Thursday, 24 July 2025

एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेतून मोहाडी टेकडीवर ५ हजार झाडांचे वृक्षारोपण..ऑक्सिजन पार्क निर्मितीचा संकल्प; २ लाख देशी बीजांची होणार पेरणी..

‘एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेतून मोहाडी टेकडीवर ५ हजार झाडांचे वृक्षारोपण..ऑक्सिजन पार्क निर्मितीचा संकल्प; २ लाख देशी बीजांची होणार पेरणी..

जळगाव :आईच्या मायेप्रमाणे झाडे लावा, निसर्ग जपा या भावनेतून ‘एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोहाडी गावाजवळील टेकडीवर ५,००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

पर्यावरण प्रेमी डॉ. नितीन महाजन (अप्पर जिल्हाधिकारी, अलिबाग) उद्योजक सुबोध कुमार चौधरी (संचालक सुबोनियो केमिकल्स लिमिटेड) उद्योजक अश्विन राणे यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून भव्य वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी टेकडीवर तब्बल ५००० वृक्षांचे रोपण आणि २ लाख देशी वृक्षांच्या बिया टाकण्याचे काम करण्यात येणार असून हा कार्यक्रम २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे या जाणिवेतून "वृक्षसंपदेचा ध्यास" घेत मराठी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामध्ये करंज, कांचन, जांभूळ, शीसम, फापडा, धावडा, रेन ट्री, कदंब, उंबर, गुलमोहर, मोह, गोरख चिंच, चिंच, बेहडा, बांबू, वड, हादगा इत्यादी देशी वृक्षांचा समावेश आहे. हे वृक्ष मान्यवरांच्या हस्ते लावण्यात येणार आहेत.

कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून त्यात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे व आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, प्रांताधिकारी विनय गोसावी, कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, तहसीलदार डॉ. शितल राजपूत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, सुबोनियो केमिकल्स लिमिटेड चे संचालक सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सुमोल चौधरी, डॉ. सृष्टी चौधरी, उद्योजिका सौंदर्या महाडिक पुणे, संजना चौधरी सनशाइन अग्रोचे हर्ष चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, आर एम पाटील सहाय्यक आयुक्त नगररचना, वनविभागाचे जमीर शेख, नितीन बोरकर व समाधान सोनवणे, आदींचा समावेश आहे.

या वेळी मोहाडी टेकडी परिसरात दोन लाख देशी वृक्षांच्या बीजांची पेरणी करून भविष्यात ‘ऑक्सिजन पार्क’ निर्माण करण्याचा संकल्पही करण्यात येणार आहे.

मराठी प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असून, "एक वृक्ष आईच्या नावे" ही संकल्पना पर्यावरण आणि भावनिक जाणीवा यांचा अनोखा संगम ठरणार आहे.

या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाला शहरातील सर्व वृक्षप्रेमींनी, निसर्गप्रेमींनी, सामाजिक संस्थांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी केले आहे.


Thursday, 10 July 2025

IMA चा उद्या चा संप तूर्त रद्द, मुख्यमंत्री यांनी मिटिंग लावण्याचा सकारात्मक शब्द दिल्याने संप स्थगित...


IMA तर्फे जारी अधिकृत संदेश 👇🏼

"उद्याच्या स्ट्राइकचा निर्णय पुढे ढकलला गेला आहे. फडणवीस साहेबांच्या बंगल्यावर थोड्या वेळापूर्वी मीटिंग झाली त्यात त्यांनी उद्या सकाळी अर्जंट मध्ये एम एम सी विषयी मीटिंग ठेवलेली आहे . तेथे निर्णय होईल... त्यानुसार आमच्या निर्णयाची दिशा ठरेल."

