Sunday, 28 December 2025

हेतल पाटिल यांचे 6 मध्ये तगड़े आवाहन...

जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महायुती-महाआघाडीने प्रत्येक प्रभागात विजयी चेहरा देणे आवश्यक झाले आहे.

 अशात प्रभाग क्रमांक ६ मध्ये हेतल महेंद्र पाटील यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

अनेक इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया संपली असली तरी अंतिम यादी जाहीर व्हायची आहे.

 मात्र, हेतल पाटील यांची उमेदवारी नक्कीच विजयाची हमी ठरेल, असा मतदार व कार्यकर्त्यांचा कौल आहे.


स्थानिक आणि उच्चशिक्षित महिला नेतृत्व

B.E. आणि MSW पदवीधारक असलेल्या हेतल पाटील या समस्यांवर प्रत्यक्ष उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

● दिव्यांग, महिलांचे प्रश्न

● आरोग्य सेवा उपक्रम

● गरजू नागरिकांसाठी तत्पर मदत

त्यांचे वडील महेंद्र पाटील व संपूर्ण कुटुंब सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असून लेवा पाटील समाजातील त्यांचा प्रभाव निर्णायक आहे.


पत्रकार पतीची जनसंपर्कातील मजबुती

हेतल पाटील यांचे पती चेतन रविंद्र वाणी हे 15 वर्षांपासून क्राईम रिपोर्टिंगमध्ये कार्यरत.

शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन व समाजघटकांमध्ये त्यांचा मजबूत संपर्क असून याचा थेट फायदा रणनितीत मिळणार आहे.


प्रभाग ६ मधील जनतेचा स्पष्ट संदेश

छत्रपती शाहू नगर, दत्त कॉलनी हा हेतल पाटील यांचा मूळ परिसर. टागोर नगर, दंगलग्रस्त कॉलनी येथे महिलांचा मोठा विश्वास त्यांच्या बाजूने उभा आहे.

मतदारांची मागणीही स्पष्ट —

➡️ बाहेरून लादलेला नव्हे…

➡️ स्थानिक आणि कामातून सिद्ध झालेली महिला हवी!

ही अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद केवळ हेतल पाटील यांच्यात दिसते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेतल पाटिल यांचे 6 मध्ये तगड़े आवाहन...

जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महायुती-महाआघाडीने प्रत्येक प्रभागात विजयी चेहरा देणे आवश्यक झाले आहे.

 अशात प्रभाग क्रमांक ६ मध्ये हेतल महेंद्र पाटील यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

अनेक इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया संपली असली तरी अंतिम यादी जाहीर व्हायची आहे.

 मात्र, हेतल पाटील यांची उमेदवारी नक्कीच विजयाची हमी ठरेल, असा मतदार व कार्यकर्त्यांचा कौल आहे.


स्थानिक आणि उच्चशिक्षित महिला नेतृत्व

B.E. आणि MSW पदवीधारक असलेल्या हेतल पाटील या समस्यांवर प्रत्यक्ष उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

● दिव्यांग, महिलांचे प्रश्न

● आरोग्य सेवा उपक्रम

● गरजू नागरिकांसाठी तत्पर मदत

त्यांचे वडील महेंद्र पाटील व संपूर्ण कुटुंब सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असून लेवा पाटील समाजातील त्यांचा प्रभाव निर्णायक आहे.


पत्रकार पतीची जनसंपर्कातील मजबुती

हेतल पाटील यांचे पती चेतन रविंद्र वाणी हे 15 वर्षांपासून क्राईम रिपोर्टिंगमध्ये कार्यरत.

शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन व समाजघटकांमध्ये त्यांचा मजबूत संपर्क असून याचा थेट फायदा रणनितीत मिळणार आहे.


प्रभाग ६ मधील जनतेचा स्पष्ट संदेश

छत्रपती शाहू नगर, दत्त कॉलनी हा हेतल पाटील यांचा मूळ परिसर. टागोर नगर, दंगलग्रस्त कॉलनी येथे महिलांचा मोठा विश्वास त्यांच्या बाजूने उभा आहे.

मतदारांची मागणीही स्पष्ट —

➡️ बाहेरून लादलेला नव्हे…

➡️ स्थानिक आणि कामातून सिद्ध झालेली महिला हवी!

ही अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद केवळ हेतल पाटील यांच्यात दिसते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Monday, 15 December 2025

पोलिस ने पकडा कालिया बंदर


दि.१३/१२/२०२५ रोजी फियांदी शरीफ मुराद खाटिक, रा. सुप्रिम कॉलनी जळगांव हे चाळीसगांव येथे लग्न समारंभाकरीता गेले असता त्यांचे राहते घराचे कडी कोंडा तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ४९६००/- रु. चा मुद्देमाल चोरुन नेल्या बाबत तक्रार दिल्याने एमआयडीसी पो. स्टे येथे अज्ञात इसमाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची घरफोडी ही अभिलेखावरील गुन्हेगार १) शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर रा. कासमवाडी जळगांव २) साहिल शहा सदाम शहा ऊर्फ काल्या रा. तांबापुरा जळगांव यांनी केली असल्याबाबतची माहिती मा. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना मिळाली होती, त्याप्रमाणे कासमावडी परिसरातून नमुद आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. म्हणून नमुद आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी एमआयडीसी पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. चे पोहेकों/किरण चौधरी हे करीत आहेत, नमुद दोन्ही आरोपी मजकुर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा, श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, मा. श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, तसेच पोउपनि, शरद बागल, सफी/अतुल बंजारी, पोहेकों/अक्रम शेख, विजय पाटील, पोना/किशोर पाटील, पोकों/राहुल रगडे, रविंद्र कापडण, गोपाल पाटील सर्व स्थागुशा जळगांव यांनी केली आहे.

