि जिस गाड़ी में विकास दुबे वह गाड़ी कानपुर में एंट्री करते ही पलट गई। इस गाड़ी में एसटीएफ के जवान मौजूद थे। इस हादसे में सभी घायलों को अस्पताल ले जाया गया।
Posted by India365live at 19:45 2 comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

आसमा आणि अंतरा या महाराष्ट्र कन्याचा गृहमंत्री यांना अभिमान

सहाय्यक
विक्रीकर आयुक्त या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेली नांदेडच्या पोलीस वाहनचालकांची कन्या आस्मा आणि अंतराळात झेप घेऊन फायटर पायलट झालेली नागपूरची कन्या अंतरा मेहता. या दोन्ही महाराष्ट्र कन्यांचा आम्हाला सदैव अभिमान आहे, अशा शब्दात या दोघींचे कौतुक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
नांदेड पोलीस दलामध्ये वाहनचालक या पदावर कार्यरत असलेले सय्यद जहीर अहमद यांची कन्या आस्मा हिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवून, तिची निवड सहायक विक्रीकर आयुक्त या पदी झाली याचा खूप आनंद व अभिमान वाटला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आस्माच्या  घरी दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नागपूरची कन्या

त्याचप्रमाणे नागपूरची कन्या अंतरा मेहता हिची संरक्षण दलात फायटर पायलट म्हणून निवड झाली. त्याबद्दल तिचे कौतुक गृहमंत्र्यांनी फोन करून केले. या दोघींचीही ते लवकरच भेट घेणार आहेत.
राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गृहमंत्री या नात्याने मी कुटुंबप्रमुख आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या  सुख दुःखात  सहभागी होण्याचा मी प्रयत्न करत आहे. पोलीस दलातील नोकरी सांभाळत आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण व उच्च ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मला अभिमान आहे, त्यांचे कौतुक आहे, अशा भावना गृहमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
तसेच अंतरा ही आमच्या नागपूरची कन्या असल्याने तिचाही खूप अभिमान आहे. अंतरा ही आपल्या राज्यातील पहिली महिला फायटर पायलट असून ती देशात दहावी आली आहे. तिच्या वडिलांनाही मी फोन करून शुभेच्छा दिल्या आणि अंतरालाही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन कौतुक केले.
आपल्या राज्यातील असे  कौतुकास्पद काम करणाऱ्या युवांचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप  आपण द्यायला हवी. त्यामुळे निश्चितच त्यांचे मनोबल वाढेल आत्मविश्वास वाढेल असे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.
Posted by India365live at 11:29 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

*शाहरुख खान के यहा से बिडी चोरी,मची खलबली..*

कोरोना संकट काल मे कौन कब मौका देखकर चौका मारेंगा कुछ कह नही सकते.जाने माने व्यक्ती शाहरुख खान जो मेहनत मशकक्त से रोज कमाते रोज खाते इनको भी ईस काल मे परेशान होना पडा है.लॉक डॉउन से पाकिटमार,उठाईगिर,सेंधमार,घरफोडे भी परेशान है,और छोटी मोटी चोरी कर के अपना और अपने परिवार के पेट पाल रहे है.शाहरुख खान की शॉप से बिडी,साबून, खाने की चिजे किसीं 420 व्यक्ती ने चुराते हुए कुल 5,420 रुपयो का फटका शाहरुख खान को दिया है.हालाकी ये बडी अमोउंट नही है मगर,मंदी के दौर मे और  अनलॉक के चलते ये शाहरुख खान जैसे गरिब इंसान के लिये बडा फटका है.

चोरी हुआ माल ईस प्रकार है,बिडी 1200 ₹,तेल 450,साबून 300,ईसी के साथ शेव चुडा, आचार,पेठा चुराये जाने से अज्ञात चोर निश्चित ही नंगा भुका होगा ये अनुमान लगाया जा रहा है.


बहरहाल शाहरुख खान की शिकायत पर रावेर पुलिस ने मदिना कॉलोनी स्थित ,शाहरुख खान की किराणा दुकान पर मुआयना करने पश्चात चोरी का गुनाह दाखल कर लिया है.
Posted by India365live at 08:22 4 comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 16 June 2020

मेहरून येथील कोरोना योध्दा सन्मान...