Tuesday, 8 July 2025

*जिओ 500 रुपयात 100 दिवस अनलिमिटेड हायस्पीड वायफाय फ्री... इंस्टालेशन फ्री*


*जिओ 500 रुपयात 100 दिवस अनलिमिटेड हायस्पीड वायफाय फ्री... इंस्टालेशन फ्री*

*जिओ वाय फाय ची फ्री स्किम मस्त, पण कर्मचारी भलतेच "सुस्त"... जळगाव येथील जिओ कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सुस्तपणा ग्राहकांना तापदायक...*


जळगाव - येथील देशमुख नगर मधील एका ग्राहकाला जिओ सेवा कर्मचाऱ्यांचा असमाधानकारक अनुभव आला आहे.प्रस्थापित कंपन्याना 'नॉक आऊट' करणाऱ्या योजना रिलायन्स - जिओ वाले आणत असतात. त्यांची योजना पाहून अनेक ग्राहक हे मागिल कंपनी सोडून थेट जिओ ला पसंती देत असतात. मात्र स्थानिक कर्मचारी अधिकारी यांची अनास्था जिओ ला मारक ठरत आहे. जिओ तो आलिशान है मगर आलसी कर्मचारीयो से परेशान है.


देशमुख नगर, जळगाव येथील एका ग्राहकाने साधारण 12 दिवसा पूर्वी जिओ वायफाय साठी आवेदन गेले होते,ग्राहकाने सुरवातीला 350 रु. सुद्धा भरले, सोबतच 500 भरले मात्र 24 किंवा 48 तासामध्ये मोफत वायफाय इन्स्टोल करून देऊ हे दावे मात्र सपशेल फोल ठरले असून, तांत्रिक कारणाने ग्राहकाला 500 रु ऑनलाईन परत पाठवले, मात्र मागील 12 दिवसापासून टाळा टाळ, तांत्रिक कारणे, जबाबदारी ढकला ढकल, आळस,पाठपुरावा न करने,अनास्था, कर्मचारी अधिकारी समन्वयाचा अभाव, कष्ट-टाळू वृत्ती या सर्वामुळे तब्बल 12 दिवसा नंतर सुद्धा वाय फाय लागायचा पत्ता नाही. यामुळे ग्राहकांना उगाच मनस्ताप होत असून मागची कंपनीच चांगली होती अशी भावना व्यक्त होत आहे.संबधित ग्राहक आता 'योग्य' त्या मार्गाने पत्रकार परिषद, ऑनलाईन कम्प्लेंट, ग्राहक मंच किंवा जिओ ची उच्चस्तरीय मॅनेजमेंट कडे प्रयत्न करणार आहे.

Monday, 7 July 2025

*IMA ने पुकारला 11 जुलै रोजी बंद"*

*IMA ने पुकारला 11 जुलै रोजी बंद"*
रिपोर्ट अयाज मोहसीन.
(इंडिया 365 न्यूज)

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निर्णयाविरोधात IMA महाराष्ट्र राज्याचे तीव्र आंदोलन

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) ३० जून २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा तीव्र निषेध केला आहे. या अधिसूचनेनुसार, केवळ एक वर्षाचा Certificate Course in Modern Pharmacology (CCMP) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे.

हा निर्णय संपूर्ण आधुनिक वैद्यकीय क्षेत्रासाठी धोकादायक असून, डॉक्टरांच्या दीर्घकालीन शिक्षण व नैतिकतेचा अवमान करणारा आहे.

या पार्श्वभूमीवर दिनांक ६ जुलै २०२५ रोजी IMA महाराष्ट्र राज्याची विशेष कार्यकारिणी बैठक मुंबई वेस्ट शाखेत आयोजित करण्यात आली होती. MARD, AMC, MAGMO आणि विविध IMA शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सखोल चर्चा केल्यानंतर खालील आंदोलनात्मक कृती योजना जाहीर करण्यात आली:


🔹 १. निवेदन सादरीकरण – ८ जुलै २०२५ (मंगळवार)

राज्यातील सर्व IMA शाखा आपापल्या जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करतील.
स्थानिक स्पेशालिटी संघटनांचे सदस्यही सहभागी होतील.
प्रत्येक शाखेत पत्रकार परिषद घेऊन ह्या विषयाची जनजागृती करण्यात येईल.


🔹 २. एकदिवसीय आरोग्य सेवा बंद – ११ जुलै २०२५ (शुक्रवार)

🕗 सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ पर्यंत (२४ तास)
राज्यभरातील सर्व वैद्यकीय सेवा (जीवनरक्षक आपत्कालीन सेवा वगळून) पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील.
ही शांततामय कृती वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा व रुग्णांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे.