Saturday, 29 November 2025

*वरणगाव येथे या मंगळवारी आठवडे बाजार नाही.जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी* *आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी*

*वरणगाव येथे या मंगळवारी  आठवडे बाजार नाही.जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी* 
*आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी* 


*जळगाव, दि. 28 नोव्हेंबर (इंडिया 365 न्यूज) :–* नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला असून आदर्श आचारसंहिताही त्याच दिवसापासून लागू आहे. निवडणुकीचे मतदान मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत मंगळवार व बुधवार या दिवशी अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने मतदान व मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नये म्हणुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अँण्ड फेअर्स अॅक्ट 1862 च्या कलम 5 (अ) व (क) मधील अधिकारांचा वापर करून महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. 

त्यानुसार 02 डिसेंबर 2025 (मतदानाचा दिवस) आणि 03 डिसेंबर 2025 (मतमोजणीचा दिवस) या दोन्ही दिवशी जळगाव जिल्ह्यातील नगर पालिका हद्दींमध्ये भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यात येतील.तसेच नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Tuesday, 18 November 2025

*जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भाजपा ची बिनविरोध बोहनी*

*जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात कमळ फुलण्यास सुरुवात...*

नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या पत्नी सौ.उज्वला दीपक तायडे यांची प्रभाग क्रमांक ११ ब मधून बिनविरोध निवड झाली.


जामनेर नगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचा प्रभाव असलेल्या प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ.उज्वला दीपक तायडे यांचा विरोधातील उमेदवार यांचा अर्ज छाननी मध्ये फॉर्म बाद करण्यात आला. त्यामुळे उज्वला दीपक तायडे ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ह्या निवडीमुळे जामनेर शहरात भाजपाचे कमळ फुलण्यास सुरुवात झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीचे ना . गिरीषभाऊ महाजन, नगराध्यक्ष साधना ताई महाजन, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व भाजप पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Wednesday, 5 November 2025

*सर्वात मोठा "पंच"....*


*विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे  प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती* 

*जळगाव दि.५ प्रतिनिधी* -  जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत  विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन  दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा होईल. या जागतिक बुद्धिबळपटूंसाठी आकर्षण केंद्र असलेल्या स्पर्धेत जळगाव येथील जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांना (सामना पंच) सहाय्यक पंच म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) यांनी केली आहे. प्रवीण ठाकरे यांनी यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई व वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. विश्वचषक स्पर्धेत असा बहुमान मिळवणारे उत्तर महाराष्ट्रातील प्रविण ठाकरे पहिलेच बुद्धिबळ पंच आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय बुद्धिबळ संघाचे सल्लागार तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी विशेष कौतूक करून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, नरेंद्र फिरोदिया, विनय बेले, पी. बी. भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ महासंग्रामात ८० पेक्षा जास्त देशांचा सहभाग असून, २०६ खेळाडू अधिकृतरित्या खेळणार आहेत. खुल्या गटातील या स्पर्धेत बाद फेरीचा अवलंब केला जात असल्याने अतिशय उत्कंठावर्धक व रोमहर्षक सामने अनुभवण्याची संधी बुद्धिबळ प्रेमींना लाभत असते. भारताकडून डी गुकेश, प्रग्नानंदा, अर्जुन इरिगेसी, विदित गुजराथी, अरविंद चिदंबरम,  दिव्या देशमुख सारखे कसलेले खेळाडू सहभागी होत असून जगभरातून अनिश गिरी, वेस्ली सो, नोदरबेक अब्दुसत्तारोव,इयान नेपोमियाशी, व्हिन्सेंट केमर, लियोन आरोनियन यांसारखे दिग्गज व अनुभवी खेळाडू  देखील या स्पर्धेत आपले कसब पणाला लावतील.

जगातील सर्वोत्तम २०६ बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व नियुक्त केलेले पंच या सर्वांची चोख व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व गोवा शासनाने केली आहे. या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या जळगाव जिल्ह्यातील व्यक्तीस हा बहुमान प्राप्त व्हावा, ही महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेमींसाठी खचितच अभिमानास्पद बाब आहे.  
या त्यांच्या यशासाठी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील, नरेंद्र पाटील, संजय पाटील, यशवंत देसले, तेजस तायडे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*फोटो कॅप्शन* -  प्रविण ठाकरे यांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्त झाल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना अशोक जैन, अतुल जैन.

