Friday, 6 March 2026

करार पद्धतीने अधिवक्ता नियुक्तीबाबत..

करार पद्धतीने अधिवक्ता नियुक्तीबाबत..


मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयासाठी अधिवक्ता या पदासाठी ३ वर्षाच्या कालावधीसाठी करार पध्दतीने मार्गदर्शन सुचनेनुसार महामंडळाच्या जिल्हा कार्यालय छ. ९ संभाजीनगर, जालना, बीड, सातारा, पुणे, अमरावती, हिंगोली, बुलढाणा, परभणी, यवतमाळ, अकोला, वाशिम, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव यां जिल्हा स्तरावर अधिवक्ता नियुक्त करून परिश्रमिक (मोबदला) निश्चित करण्यात येईल. महामंडळाच्या कर्ज वसुली अंतर्गत १३८-निगोशिएबल इंस्ट्रुमेंट अॅक्ट अंतर्गत वेळोवेळी नोटीसा बजावून खटले मा. न्यायालयामध्ये दाखल करणे.इ. कामे पार पाडणे आवश्यक आहे. प्रशासन, वित्त व लेखा विषयक कामकाजाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास अधिवक्ता या पदासाठी प्राधान्य देण्यात येईल. सदर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. २०/०३/२०२६ पर्यंत पोस्टाने आवश्यक त्या कागदपत्रांसोबत महामंडळाच्या मुख्यालयास पाठविण्यात यावेत.

पत्ता: मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, डी.डी. बिल्डींग, दुसरा मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ या पत्त्यावर पाठविण्यात यावेत.

No comments:

Post a Comment