Friday, 4 June 2021

हॅप्पी न्यूज-दोन दिवसानंतर लॉक डॉउन 'अनलॉक'


 *व्हेरी हॅप्पी न्यूज*


*अखेर राज्य लोकडोउन मुक्त होणार,नक्की वाचा काय काय सुरू होणार?*


( *"इंडिया365"*,अयाज मोहसिन)


महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.

काल 4 जूनला मध्यरात्री याविषयी आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत ५ स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. प्रत्येक आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.


महत्त्वाचे म्हणजे पहिला टप्पा जिथे ५ % पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ % ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.


१ली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ %, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.


२री लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.


३री लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते 10 % असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील


४थी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट १० ते 20 % असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर


५ लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील


पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे

दुसर्‍या टप्प्यात ६ जिल्हे

तिसरा १० जिल्हे

चौथ्या टप्प्यात २ जिल्हे

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ ( पहिल्या टप्प्यातील जिल्हे )


रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये १०० % सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० % सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस १०० % क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे


मुंबई


मुंबई उपनगर


अहमदनगर


अमरावती


हिंगोली


नंदुरबार


दुसऱ्या टप्प्यात काय सुरु?

५० % हाॅटेल सुरू, माॅल चित्रपटगृह – ५० % ,लोकल- नाही सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाॅक सायकल सुरू, शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली, क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९, संध्याकाळी ५ ते ९ सुरू – इनडोअर आणि आऊटडोर, शुटिंग चित्रपट सुरू, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के खुले, लग्न सोहळा मॅरेज हाॅल ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत, अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल,मिटींग आणि निवडणूक ५० % उपस्थितीत, बांधकाम, कृषी काम खुली, इ काॅमर्स सुरू, जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा ५० % सुरू, शासकीय बस आसाम क्षमता १०० % सुरू, जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे


अकोला


बीड


कोल्हापूर


उस्मानाबाद


रत्नागिरी


सांगली


सातारा


सिंधुदुर्ग


अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील

माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० % खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील, लोकल रेल्वे बंद राहतील.

मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा, ५० % खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू, आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार, स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल, मनोरंजन कार्यक्रम ५० % दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार


लग्नसोहळ् ५० % क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील, बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा, कृषी सर्व कामे मुभा, ई काॅम्रस दुपारी २ पर्संत, जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

चौथ्या टप्प्यात – पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे

अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु, सरकारी खासगी कार्यालयात २५ % उपस्थिती राहणार, क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही, लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार


अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार, बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार

शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार, ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध

संचार बंदी लागू असणार, सलून, जिम ५० % क्षमता सुरु राहणार, बसेस ५० % विना उभे राहणारे प्रवाशी

५ वा टप्पा, रेड झोनमध्ये, पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये, ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड ७५ % फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील

1 comment:

  1. Live casino site | Lucky Club
    Our list of the top online casinos, with live games, the UK's biggest online luckyclub.live gambling site; is founded in 1996 and headquartered in Malta. Luckyclub

    ReplyDelete