Thursday, 30 October 2025

जानिए मदरसे को 10 लाख की सबसिडी कैसे मिलाए?

डॉ. जाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना 2025-26 के तहत मदरसों से आवेदन आमंत्रित। रिपोर्ट अयाज़ मोहसिन, इंडिया 365 न्यूज.जलगांव, दिनांक 30 अक्टूबर 2025।

जिन मदरसों में पारंपरिक धार्मिक शिक्षा के साथ-साथ विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, अंग्रेजी और उर्दू जैसे विषयों की आधुनिक शिक्षा दी जाती है, उनसे डॉ. जाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना वर्ष 2025-26 के तहत आवेदन मांगे गए हैं।
इस योजना के अंतर्गत आधुनिक शिक्षा के लिए बुनियादी ढांचा (इंफ्रास्ट्रक्चर) तैयार करने हेतु 10 लाख रुपये तक का अनुदान स्वीकृत किया जा सकता है। संबंधित मदरसा या संस्थान का धर्मदाय आयुक्त कार्यालय अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड के पास पंजीकृत होना आवश्यक है।शासन के निर्णय दिनांक 21 अगस्त 2024 के अनुसार, इस योजना के तहत बुनियादी सुविधाओं में वृद्धि की गई है। इच्छुक मदरसे निर्धारित प्रारूप में आवेदन जिला नियोजन अधिकारी, जिला कलेक्टर कार्यालय, जलगांव के पास 14 नवंबर 2025 तक जमा करें। निर्धारित समय सीमा के बाद प्राप्त आवेदनों पर विचार नहीं किया जाएगा। आवेदन पत्र का प्रारूप और आवश्यक दस्तावेजों की सूची www.maharashtra.gov.in वेबसाइट पर उपलब्ध है।यह जानकारी जिला नियोजन अधिकारी विजय शिंदे ने एक प्रेस विज्ञप्ति के माध्यम से दी है।

*मुरलीधर चौधरी "माऊली" यांची भाजपा तिर्थक्षेत्र चिटणीसपदी निवड, सुनिल भाऊ भंगाळे यांनी केले अभिनंदन...*

*भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची “तीर्थ क्षेत्र विकास आघाडी “ जिल्हा कार्यकारिणी २०२५  जाहीर*

*मुरलीधर चौधरी "माऊली" यांची चिटणीसपदी निवड, सुनिल भाऊ भंगाळे यांनी केले अभिनंदन...*

            आज *दिनांक :- २९/१०/२०२५ रोजी*  मुख्यमंत्री *मा. ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.आ.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब* (भाजपा प्रदेशाध्यक्ष) यांच्या आदेशाने, *मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन* (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), *मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे* (केंद्रीय राज्यमंत्री), *मा.ना.श्री.संजयभाऊ सावकारे*  (वस्त्रोद्योग मंत्री) यांच्या नेतृत्वात, *मा.श्री. विजय चौधरी* (प्रदेश महामंत्री), *मा.श्री. रविजी अनासपुरे* (विभागीय संघटन मंत्री), *मा.श्रीमती स्मिताताई वाघ* (खासदार), *मा.श्री.सुरेश भोळे*  (आमदार), *मा.श्री. मंगेशदादा चव्हाण*  (आमदार), *मा.श्री. अमोल जावळे* (आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली *जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री.डॉ. राधेश्याम चौधरी* यांच्या मान्यतेनुसार *तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे  जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भगवान बाविस्कर* , भाजपा जळगाव पश्चिम जिल्हा तीर्थ क्षेत्र विकास आघाडी-  *जिल्हा कार्यकारिणी - २०२५  जाहीर*

#Radheshyam Chaudhari
BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)
Girish Mahajan
Ravindra Chavan
Devendra Fadnavis
J.P.Nadda

Sunday, 19 October 2025

से NO ऑनलाईन शॉपिंग

*"स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करा, जळगावची बाजारपेठ वाचवा!"*

*स्वदेशी जागरण मंच, रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ आणि महादेव हॉस्पिटलतर्फे जळगावात जनजागृती अभियान*

जळगाव : आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठेला आणि स्वदेशी उत्पादनांना बळ देण्यासाठी जळगाव शहरात एक विशेष जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 'स्थानिक व्यापारीकडून खरेदी करूया, जळगावची बाजारपेठ वाचवूया!' या संदेशासह स्वदेशी जागरण मंच, रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ आणि महादेव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

*आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या हस्ते शुभारंभ*
या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या हस्ते गोलाणी मार्केट येथे दुकानांवर आणि दर्शनी भागात जनजागृती करणारे पोस्टर चिकटवून या अभियानाची सुरुवात झाली.

*शहरात लावणार पोस्टर, बॅनर*
शहरातील नागरिकांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी आणि स्वदेशी व भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य द्यावे, असे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी शहरात सर्वत्र पोस्टर आणि बॅनर लावले जाणार आहेत. स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, तसेच छोटे-मोठे व्यापारी आणि कारागीर यांना आधार देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

*यांची होती उपस्थिती*
यावेळी भाजपा महानगरअध्यक्ष दीपक सूर्यवंशी, चंदन कोल्हे, रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थचे प्रेसिडेंट बिपीन पाटील, सचिन पाटील, क्षितिज भालेराव, आशिष सपकाळे, स्वदेशी जागरण मंचचे चेतन वाणी, पिंटू लुल्ला आदींसह स्थानिक दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 13 September 2025

*रामानंदनगर पोलिसांची धडक कारवाई,गावठी कट्टा, 1 काडतूस,सह सराईत पकडला..*

मा. पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, मा.अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी नितिन गणापुरे यांनी विविध अधिकाऱ्यांना पोलिस स्टेशन रेकॉर्ड वरील आरोपी गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यांची खबरदारी घेण्याची सूचना केली होती, या सूचनेनुसार प्रेरित होऊन रामानंद नगर पोलिसांनी 1 सराईत संशयित महेंद्र (दादू ) सपकाळे ला 1 गावठी कट्टा, 1 काडतूस सहित धरले. आरोपी मूळे पिंप्राळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.रामानंद नगर पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी कमालीची गोपनीयता राखत सदर आरोपीच्या मुसक्या आवळल्या.या टिम मधे PSI सचिन रनशेवरे,पोहेका जितेंद्र राजपूत, सुधाकर अंबोरे,जितेंद्र राठोर, सुशील चौधरी,हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे,रेयांनंद साळुंके, योगेश बारी,विनोद सूर्यवंशी, गोविंदा पाटिल यांचा समावेश होता. पुढील तपास PSI सचिन रानशेवरे करीत आहेत.

Friday, 12 September 2025

LCB ची अभूतपूर्व कामगिरी--चोरी गेलेली बकरी परत आणली.. मोठ्ठा पराक्रम.



*LCB दलाची धाडसी, अभूतपूर्व कामगिरी,(रिपोर्ट अयाज मोहसीन, इंडिया 365 न्यूज) गुन्हेगारांचे धाबे दणाणले, जिल्हा भरात एकच कौतुक,कुठलाही सुगावा नसताना निव्वळ आपली अलौकिक बुद्धिमत्ता वापरून *"चोरी गेलेली बकरी परत आणली'''- मुक्या जनावराच्या चेहऱ्यावर आभाराचे भाव...शनी पेठ हद्दीतील प्रेरणादायी किस्सा..अलिकडे ड्रग्स प्रकरण,विविध कंट्रोल जमा/ निलंबन,नियमित होणारे खून,अधिकाऱ्या वर बलात्काराचे आरोप,फोफावलेला वेश्या व्यवसाय,निरंकुश अवैध धंद्याचे आरोप अशा अनेक कारणा मूळे खाकीची प्रतिमा मलिन झाली आहे, आता मात्र या मोठ्ठ्या यशस्वी कामगिरी मूळे,प्रतिमा सुधारण्या मधे  'बकरी प्रकरणाचा" नक्कीच योगदान असेल.विशेष म्हणजे विविध सणांचे बंदोबस्त असतांना देखील योग्य वेळी खाटकाच्या सूरी खालून निष्पाप बकरीचे जिव वाचविण्याचा अचाट पराक्रम LCB ने तसेच पर्यायाने जिल्हा पोलिस दलाने केलाय.*

जळगाव जिल्हा पोलिस दलाने मागील काही वर्षात 'डिटेक्शन' क्षेत्रात एका पाठोपाठ यश शिखरे पादाक्रांत करत कामगिरी चा आलेख उंचावला आहे. *"बाईक चोर धरला "...*
*"गंज चढलेला गावठी कट्टा मिळाला(किंमत हजार रु)."..."पाकिट चोराच्या मुसक्या आवळल्या"..."गावठी दारूचा अड्डा उध्वस्त".."मर्डर केसेस मधे आरोपी स्वतः जमा"-24 तासात सेकण्ड हॅन्ड मोबाईल चोर पकडला...(किमत हजार पाचशे)*

*या टिम ने उचलला बकरी परत आणण्यात "सिंहाचा वाटा"*

👇

*IPS SP मा. रेड्डी साहेब यांचे प्रगल्भ नेतृत्व, ASP नखाते साहेब यांचा अनुभव, जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले DYSP गणापुरे साहेब, ज्यांच्या वर मोठ्या विश्वासाने LCB PI ची जबाबदारी टाकण्यात आली असे इन्स्पेक्टर राहुल गायकवाड साहेब,LCB PSI शरद बागल,APSI अतुल वंजारी,प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर,विजय पाटिल, नितिन बाविस्कर, किशोर पाटिल, रतन हरी गिते,सिद्धेश्वर डापकर,प्रदिप चावरे, अक्रम शेख, रविंद्र कापडणे तसेच सर्व ज्ञात अज्ञात सहकार्य करणारे. आता या नंतर हा तपास शनिपेठ पोलिस स्टेशन ला देण्यात येईल तेथे पो. नि. कमलाकर कावेरी ताई यांची टिम तपास करेल.*

Monday, 8 September 2025

गणेशउत्सवा निमित्त ईकरा युनानी कॉलेज तर्फे मेडिकल कॅम्प.