*कोरोना युद्धात 'फ्रंटलाइन वॉरियर',मेहरून च्या डॉक्टरांची मान्यवरांनी थोपटली पाठ...*

मेहरून-जळगाव ("इंडिया365,विशेष वृत्त-अयाज़ मोहसिन).कोरोना च्या या वैश्विक संकट काळात स्वतःचे जिव धोक्यात असून सुद्धा चिकाटीने आपला रुग्णसेवेचा वसा न सोडता अविरत आपल्या डॉक्टरी पेशाला प्रामाणिक राहून सेवा करणारे,मेहरून परिसरातील विविध डॉक्टरांच्या दवाखान्याला जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरानी सदिच्छा भेट दिली.कोरोना सदृश, संशयित आणि भयभीत झालेल्या रुग्णांना फक्त योग्य औषधोपचारच नव्हे तर त्यांना समुचित मानसिक आधार,परिपूर्ण मार्गदर्शन आणि मनोधैर्य वाढविण्याचे उत्तम कार्य मेहरून भागातील डॉक्टर करित आहेत.या वेळी डॉ मोईज देशपांडे यांच्या *'देशपांडे हॉस्पिटल'* (मेहरून) मध्ये वैद्यकीय ज्ञानाला आपल्या अनुभवांची जोड देत अलोपॅथी, होमिओपॅथी आणि युनानी औषध यांचा त्रिवेणी संगम साधत ते उपचार करित आहेत. त्यांचा हाताला उत्तम गुण आहे अशी भावना अनेकांनी "इंडिया365" या वृत्तवाहिनी कडे व्यक्त केली आहे. सदर शिष्टमंडळाने हॉस्पिटलमध्ये भेट दिली असता डॉक्टरांनी सर्जिकल अप्रोन,डबल हँड ग्लोव्हज, ग्लास मास्क,सानिटायजर,इत्यादि सुरक्षा साधनांनी सज्ज होते.रुग्णालयात शारीरिक अंतर राखण्याच्या सक्त सूचना आणि पालन केले जात आहे.हा दवाखाना मेहरून आणि रामेश्वर कॉलोनी येथून समानंतर असल्याने हिंदु-मुस्लिम समाजातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी दाखल होतात आणि समाधान व्यक्त करतात.या वेळी डॉक्टर मोईज यांनी शिष्टमंडळाला मेहरून परिसरात रुग्णसेवा करणाऱ्या विविध कोरोना योध्दा डॉक्टर आणि त्यांच्या सेवा संदर्भात परिपूर्ण माहिती दिली.मान्यवरांनी मेहरून परिसरातील जे,जे डॉक्टर जिव धोक्यात घालून रुग्णांचे उपचार करीत आहेत,अश्या सर्व डॉक्टरांचे मनपूर्वक कौतुक केले.

  • सदर शिष्टमंडळाने विविध  डॉक्टरांची कार्यशैली जाणून घेत,त्यांचे भरभरून कौतुक करत  त्यांचे अभिनंदन केले व काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.ईकरा शैक्षणिक-वैद्यकीय संस्था अध्यक्ष करिम सालार,एटीएम संस्थाध्यक्ष गफ्फार मलिक,अल फैज संघटनेचे अजिज सालार,जन नायक संघटन फिरोज आणि फरीद,सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक डॉ रिजवान खाटिक,सामाजिक कार्यकर्ते फिरोज खान मुलतानी,किरण पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Posted by India365live at 09:36 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 11 June 2020

Ffjj

Posted by India365live at 06:53 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

कड़क लॉकडॉउन होणार ही अफवाच

*15 जूनपासून जळगावात कडकडीत बंद राहणार असल्याचे वृत्त चुकीचे*

*अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

(रिपोर्ट-ब्लॉगर अयाज मोहसिन,मुख्य संपादक 'इंडिया365).

जळगाव, दि. 11- येत्या 15 जूनपासून 30 जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे वृत्त निखालस खोटे व चुकीचे आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने खुलासा करण्यात येत आहे की, जिल्हा प्रशासनाच्यावतीने अद्याप असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

त्याचबरोबर या वृत्तामध्ये नागरिकांनी महत्त्वाचे सामान व पेट्रोल भरणे त्याचबरोबर जिल्ह्यात सीआरपीएफ आणि मिलिटरीचे जवान बोलविण्यात येणार असल्याचीही अफवा पसरविण्यात येत आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे नागरिकांनी वस्तुंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये.

