Tuesday, 11 January 2022

घुबडाला मिळाले नवजिवन,युवकांचे अभिनंदन

*पोरांचा पतंग खेळ रंगला अन अंधाऱ्या रात्री जीव झाडाले टांगला त्याले वाचवण्यासाठी पक्षीमित्र धावला* 
नागरिकांची सतर्कता , वन्यजीव चे पक्षीमित्र आणि मनपा प्रशासनाचे टीम वर्क घुबडाला दिले जीवदान 

सध्या पतंग बाजी चा खेळ जोर धरत आहे अनेक भागात चोरी छुपे नायलॉन मांजा वापरून पतंग उडवले जातात अनेक ठिकाणी ते मांजे झाडात गुंतून आहेत त्यात पक्षी फसून अडकतात आणि जीवाला मुकतात काही वाचवले जातात असाच एक प्रकार काल वाल्मिक नगरात घडला 
मध्यरात्री नायलॉन मांजात अडकलेल्या शृंगी घुबडाला सागर पहेलवान यांच्या सतर्कतेमुळे आणि मनपा प्रशासन वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षीमित्र यांच्या  टीम वर्क मुळे वाचवणे शक्य झाले 

वाल्मिक नगर भागातील सागर पहेलवान हे रेल्वे कर्मचारी वन्यजीवप्रेमी नागरिक आहेत त्यांचे घरा समोर पुरातन पिंपळ वृक्षावर गेल्या 7,8 वर्षा पासून एक शृंगी घुबड नेहमी बसलेले असते कधी उंदीर तर कधी इतर भक्ष घेऊन झाडावर बसलेले घुबड ते कुतूहलाने बघत असतात. 
 सोमवारी मध्यरात्री देखील त्यांनी घुबडाला शोधण्यासाठी झाडावर नजर लावली असता झाडावर फडफड जाणवली बारीक टॉर्च च्या प्रकाशात ते घुबड मांजात अडकून जगण्याचा संघर्ष करत असल्याचे दिसले त्यांनी तात्काळ वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे यांना कळवले की कोणत्याही परिस्थितीत हे घुबड वाचले पाहिजे आता वाचवले नाही तर सकाळ पर्यंत त्याचा जीव जाईल योगेश गालफाडे यांनी संस्थेचे पक्षीमित्र बाळकृष्ण देवरे यांच्याशी चर्चा करत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरम्यान मनपा अग्निशमन विभागात कॉल केला तिथे फायरमन देविदास सुरवाडे वसंत कोळी, परमेश्वर सोनवणे , यांनी फायर ऑफीसर शशिकांत बारी यांचे मार्गदर्शन घेत क्षणाचाही विलंब न करता सहमती दर्शवली पथक घटनास्थळी दाखल झाले आणि टीम वर्क रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. 

 जमिनी पासून 20 फुटावर हाय टेंशन लाईन त्याला समांतर वरती झाडावर सुमारे 40 फूट उंचीवर हे घुबड अडकलेलं होते . पिंपळाचे झाड पुरातन असल्याने बुंधा मोठा आणि सरळ  म्हणून चढताही येईना , 
खाली इलेक्ट्रिक तार असल्याने धोका देखील होता म्हणून मनपा विद्युत विभागाचे वाहन मिळवण्यासाठी त्या विभागाचे अभियंता एस एस पाटील यांना कॉल केला त्यांनी मध्य रात्र असून देखील प्रतिसाद दिला विद्युत वाहन चालक प्रशांत कंखरे देखील यायला तयार झाले. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कंट्रोल रूम गृप वर पोस्ट बघून vjss चे हरीश चौधरी, यश चौधरी , देखील पोचले
विद्युत वाहन यायला वेळ लागत असल्याने आणि सकाळ पर्यंत घुबड वाचण्याची शक्यता नव्हती म्हणून विविध कोनातून प्रयत्न करत ladder ( फायर फायटर ची शिडी ) उभे केले या साठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शिबिरात उपलब्ध संसाधनांचा वापर करत सुरक्षित रेस्क्यू चे प्रशिक्षण कामी आले 
दीड तास ladder सेट करण्यात गेला कारण हाय टेंशन तारेला स्पर्श व्हायला नको ( शक्य झाले नसते किंवा धोका जास्त असता तर मेन सप्लाय बंद करण्यासाठी परमिट घेण्याची तयारी करून ठेवली होती) 
अंधार असल्याने लांब बीम असलेल्या प्रखर टॉर्च ची आवश्यकता होती ती आमच्या जवळ नव्हती म्हणून अमन गुजर यांना कॉल केला ते 10 मिनिटात टॉर्च घेऊन पोचले 
विद्युत वाहन देखील दाखल झाले त्याने सुद्धा पक्षा पर्यंत पोचणे शक्य नव्हते म्हणून सेट केलेल्या ladder वर vjss चे पक्षीप्रेमी हरीश चौधरी ला 12 फुटाचा बांबू आकोडा लावून पाठवले तो कमी पडला म्हणून त्याला अजून एक 7 फुटाची बारीक काठी बांधली मग अलगद अंदाज घेत घुबडाला इजा होणार नाही आणि ते सरळ तारांवर देखील नको पडायला झाडात अडकले पाहिजे अश्या बेताने मांजा तोडला 4 ,5 वेळा प्रयत्न केल्यावर यश आले आणि घुबडाने भरारी घेत समोरच्या बिल्डिंग वर विसावा घेतला आणि उपस्थितांच्या तोंडून हे उदगार निघाले 
*पोरांचा पतंग खेळ जोरात रंगला अन अंधाऱ्या रात्री जीव झाडाले टांगला ...त्याले वाचवण्यासाठी पक्षीमित्र धावला*