*अनंत चतुर्दशी निमित्त इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालय तर्फे मोफत मेडिकल कॅम्प*
आज दि. ०६/०९/२०२५ रोजी इच्छादेवी चौक येथे गणेश विसर्जन मिरवणूक मधील गणेश भक्तांसाठी इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालय तर्फे मोफत मेडिकल कॅम्प व प्रथमोचार चे आयोजन करण्यात आले या कॅम्प ठिकाणी प्रमोद खटके साहेब (उपअधीक्षक), राहुल तायडे साहेब (पोलीस उपनिरीक्षक), प्रशांत नाईक ( माजी नगरसेवक), अब्दुल करीम सालार, मुफ्ती हारून नदवी साहब, अजीज सालार, खालिद बागवान, इरफान सालार, ॲड.शरीफ शेख कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर शोएब शेख तसेच आसिफ खान, इमरान शेख, मोहसीन शेख व महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. गणेश विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना या कॅम्पमध्ये मोफत उपचार देण्यात आले असून त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाले.

Tuesday, 26 August 2025

*शिक्षण फक्त पदव्या नव्हे तर जाणीवेची ओळख आहे* – डॉ. अब्दुलकरीम सालार

*शिक्षण फक्त पदव्या नव्हे तर जाणीवेची ओळख आहे* – डॉ. अब्दुलकरीम सालार
बुरहानपूर प्रतिनिधी:
मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी, बुरहानपूर व ऑल इंडिया उर्दू संपर्क समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, २४ ऑगस्ट रोजी एका भव्य पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रांताध्यक्ष सय्यद आरिफ अज़ीज यांनी भूषविले.

या सोहळ्यात बुरहानपूरातील एकूण १०५ यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला इमरान खान (मुंबई), नियाज अहमद (सतना), मुश्ताक मलिक (सनावद), लुकमान मसूद (खंडवा), मुइत खान, सफियान काझी (खंडवा), विनोद गोर (सनावद), हाजी वाजिद इकबाल, अजय रघुवंशी, मुशर्रफ खान, हामिदुल्ला डायमंड, फहीम हाशमी, मुश्ताक भाई जलेबीवाले, सलीम मास्टर, फजलुर्रहमान व इजाज अशरफी यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

समारंभाचे प्रमुख आकर्षण होते खानदेशातील आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते डॉ. अब्दुलकरीम सालार (अध्यक्ष – इक़रा एज्युकेशन सोसायटी, जळगाव). त्यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात सध्याच्या शैक्षणिक स्थितीवर प्रकाश टाकत मुस्लिम समाजाच्या अधोगतीवर भाष्य केले. यशस्वी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी म्हटले – “शिक्षण फक्त पदव्या नव्हे, तर जाणीवेची ओळख आहे. समाज आज शिक्षण घेतलेल्या पण कृतीशून्य लोकांनी भरला आहे. खरी पदवी तीच जी कृतीतून दिसते.”

तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे आवाहन केले व सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसूद रियाज, अता उल्ला खान, सुहैल अहमद, अझहर हुसेन, हिकमत मुकादम, अकबर पठाण, इकबाल कौसिन, अफसर अली, तन्वीर अली आदींनी मोलाचे योगदान दिले.
समारंभाचे आयोजन मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी बुरहानपूर जिल्हाध्यक्ष सय्यद जौझर अली यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले. माजी आमदार अब्दुल हमीद काझी व फरीद सेठ यांचे मार्गदर्शन व आश्रय कार्यक्रमाला लाभले.

Thursday, 14 August 2025

सुलेमान मोबलिंचिंग--स्वातंत्र्यदिनी मुस्लिम समाजाने घातला पालकमंत्रीना घेराव. SIT ची मागणी.

*जामनेर : बेटावद खुर्द मॉब लिंचिंग – मुख्य आरोपींना तात्काळ अटक, मकोका  सह संगनमत कलम लावा व पीडिताच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची एकता संघटनेची मागणी*
*एस आय टी व संगनमत कलम वाढविणार: पोलिस अधीक्षक* 

जळगाव :
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे ११ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या अमानवी मॉब लिंचिंग प्रकरणातील मुख्य आरोपी, जो राजकीय प्रभावाचा मानला जातो, याला अद्याप अटक न झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मुख्य आरोपी व कॅफे चालक यांना तात्काळ अटक, गुन्ह्यात संगनमत सह मकोका लावून आणि फिर्यादीच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी केली आहे. या वेळी पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी,  जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांची सुद्धा उपस्थिती होती.