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

त्याचबरोबर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होईल अशा खोट्या अफवा व संदेश  कोणीही पसरवू नये. जे कोणी असे खोटे मेसेज पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करतील. त्यांच्यावर सायबर कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला आहे.

000000
Posted by India365live at 06:27 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Friday, 5 June 2020

चिकन मधे कोरोनापेक्षा महाभयंकर वायरस फेक

मुंबई दि.५ पोल्ट्रीमध्ये कोरोना विषाणूपेक्षा भयंकर असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता असून त्यामुळे मानव समूहामध्ये कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यता अमेरिकेतील आहारतज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांचा हवाला देऊन एका वृत्तवाहिनीद्वारे बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी सांगितले.

ॲपोकॅलिप्टीक व्हायरस असे शास्त्रीय नाव असणारा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसून ॲपोकॅलिप्टीक या शब्दाचा अर्थ जगाचा विनाश करणारा असा असून डॉ. मायकल यांनी तो त्या अर्थाने वापरला असावा. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार ॲपोकॅलिप्टीक व्हायरस नावाचा विषाणूंचा आंतरराष्ट्रीय पातळीवार पशूंमधील रोगांचे संनिरिक्षण करणाऱ्या ओआयई संस्थेने नमूद केलेल्या कोबड्यांना बाधित करणाऱ्या विषाणूंच्या यादीमध्ये समावेश नसल्याचे श्री. अनुप कुमारयांनी म्हटले आहे.

डॉ. मायकल ग्रेगर यांच्या लिखीत पुस्तकावर आधारित आहे व डॉ. मायकल ग्रेगर हे आहारतज्ज्ञ असून मानवी स्वास्थ तज्ज्ञ नसल्याचे व सदरील बातमी शास्त्रीयदृष्ट्या शहानिशा न करता प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. यावरून असे लक्षात येते की, ॲपोकॅलिप्टीक व्हायरस आजमितीस अस्तित्वात नसल्याचे व भविष्यात असा एखादा व्हायरस येऊ शकतो अशी कल्पना डॉ. मायकल यांनी मांडल्याचे दिसून येत असल्याचे श्री. अनुप कुमार यांनी सांगितले.

Posted by India365live at 09:58 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

कोरोना रुग्नसेवक-अनिस शाह,मानवता का मसिहा

*कोरोना संसर्गित रुग्णाची सेवा व  मृत्यू देहा चा "अनीस शाह " करतो दफन विधि*

*ईदगाह ट्रस्ट तर्फे गौरव*

 जळगाव जिल्ह्यात कोरोणाचा फैलाव वाढल्याने नागरिकांच्या मनात व खास करून अल्पसंख्यांक समाजात भीती पसरली आहे अशावेळी कोरोना ने कोणाचे निधन झाले तर संसर्गाच्या भीतीने अंत्यसंस्काराला  डेथ बॉडी घेण्यासाठी नातेवाईक सुद्धा पुढे येत नाही अशा स्थितीत गेल्या  तीन महिन्यापासून ४० वर्षीय अनिस शाह  अय्यूब शाह,हा मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टचा सहसचिव असून सुद्धा त्याने अंदाजे आता पावेतो अनेक म्हणजे जलगावत जे दफन झाले त्या सर्व मृतदेहांवर दफनविधी करणार म्हणजे आमचा अनीस शाह एवढेच नव्हे तर  कोरोना रुग्णास सोबत आपुलकीने वागणारा त्यांना सहकार्य करणारा वेळप्रसंगी त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त स्वतः ॲम्बुलन्सचळवून घेऊन जाणे त्याच्यात  स्वतः प्रेत ताब्यात घेणे तेथून ते कब्रस्तान ला आणणे व कफन लपटून त्याचा दफनविधी करणे हे सर्व कामे तो स्वेच्छेने व फक्त अल्लाच्या मर्जी साठी करीत असून त्याच्या कार्यात तिची धर्मपत्नी फर्जानाच्या ही तिला   मनावर दगड ठेऊन सहकार्य करीत आहे  ती  फक्त अल्ला खूष करण्यासाठी  म्हणून ईदगाह ट्रस्ट च्या विशेष सभेत सचिव फारूक शेख यांनी त्यांच्या या कार्याची महिती सादर करून त्याचा अभिनंदनाच ठराव पारित केला.

