*'सेवांकुर भारत' जळगाव* शहराचा पहिला कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न... !!
*'एक सप्ताह देश के नाम २०२२'* या कार्यक्रमाचा जळगाव शहर अनुभव कथनाचा कार्यक्रम आज दिनांक २६ जून २०२२ रोजी बाबा हरदास समाज मंदिर येथे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात *'सेवेयंब यज्ञदल्ली'* ह्या गीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उमेश जाधव यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा हस्ते दीपप्रज्वलन व भारत माता पूजन झाले. सेवांकुर जळगावच्या प्रतिनिधींनी मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत केले.
डॉ. विशाल ढाकरे सरांनी सेवांकुरची सुरुवात कशी झाली ते OWFN चे नियोजन याबद्दल माहिती सांगितली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथनाला सुरुवात झाली. GMC जळगावचे विशाल प्रजापती, गायत्री उगाले व प्रणव जाजू तसेच DUPMC जळगावचे वरुणराज ननावरे, वरूण जोशी आणि गुंजन जैन यांनी अनुभव कथन सादर केले.
DUPMC च्या चाहूल मानकर या विद्यार्थिनीने आपल्या सुमधुर आवाजात वैयक्तिक गीत सादर केले.
त्यानंतर डॉ. विलास भोळे (Senior Gynecologist), डॉ. लीना पाटील (Intensivist), श्री. रत्नाकर जी पाटील (केशवसृष्टी प्रतिष्ठान सचिव) या प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. नितीन गादेवाड सरांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
डॉ शुभम भोलाने यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन GMC जळगाव चे विद्यार्थी श्रेया घाग आणि प्रद्युमन होगे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट कृष्णाई सोळंके ने शांती मंत्र सांगून केला.
कार्यक्रमाला आलेल्या नवीन विद्यार्थ्यांनी सेवांकुर भारत सोबत जोडण्याबद्दल उत्साह दाखवला. त्यांना वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आले.
सर्वांनी शेवटी जेवांकुरचा आस्वाद घेतला.
आजच्या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर मंडळींनी सुध्दा हजेरी लावली त्यात डॉ. सुनील नहाटा (Senior Orthopaedic Surgeon), डॉ. सचिन इंगळे (Onco Surgeon), डॉ. श्री व सौ जहागीरदार, डॉ. सुनील सुर्यवंशी (MD Medicine) डॉ. सौ बंगाळे मॅडम (MD Medicine) तसेच डॉ. क्षितिज गर्गे (रा स्व संघ शहर बौद्धिक प्रमुख), श्री. विजय ठाकरे (रा स्व संघ शहर कार्यवाह), श्री. राजेन्द्र ननावरे, श्री सुनील जी यादनिक हे उपस्थित होते.
उपक्रम प्रमुख - शिवराज मुसळे, अविरत पांडव आणि टीम
बौद्धिक प्रमुख - अर्चना पंजाबी आणि टीम
संपर्क प्रमुख - वरूणराज ननावरे आणि टीम.
कार्यक्रम प्रमुख - हरीष कुटे
No comments:
Post a Comment