या हल्ल्यात पीडित व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून हत्या करण्यात आली.
एकता संघटनेचे शेख यांनी स्पष्ट केले की आरोपी हा संघटित टोळीचा भाग असून, त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचा इतिहास आहे. त्यामुळे मकोका व बी एन एस ६१(२) संगनमत हे कलम लाऊन  कठोर कारवाई केल्याशिवाय न्याय होणार नाही.
*एकता संघटनेच्या ठाम मागण्या*


मुख्य आरोपी व कॅफेचालक यांना तात्काळ अटक.

भा.दं.सं. कलम १२०(ब) म्हणजे बी एन एस 61(2) अंतर्गत कटकारस्थानाचा गुन्हा दाखल करा.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) तात्काळ लागू करणे.
तपास त्वरित एस आय टी कडे सोपवणे.

पीडित कुटुंबास २५ लाख रुपयांची मदत व एक सदस्यास शासकीय नोकरी.

साक्षीदार संरक्षण योजना तात्काळ लागू करणे.

सी आर पी सी कलम २४(८) अंतर्गत पीडिताच्या निवडीनुसार विशेष सरकारी वकील नेमणे

संघटनेने आपल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सह दाखले दिलेले आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने, कठोर कायदेशीर कारवाई व निष्पक्ष तपास अत्यावश्यक आहे.

या प्रसंगी संघटनेचे मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगर, मजहर पठाण,आरिफ देशमुख, अब्दुल अजीम शेख, मौलाना इमरान, रज्जाक पटेल, मौलाना कासिम नदवी , खान शकील,अरबाज शेख, इरफान शेख, हसन सैयद, उमर पटेल, नजमोद्दीन शेख, गुफरान शेख,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर निवेदनाच्या प्रती मा. गृहमंत्री, मा. आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मा. अल्पसंख्यांक आयोग, मा. मानव अधिकार आयोग, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देण्यात आलेले आहे. 
फोटो कॅप्शन 
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करताना फारुक शेख व निवेदन देताना मुफ्ती खालीद सह शिष्टमंडळ दिसत आहे

Wednesday, 6 August 2025

*अनामिका मेहरा सहित जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित*

*अनामिका मेहरा सहित जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित*

उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्यानगर जळगाव येथील असून सर्व तीनही  भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. 
परंतू  मा.  जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार उत्तरकाशी येथील Maount Bhagirathi Home Stay Harshil
या स्टे हाऊस शी जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क केला असता सदर  *मेहरा कुटुंबातील* अनामिका मेहरा .आरोही मेहरा,रुपेश मेहरा –  हे उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक  अयोध्या नगर जळगाव येथील असून सर्व तीनही  भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. 
     सदर भाविकांचे वडील श्री चंद्रशेखर नरवरिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कशात आले असता त्यांचा उपरोक्त स्टे हाऊस मालकाशी संपर्क करून दिला आहे.

सूत्र - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जळगाव

Thursday, 24 July 2025

एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेतून मोहाडी टेकडीवर ५ हजार झाडांचे वृक्षारोपण..ऑक्सिजन पार्क निर्मितीचा संकल्प; २ लाख देशी बीजांची होणार पेरणी..

‘एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेतून मोहाडी टेकडीवर ५ हजार झाडांचे वृक्षारोपण..ऑक्सिजन पार्क निर्मितीचा संकल्प; २ लाख देशी बीजांची होणार पेरणी..

जळगाव :आईच्या मायेप्रमाणे झाडे लावा, निसर्ग जपा या भावनेतून ‘एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोहाडी गावाजवळील टेकडीवर ५,००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

पर्यावरण प्रेमी डॉ. नितीन महाजन (अप्पर जिल्हाधिकारी, अलिबाग) उद्योजक सुबोध कुमार चौधरी (संचालक सुबोनियो केमिकल्स लिमिटेड) उद्योजक अश्विन राणे यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून भव्य वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी टेकडीवर तब्बल ५००० वृक्षांचे रोपण आणि २ लाख देशी वृक्षांच्या बिया टाकण्याचे काम करण्यात येणार असून हा कार्यक्रम २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे या जाणिवेतून "वृक्षसंपदेचा ध्यास" घेत मराठी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामध्ये करंज, कांचन, जांभूळ, शीसम, फापडा, धावडा, रेन ट्री, कदंब, उंबर, गुलमोहर, मोह, गोरख चिंच, चिंच, बेहडा, बांबू, वड, हादगा इत्यादी देशी वृक्षांचा समावेश आहे. हे वृक्ष मान्यवरांच्या हस्ते लावण्यात येणार आहेत.

कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून त्यात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे व आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, प्रांताधिकारी विनय गोसावी, कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, तहसीलदार डॉ. शितल राजपूत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, सुबोनियो केमिकल्स लिमिटेड चे संचालक सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सुमोल चौधरी, डॉ. सृष्टी चौधरी, उद्योजिका सौंदर्या महाडिक पुणे, संजना चौधरी सनशाइन अग्रोचे हर्ष चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, आर एम पाटील सहाय्यक आयुक्त नगररचना, वनविभागाचे जमीर शेख, नितीन बोरकर व समाधान सोनवणे, आदींचा समावेश आहे.

