*कोरोना युद्धात 'फ्रंटलाइन वॉरियर',मेहरून च्या डॉक्टरांची मान्यवरांनी थोपटली पाठ...*
मेहरून-जळगाव ("इंडिया365,विशेष वृत्त-अयाज़ मोहसिन).कोरोना च्या या वैश्विक संकट काळात स्वतःचे जिव धोक्यात असून सुद्धा चिकाटीने आपला रुग्णसेवेचा वसा न सोडता अविरत आपल्या डॉक्टरी पेशाला प्रामाणिक राहून सेवा करणारे,मेहरून परिसरातील विविध डॉक्टरांच्या दवाखान्याला जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरानी सदिच्छा भेट दिली.कोरोना सदृश, संशयित आणि भयभीत झालेल्या रुग्णांना फक्त योग्य औषधोपचारच नव्हे तर त्यांना समुचित मानसिक आधार,परिपूर्ण मार्गदर्शन आणि मनोधैर्य वाढविण्याचे उत्तम कार्य मेहरून भागातील डॉक्टर करित आहेत.या वेळी डॉ मोईज देशपांडे यांच्या *'देशपांडे हॉस्पिटल'* (मेहरून) मध्ये वैद्यकीय ज्ञानाला आपल्या अनुभवांची जोड देत अलोपॅथी, होमिओपॅथी आणि युनानी औषध यांचा त्रिवेणी संगम साधत ते उपचार करित आहेत. त्यांचा हाताला उत्तम गुण आहे अशी भावना अनेकांनी "इंडिया365" या वृत्तवाहिनी कडे व्यक्त केली आहे. सदर शिष्टमंडळाने हॉस्पिटलमध्ये भेट दिली असता डॉक्टरांनी सर्जिकल अप्रोन,डबल हँड ग्लोव्हज, ग्लास मास्क,सानिटायजर,इत्यादि सुरक्षा साधनांनी सज्ज होते.रुग्णालयात शारीरिक अंतर राखण्याच्या सक्त सूचना आणि पालन केले जात आहे.हा दवाखाना मेहरून आणि रामेश्वर कॉलोनी येथून समानंतर असल्याने हिंदु-मुस्लिम समाजातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी दाखल होतात आणि समाधान व्यक्त करतात.या वेळी डॉक्टर मोईज यांनी शिष्टमंडळाला मेहरून परिसरात रुग्णसेवा करणाऱ्या विविध कोरोना योध्दा डॉक्टर आणि त्यांच्या सेवा संदर्भात परिपूर्ण माहिती दिली.मान्यवरांनी मेहरून परिसरातील जे,जे डॉक्टर जिव धोक्यात घालून रुग्णांचे उपचार करीत आहेत,अश्या सर्व डॉक्टरांचे मनपूर्वक कौतुक केले.
- सदर शिष्टमंडळाने विविध डॉक्टरांची कार्यशैली जाणून घेत,त्यांचे भरभरून कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले व काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.ईकरा शैक्षणिक-वैद्यकीय संस्था अध्यक्ष करिम सालार,एटीएम संस्थाध्यक्ष गफ्फार मलिक,अल फैज संघटनेचे अजिज सालार,जन नायक संघटन फिरोज आणि फरीद,सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक डॉ रिजवान खाटिक,सामाजिक कार्यकर्ते फिरोज खान मुलतानी,किरण पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment