*जामनेर : बेटावद खुर्द मॉब लिंचिंग – मुख्य आरोपींना तात्काळ अटक, मकोका सह संगनमत कलम लावा व पीडिताच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची एकता संघटनेची मागणी*
*एस आय टी व संगनमत कलम वाढविणार: पोलिस अधीक्षक*
जळगाव :
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे ११ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या अमानवी मॉब लिंचिंग प्रकरणातील मुख्य आरोपी, जो राजकीय प्रभावाचा मानला जातो, याला अद्याप अटक न झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मुख्य आरोपी व कॅफे चालक यांना तात्काळ अटक, गुन्ह्यात संगनमत सह मकोका लावून आणि फिर्यादीच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी केली आहे. या वेळी पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांची सुद्धा उपस्थिती होती.
एकता संघटनेचे शेख यांनी स्पष्ट केले की आरोपी हा संघटित टोळीचा भाग असून, त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचा इतिहास आहे. त्यामुळे मकोका व बी एन एस ६१(२) संगनमत हे कलम लाऊन कठोर कारवाई केल्याशिवाय न्याय होणार नाही.
*एकता संघटनेच्या ठाम मागण्या*
मुख्य आरोपी व कॅफेचालक यांना तात्काळ अटक.
भा.दं.सं. कलम १२०(ब) म्हणजे बी एन एस 61(2) अंतर्गत कटकारस्थानाचा गुन्हा दाखल करा.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) तात्काळ लागू करणे.
तपास त्वरित एस आय टी कडे सोपवणे.
पीडित कुटुंबास २५ लाख रुपयांची मदत व एक सदस्यास शासकीय नोकरी.
साक्षीदार संरक्षण योजना तात्काळ लागू करणे.
सी आर पी सी कलम २४(८) अंतर्गत पीडिताच्या निवडीनुसार विशेष सरकारी वकील नेमणे
संघटनेने आपल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सह दाखले दिलेले आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने, कठोर कायदेशीर कारवाई व निष्पक्ष तपास अत्यावश्यक आहे.
या प्रसंगी संघटनेचे मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगर, मजहर पठाण,आरिफ देशमुख, अब्दुल अजीम शेख, मौलाना इमरान, रज्जाक पटेल, मौलाना कासिम नदवी , खान शकील,अरबाज शेख, इरफान शेख, हसन सैयद, उमर पटेल, नजमोद्दीन शेख, गुफरान शेख,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर निवेदनाच्या प्रती मा. गृहमंत्री, मा. आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मा. अल्पसंख्यांक आयोग, मा. मानव अधिकार आयोग, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देण्यात आलेले आहे.
फोटो कॅप्शन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करताना फारुक शेख व निवेदन देताना मुफ्ती खालीद सह शिष्टमंडळ दिसत आहे
No comments:
Post a Comment