या वेळी मोहाडी टेकडी परिसरात दोन लाख देशी वृक्षांच्या बीजांची पेरणी करून भविष्यात ‘ऑक्सिजन पार्क’ निर्माण करण्याचा संकल्पही करण्यात येणार आहे.

मराठी प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असून, "एक वृक्ष आईच्या नावे" ही संकल्पना पर्यावरण आणि भावनिक जाणीवा यांचा अनोखा संगम ठरणार आहे.

या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाला शहरातील सर्व वृक्षप्रेमींनी, निसर्गप्रेमींनी, सामाजिक संस्थांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी केले आहे.


Thursday, 10 July 2025

IMA चा उद्या चा संप तूर्त रद्द, मुख्यमंत्री यांनी मिटिंग लावण्याचा सकारात्मक शब्द दिल्याने संप स्थगित...


IMA तर्फे जारी अधिकृत संदेश 👇🏼

"उद्याच्या स्ट्राइकचा निर्णय पुढे ढकलला गेला आहे. फडणवीस साहेबांच्या बंगल्यावर थोड्या वेळापूर्वी मीटिंग झाली त्यात त्यांनी उद्या सकाळी अर्जंट मध्ये एम एम सी विषयी मीटिंग ठेवलेली आहे . तेथे निर्णय होईल... त्यानुसार आमच्या निर्णयाची दिशा ठरेल."

Tuesday, 8 July 2025

*जिओ 500 रुपयात 100 दिवस अनलिमिटेड हायस्पीड वायफाय फ्री... इंस्टालेशन फ्री*


*जिओ 500 रुपयात 100 दिवस अनलिमिटेड हायस्पीड वायफाय फ्री... इंस्टालेशन फ्री*

*जिओ वाय फाय ची फ्री स्किम मस्त, पण कर्मचारी भलतेच "सुस्त"... जळगाव येथील जिओ कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सुस्तपणा ग्राहकांना तापदायक...*


जळगाव - येथील देशमुख नगर मधील एका ग्राहकाला जिओ सेवा कर्मचाऱ्यांचा असमाधानकारक अनुभव आला आहे.प्रस्थापित कंपन्याना 'नॉक आऊट' करणाऱ्या योजना रिलायन्स - जिओ वाले आणत असतात. त्यांची योजना पाहून अनेक ग्राहक हे मागिल कंपनी सोडून थेट जिओ ला पसंती देत असतात. मात्र स्थानिक कर्मचारी अधिकारी यांची अनास्था जिओ ला मारक ठरत आहे. जिओ तो आलिशान है मगर आलसी कर्मचारीयो से परेशान है.


देशमुख नगर, जळगाव येथील एका ग्राहकाने साधारण 12 दिवसा पूर्वी जिओ वायफाय साठी आवेदन गेले होते,ग्राहकाने सुरवातीला 350 रु. सुद्धा भरले, सोबतच 500 भरले मात्र 24 किंवा 48 तासामध्ये मोफत वायफाय इन्स्टोल करून देऊ हे दावे मात्र सपशेल फोल ठरले असून, तांत्रिक कारणाने ग्राहकाला 500 रु ऑनलाईन परत पाठवले, मात्र मागील 12 दिवसापासून टाळा टाळ, तांत्रिक कारणे, जबाबदारी ढकला ढकल, आळस,पाठपुरावा न करने,अनास्था, कर्मचारी अधिकारी समन्वयाचा अभाव, कष्ट-टाळू वृत्ती या सर्वामुळे तब्बल 12 दिवसा नंतर सुद्धा वाय फाय लागायचा पत्ता नाही. यामुळे ग्राहकांना उगाच मनस्ताप होत असून मागची कंपनीच चांगली होती अशी भावना व्यक्त होत आहे.संबधित ग्राहक आता 'योग्य' त्या मार्गाने पत्रकार परिषद, ऑनलाईन कम्प्लेंट, ग्राहक मंच किंवा जिओ ची उच्चस्तरीय मॅनेजमेंट कडे प्रयत्न करणार आहे.

Monday, 7 July 2025

*IMA ने पुकारला 11 जुलै रोजी बंद"*

*IMA ने पुकारला 11 जुलै रोजी बंद"*
रिपोर्ट अयाज मोहसीन.
(इंडिया 365 न्यूज)

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निर्णयाविरोधात IMA महाराष्ट्र राज्याचे तीव्र आंदोलन

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) ३० जून २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा तीव्र निषेध केला आहे. या अधिसूचनेनुसार, केवळ एक वर्षाचा Certificate Course in Modern Pharmacology (CCMP) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे.

हा निर्णय संपूर्ण आधुनिक वैद्यकीय क्षेत्रासाठी धोकादायक असून, डॉक्टरांच्या दीर्घकालीन शिक्षण व नैतिकतेचा अवमान करणारा आहे.