*मालिक फाउंडेशन तर्फे पी पी ई किट तर ट्रस्ट तर्फे शाल,व प्रमाणपत्र*


 जळगाव मुस्लिम  ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे लॉक डाऊन असल्यामुळे एका छोटेखानी कार्यक्रमात त्याला शाल व पीपीई कीट देऊन ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांच्या हस्ते अनीस शाह यास गौरविण्यात आले त्यावेळी मुस्ताक अली सय्यद ,अश्फाक बागवान, नाजिर मुलतानी , ताहेर शेख मजहर शेख, इक़बाल बागवान एडवोकेट सलीम शेख व विशेष आमंत्रित म्हणून अब्दुल वाहाब मलिक उपस्थित होते.

*ट्रस्ट तर्फे शासनास विनंती*

 ट्रस्ट च्या सभेत अनिस शाह अय्यूब शाह, कबर साठी खड्डा करणारे शब्‍बीर पटेल व मृतदेहावर अंत्यसंस्काराला मदत करणारे इसाक बागवान यांना शासनाने महानगरपालिकेच्या अथवा आरोग्य सेवेच्या आस्थापनावर मानसेवी कर्मचारी म्हणून घेण्यात यावे असा ठराव फारुक शेख यांनी मांडला असता त्यास सर्वांनी एक मताने मंजुरी दिली. अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी सदरचा ठराव शासनाला तसेच जिल्हाधिकारी यांना पाठवण्याचे व आपल्या परीने त्यावर सकारात्मक निर्णय होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

 फोटो कॅप्शन 
अनीस शाह यांचा सत्कार करताना गफ्फार मलिक व फारुक शेख दिसत असून सोबत
डावी कडून अताउल्लाह खान,सलीम शेख, नाजिर मुलतानी,अशफाक बागवान, सैय्यद मुश्ताक,ताहेर शेख व इक़बाल बागवान आदी दीसत आहे.
Posted by India365live at 09:18 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 27 May 2020

कोरोना-आता जामनेर,पहुर ला पोहचला कोरोना

जळगाव, जामनेर, पहूर, रावेर येथील 22 अहवाल प्राप्त. 17 अहवाल निगेटिव्ह तर 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पहूर येथील दोन व्यक्तींचा तर जळगाव, जामनेर व रावेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.    
                                                              जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 528 झाली आहे. त्यापैकी 218 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
Posted by India365live at 21:51 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 25 May 2020

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले मुस्लिम समाजाचे कौतुक,कोरोना विरोधात मुस्लिम बांधवांचे महान योगदान

इचलकरंजीच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू; मुख्यमंत्र्यांनी केले ऑनलाईन लोकार्पण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रशंसा

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) – कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून  कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

Maha Info Corona Website

इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची रुपये 36 लाखांची रक्कम कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी दिली. या रकमेतून इंदिरा गांधी असामान्य रुग्णालयात 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे. रमजान ईदचे औचित्य साधून याचे लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे संवाद साधताना म्हणाले, इचलकरंजीतील मुस्लिम समाजाने याद्वारे एक मोठा आदर्श देशासमोर ठेवला आहे. आत्तापर्यंत आपण सर्वांनी मिळून कोरोनाला धैर्याने आणि संयमाने रोखून ठेवले आहे. इथून पुढे लोकसहभाग गरजेचा आहे. सण कसा साजरा करायचा याचे उत्तम उदाहरण मुस्लिम समाजाने सर्वांना दाखवून दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुस्लिम समाजाच्या कार्याचे कौतुक करून रुग्णालय सर्वच सुविधांनी सुसज्ज करण्याचे आश्‍वासन दिले.

प्रारंभी सलीम अत्तार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार राजू आवळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, तहसिलदार प्रदिप उबाळे आदी उपस्थित होते.

अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी कैश बागवान, रफिक मुजावर, इरफान बागवान, अजीज खान, कुतबुद्दीन मोमीन, सलीम अत्तार, तौफिक मुजावर, अबु पानारी, इम्रान मकानदार, तौफिक हिप्परगी, फिरोज जमखाने, आयुब गजबरवाडी, समीर शेख, दिलावर मोमीन, फिरोज बागवान, फारूक मकानदार, डॉ.जावेद बागवान, डॉ.राहमतुल्लाह खान, डॉ.अर्शद बोरगावे, डॉ.हिदायतुल्लाह पठाण, इम्तियाज म्हैशाळे यांचे  सहकार्य लाभले.

0000

Tags: इचलकरंजीउद्धव ठाकरेमुख्यमंत्रीमुस्लीम
मागील बातमी

महाराणा प्रतापसिंह जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

पुढील बातमी

विशेष श्रमिक रेल्वेने तीन जिल्ह्यातील मजूर बिहारकडे रवाना

विशेष श्रमिक रेल्वेने तीन जिल्ह्यातील मजूर बिहारकडे रवाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

MAY 2020
MTWTFSS
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

Video Player
00:00
02:25

छायाचित्र दालन

      
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PMWhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 1,262
  • 3,495,984

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • मीडिया ॲडव्हायझरी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.


    Posted by India365live at 17:37 No comments:
    Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
    Newer Posts Older Posts Home
    Subscribe to: Posts (Atom)

    About Me

    My photo
    India365live
    View my complete profile

    Blog Archive

    • ►  2026 (12)
      • ►  June (3)
      • ►  May (2)
      • ►  April (3)
      • ►  March (1)
      • ►  February (1)
      • ►  January (2)
    • ►  2025 (28)
      • ►  December (3)
      • ►  November (3)
      • ►  October (3)
      • ►  September (3)
      • ►  August (3)
      • ►  July (5)
      • ►  May (1)
      • ►  April (5)
      • ►  March (1)
      • ►  January (1)
    • ►  2024 (38)
      • ►  December (5)
      • ►  November (13)
      • ►  October (9)
      • ►  September (11)
    • ►  2023 (3)
      • ►  January (3)
    • ►  2022 (21)
      • ►  November (2)
      • ►  October (1)
      • ►  September (1)
      • ►  August (5)
      • ►  July (3)
      • ►  June (3)
      • ►  May (1)
      • ►  April (2)
      • ►  March (1)
      • ►  February (1)
      • ►  January (1)
    • ►  2021 (22)
      • ►  November (1)
      • ►  August (7)
      • ►  July (7)
      • ►  June (2)
      • ►  May (1)
      • ►  April (3)
      • ►  March (1)
    • ▼  2020 (25)
      • ▼  November (1)
        • डॉ. उल्हास पाटिल यांचा विशेष सन्मान..
      • ►  October (1)
        • प्रत्येक वेळी डॉक्टरच चुकीचे असतात काय??
      • ►  September (3)
        • अब इंजेक्शन के खाली वायल भी जमा करने होंगे
        • सावधान कोविड रुग्णांना लुटनाऱ्यांनो
        • चितळे उद्योग समूहातर्फे राज्यातील 10 मान्यवरांचा '...
      • ►  July (6)
        • बकरी ईद बद्दल सरकार ची भूमिका
        • देशमुख यांना भावपूर्ण श्रधान्जली
        • ईकरा यूनानी कॉलेज मधे 50 ऑक्सीजन युक्त बेड,100 आइस...
        • दुबे का ENCOUNTER
        • आसमा आणि अंतरा या महाराष्ट्र कन्याचा गृहमंत्री यां...
        • *शाहरुख खान के यहा से बिडी चोरी,मची खलबली..*
      • ►  June (5)
        • मेहरून येथील कोरोना योध्दा सन्मान...
        • Ffjj
        • कड़क लॉकडॉउन होणार ही अफवाच
        • चिकन मधे कोरोनापेक्षा महाभयंकर वायरस फेक
        • कोरोना रुग्नसेवक-अनिस शाह,मानवता का मसिहा
      • ►  May (9)
        • कोरोना-आता जामनेर,पहुर ला पोहचला कोरोना
        • मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले मुस्लिम समाजाचे कौतुक...
    • ►  2018 (5)
      • ►  April (1)
      • ►  March (4)
    Simple theme. Powered by Blogger.