🔹 ३. “चलो मुंबई” भव्य रॅली – १९ जुलै २०२५ (शनिवार)

मुंबईत एक भव्य रॅली आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यभरातील IMA शाखांनी प्रतिनिधी पाठवावेत.
रॅलीचे ठिकाण, वेळ व वाहतूक यासंदर्भातील माहिती लवकरच दिली जाईल.


IMA महाराष्ट्र राज्याने स्पष्ट केले आहे की आधुनिक वैद्यक आणि होमिओपॅथी या दोन स्वतंत्र वैद्यकीय प्रणाली आहेत. एक वर्षाच्या कोर्सद्वारे होणारे क्रॉस-नोंदणीकरण हे डॉक्टरांच्या प्रशिक्षणाचा अपमान असून रुग्णांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करणारे आहे.

महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा संपूर्ण राज्यभरात तीव्र व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल.
जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी प्रसिद्ध केलेले
– इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र राज्य
✊ एकत्र आलो, म्हणून सक्षम झालो!
जय IMA!

Tuesday, 1 July 2025

*गृहपयोगी वस्तूंचा संच वितरणासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू – बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक* रिपोर्ट अयाज मोहसीन.

*गृहपयोगी वस्तूंचा संच वितरणासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू – बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक*

*जळगाव, दि. 1 जुलै (जिमाका)-* महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तूंच्या संचांचे वितरण आता नवीन सुधारीत कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे. मंडळाच्या http://hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत संकेतस्थळावर १ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली सुरु करण्यात येत असून, १५ जुलै २०२५ पासून प्रत्यक्ष संच वितरणास प्रारंभ होणार आहे.

              मंडळाने बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या वस्तूंचा संच मोफत वितरित करण्यासाठी राज्यभरात जिल्हानिहाय वितरण केंद्रे निश्चित केली असून, संबंधित कामगारास केवळ त्यांच्या नोंदणी असलेल्या जिल्ह्याच्या वितरण केंद्रातूनच संच प्राप्त करता येईल.
             प्रत्येक जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या जिल्ह्यातीलच वितरण केंद्रावर संच दिला जाईल. बांधकाम कामगाराने संकेतस्थळावर आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉग-इन करायचे आहे. जर कामगाराची नोंदणी निष्क्रिय असेल किंवा यापूर्वी संच घेतलेला असेल, तर तो योजनेस अपात्र ठरेल.
              पात्र कामगार आपल्या सोयीने दिनांक व केंद्र निवडू शकतो. त्यानंतर त्याला Appointment Letter मिळेल. Appointment Letter, आधार कार्ड/मंडळ ओळखपत्र घेऊन कामगाराने दिलेल्या दिनांकास संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. केंद्रावर बायोमेट्रिक ओळख व ऑनलाइन फोटो घेण्यात येईल. त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच दिला जाईल.
            संच प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्याने मंडळाचे ओळखपत्र अथवा आधार कार्ड व Appointment Letter घेऊन ठरवलेल्या दिवशी वितरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तेथे बायोमेट्रिक पडताळणी व ऑनलाईन छायाचित्र घेण्यात येणार असून त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच ताब्यात दिला जाईल.
             मंडळाच्या निर्देशानुसार, प्रत्येक कुटुंबास (पती किंवा पत्नी) केवळ एकदाच संच अनुज्ञेय राहणार आहे. तसेच, केंद्रात दररोज २५० लाभार्थ्यांना संच वितरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, कोणत्याही कारणास्तव Appointment Letter शिवाय संच वितरण केले जाणार नाही.
      वितरण प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य असून, कोणत्याही स्वरूपात शुल्क किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वितरणाच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येक केंद्रावर मंडळाचे प्रतिनिधी व नियुक्त संस्थेचे अधिकारी कार्यरत राहणार आहेत. आवश्यक सुविधा जसे संगणक, इंटरनेट, वीज, पिण्याचे पाणी इत्यादींची जबाबदारी नियुक्त संस्थेवर असेल.
        या संदर्भात अधिक माहिती व अपॉइंटमेंटसाठी कामगारांनी http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.