या पार्श्वभूमीवर दिनांक ६ जुलै २०२५ रोजी IMA महाराष्ट्र राज्याची विशेष कार्यकारिणी बैठक मुंबई वेस्ट शाखेत आयोजित करण्यात आली होती. MARD, AMC, MAGMO आणि विविध IMA शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सखोल चर्चा केल्यानंतर खालील आंदोलनात्मक कृती योजना जाहीर करण्यात आली:


🔹 १. निवेदन सादरीकरण – ८ जुलै २०२५ (मंगळवार)

राज्यातील सर्व IMA शाखा आपापल्या जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करतील.
स्थानिक स्पेशालिटी संघटनांचे सदस्यही सहभागी होतील.
प्रत्येक शाखेत पत्रकार परिषद घेऊन ह्या विषयाची जनजागृती करण्यात येईल.


🔹 २. एकदिवसीय आरोग्य सेवा बंद – ११ जुलै २०२५ (शुक्रवार)

🕗 सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ पर्यंत (२४ तास)
राज्यभरातील सर्व वैद्यकीय सेवा (जीवनरक्षक आपत्कालीन सेवा वगळून) पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील.
ही शांततामय कृती वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा व रुग्णांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे.


🔹 ३. “चलो मुंबई” भव्य रॅली – १९ जुलै २०२५ (शनिवार)

मुंबईत एक भव्य रॅली आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यभरातील IMA शाखांनी प्रतिनिधी पाठवावेत.
रॅलीचे ठिकाण, वेळ व वाहतूक यासंदर्भातील माहिती लवकरच दिली जाईल.


IMA महाराष्ट्र राज्याने स्पष्ट केले आहे की आधुनिक वैद्यक आणि होमिओपॅथी या दोन स्वतंत्र वैद्यकीय प्रणाली आहेत. एक वर्षाच्या कोर्सद्वारे होणारे क्रॉस-नोंदणीकरण हे डॉक्टरांच्या प्रशिक्षणाचा अपमान असून रुग्णांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करणारे आहे.

महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा संपूर्ण राज्यभरात तीव्र व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल.
जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी प्रसिद्ध केलेले
– इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र राज्य
✊ एकत्र आलो, म्हणून सक्षम झालो!
जय IMA!

Tuesday, 1 July 2025

*गृहपयोगी वस्तूंचा संच वितरणासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू – बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक* रिपोर्ट अयाज मोहसीन.

*गृहपयोगी वस्तूंचा संच वितरणासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू – बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक*

*जळगाव, दि. 1 जुलै (जिमाका)-* महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तूंच्या संचांचे वितरण आता नवीन सुधारीत कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे. मंडळाच्या http://hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत संकेतस्थळावर १ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली सुरु करण्यात येत असून, १५ जुलै २०२५ पासून प्रत्यक्ष संच वितरणास प्रारंभ होणार आहे.

              मंडळाने बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या वस्तूंचा संच मोफत वितरित करण्यासाठी राज्यभरात जिल्हानिहाय वितरण केंद्रे निश्चित केली असून, संबंधित कामगारास केवळ त्यांच्या नोंदणी असलेल्या जिल्ह्याच्या वितरण केंद्रातूनच संच प्राप्त करता येईल.
             प्रत्येक जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या जिल्ह्यातीलच वितरण केंद्रावर संच दिला जाईल. बांधकाम कामगाराने संकेतस्थळावर आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉग-इन करायचे आहे. जर कामगाराची नोंदणी निष्क्रिय असेल किंवा यापूर्वी संच घेतलेला असेल, तर तो योजनेस अपात्र ठरेल.
              पात्र कामगार आपल्या सोयीने दिनांक व केंद्र निवडू शकतो. त्यानंतर त्याला Appointment Letter मिळेल. Appointment Letter, आधार कार्ड/मंडळ ओळखपत्र घेऊन कामगाराने दिलेल्या दिनांकास संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. केंद्रावर बायोमेट्रिक ओळख व ऑनलाइन फोटो घेण्यात येईल. त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच दिला जाईल.
            संच प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्याने मंडळाचे ओळखपत्र अथवा आधार कार्ड व Appointment Letter घेऊन ठरवलेल्या दिवशी वितरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तेथे बायोमेट्रिक पडताळणी व ऑनलाईन छायाचित्र घेण्यात येणार असून त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच ताब्यात दिला जाईल.
             मंडळाच्या निर्देशानुसार, प्रत्येक कुटुंबास (पती किंवा पत्नी) केवळ एकदाच संच अनुज्ञेय राहणार आहे. तसेच, केंद्रात दररोज २५० लाभार्थ्यांना संच वितरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, कोणत्याही कारणास्तव Appointment Letter शिवाय संच वितरण केले जाणार नाही.
      वितरण प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य असून, कोणत्याही स्वरूपात शुल्क किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वितरणाच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येक केंद्रावर मंडळाचे प्रतिनिधी व नियुक्त संस्थेचे अधिकारी कार्यरत राहणार आहेत. आवश्यक सुविधा जसे संगणक, इंटरनेट, वीज, पिण्याचे पाणी इत्यादींची जबाबदारी नियुक्त संस्थेवर असेल.
        या संदर्भात अधिक माहिती व अपॉइंटमेंटसाठी कामगारांनी http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.