Monday, 21 September 2020

चितळे उद्योग समूहातर्फे राज्यातील 10 मान्यवरांचा 'बाप्पा ची मूषक सेना म्हणून गौरव,फारूक शेख यांचा मोठा सन्मान'

 (मनीषा बागुल- एच आय व्ही सह जगणारी व अध्यक्ष जाणीव संघटना- जळगाव- मो 9518515561-- यांजकडून)


*बाप्पाची मूषक सेना द्वारे जळगाव चे फारुक शेख सन्मानित*


राज्यातील १० पुरस्कारथी मध्ये एकमेव मुस्लिम


जळगाव शहरातील क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये कायमच चर्चेत असणारं एकमेव नाव म्हणजे फारूक शेख


 जळगाव शहरातील मुस्लिम इदगाह व  कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी, जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीचे अध्यक्ष व जळगाव कोविड केअर युनिटचे समन्वयक तथा प्रसिद्धीप्रमुख *विशेष म्हणजे डब्ल्यूएचओ आणि महाराष्ट्र शासनाने पन्नास वर्षांवरील व्यक्ती आणि मधुमेहाच्या रुग्णांनी घराच्या बाहेर न पडता घरातच स्वतःला सुरक्षित ठेवावे अशी सूचना दिलेली असतांना देखील फारुक शेख हे २६ वर्षा पासून मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांचे वय  ५९ वर्ष आहे तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आपणही काही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून  या कोरोना महामारी च्या झंजावती वादळात आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून गरीब,कष्टकरी वर्गाला आपल्या मदतीची ज्योत अखंडपणे तेवत ठेवली*  लॉकडाऊन पासून आज घडीपर्यंत एक कोरोणा योद्धा म्हणून सातत्याने कार्य पार पाडत आहे.


 गरिबांसाठी, रुग्णांसाठी ,कोरोना रुग्ण व कोरोना बाधित मृता साठी

जंग जंग पछाडत आहेत अशा या  अवलियाचा चितळे उद्योग समूहाने बाप्पाची मूषक सेना द्वारे सलाम करून त्यांना स्मृतिचिन्ह  व प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.


 महाराष्ट्र राज्यातील फक्त दहा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यात एकमेव मुस्लिम समाजातील शेख हे होय.


*फारुक शेख यांनी कधीच जातीच्या चौकटीमध्ये काम न करतात् त्यांची नेहमीच सर्वसमावेशक अशी भूमिका राहिलेली आहे. एच आय व्ही च्या सुमारे ३०० बालकांचे पालक म्हणून ते पाच वर्षां पासून सेवा देत आहे म्हणूनच त्यांना या अगोदरही अनेक सामाजिक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे*.


 कोरोना च्या संकटकाळात अनेक घटक कार्यरत असून सामाजिक क्षेत्रातील असंख्य संघटना व व्यक्ती तर अधिक काम करून समाजात आदर्श उदाहरण निर्माण करीत आहे त्यात  जळगावकरांना क्रीडा क्षेत्राशी अवगत असलेले  फारुक शेख अब्दुल्ला हे आज कोरोना योध्दा म्हणून परिचित झालेले आहे. 


 जळगावातील कोरोना बाधित आणि मृत्यू पावलेले प्रथम दोन्ही  इसम म्हणजे मेहरुण व  सालार नगर मधील मुस्लिम समाजाचे होते. व त्यातल्या त्यात म्हणजे  शेख यांच्या घरातीलच एक नव्हे तर दोन सख्खे मेहुणे  ठाणे व जळगाव येथील (मोठी बहीण व लहान बहिणीचे पती ) हे सुद्धा कोरोना आजाराने मृत पावले परंतु ते दुःख कवटाळत न बसता घरातील कोरोना ने मृत झालेल्या व्यक्तीच्या वेदना काय असतात या जाणिवेतून आपण समाजासाठी काहीतरी करावे म्हणूनच त्यांनी जळगावात सर्व सामाजिक संघटनांना एकत्रित करून जळगाव केअर युनिट ची स्थापना केली .


*मेडिकल सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिरे*

 जळगाव कोविड केअर युनिट च्या माध्यमाने सर्वप्रथम जळगाव शहरात व ग्रामीण भागातील खास करून मुस्लिम समाजातील लोकांची व त्या समाजात जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची भीती दूर करण्यासाठी त्यांनी  ठीक ठिकाणी कौटुंबिक सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले त्याद्वारे समुपदेश व मोफत औषधी यांचे वाटप केले सुमारे पंचवीस शिबिराच्या माध्यमातून पन्नास ते साठ हजार रुग्णांना औषधे दिली तर जे काही या कोरोना चे संशयास्पद आढळून आले त्यांच्यावर औषधोपचार करुन त्यांना बरे करण्यात आले. सुमारे सव्वा ते दीड लाख कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले व त्यांच्या मनातील भीती दूर केली त्याच प्रमाणे डॉक्टरांच्या मदतीने वार्ड क्लिनिक सुरु करण्यास डॉक्टरांना प्रोत्साहित केले.


*डॉक्टर व दवाखाने बाबत दक्षता*

ज्या रुग्णावर उपचार सुरू आहे,त्यांच्या उपचारावर,तसेच दवाखाने व तेथील सेवा सवलती बाबत एवढेच नव्हेतर वेळप्रसंगी निष्काळजीपणा करणारे डॉक्टर व दवाखाने बाबत ची लेखी तक्रार सुद्धा शेख करीत आहेत.



लॉक डाउन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना त्यांनी

*हजारो कुटुंबीयांना रेशन किट वाटप*


 लॉकडाउनच्या काळात फारुक शेख यांनी जळगाव जिल्हा मानियार बिरादरी च्या हे माध्यमाने शहरात व ग्रामीण भागात सुमारे ३५२५ कुटुंबीयांना रेशन  किट वाटप केले होते त्यात गहू, तांदूळ ,दाळ, गोडेतेल ,साखर, चहा व  चटणी इत्यादींचा समावेश होता.


*शेकडो बाधितांचा दफन विधी*


 जळगाव मुस्लिम कब्रस्तान चे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत असल्याने दफनविधी ची मुख्य जबाबदारी सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडे आली व कोरोना पॉझिटिव रुग्णाचा दफन विधी चा पहिला अनुभव जळगाव कर म्हणून त्यांना आला शहरातील दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तिसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याने  त्या डेथ बॉडी ला कब्रस्तान मध्ये मनपा चालकाने  शव वाहिके द्वारे आणले व तो चालक  आपल्या वाहनापासून स्वतःह १०० मीटर लांब जाऊन उभे राहून गेले. त्या ठिकाणी आलेले एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा ३०० मीटर लांब जाऊन उभे राहीले. अशावेळी फक्त मयत व्यक्तीचे तीन मुलं, फारुक शेख त्यांचे सहकारी अनिस शाह  यांनी त्या मृताचे दफनविधी केले तेव्हा मनातील भीती दूर झाली व आजपर्यंत शेकडो पॉझिटिव्ह कोरोना बाधित मृतांचे दफन विधी केले आहे व करीत राहणारआहे.

कबरस्थान ट्रस्ट च्या कार्याची दखल मनपा वेळो वेळी घेत असून आज पर्यंत एकही मृत व्यक्तीच्या नाते वाईकांची तक्रार नाही वा नकारात्मक बातमी सुद्धा नाही.


 *कोरोना योध्दा म्हणून अनेक संस्थांनी केले सन्मानित*


फारूक शेख  हे ज्या संघटना मार्फत कार्य करीत  आहे त्याच्या या कार्याची दखल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका, तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेस, वेल्फेअर मेमन (डब्ल्यू एम ओ) मुंबई , होप फाउंडेशन नाशिक व वर्ड मेमन ऑर्गनायझेशन (एन आय सी ), दुबई. सह नुकतेच पुणे येथील उत्सव विघ्नहर्त्याचा बाप्पांच्या मूषक सेनेच्या सेनेचा हा चितळे उद्योग समूहाने शेख यांचा गौरव करताना प्रमाणित केले आहे की *आजच्या आपमतलबी जगात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना मदत करणे, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी हात देण ही भावना दुर्मिळ झाली आहे. परंतु आपण सर्व एकाच समाजात राहतो म्हणून समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे हे आपण कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात काम करून दाखवून दिलंत. आपण केलेल्या कार्याला आमचे अभिवादन*

 म्हणून भागीदार चितळे उद्योग समूहाचे संजय चितळे यांनी त्यांचा गौरव केलेला आहे.


 *सेवा ही  "सलह" म्हणजे ईश्वर सेवा होय*

फारुक शेख म्हणतात की भुकेलेल्याना अन्न -जेवण देणे, रुग्णाची सेवा व काळजी घेणे, मृतांचे दफन विधी करणे हे इस्लाम धर्मात अत्यंत चांगले व पवित्र असे सेवाकार्य म्हणून पवित्र कुराणात व अंतिम प्रेषित यांच्या जीवन चारित्रा वरून दिसून येते  व त्याचे पुण्य मोठया प्रमाणात मिळते या तत्त्वानुसार आम्ही  हे कार्य करीत असून त्यात मला अनुभवाच्या च्या आधारे जास्त काम करण्याचे श्रेय मिळत असल्याने इतर संस्था मला वैयक्तिक पुरस्कार देत आहे. वास्तविक तो माझा एकट्याचा पुरस्कार नसून सर्वांचा आहे. आम्ही कधीच ,कोणत्याही जातीपातीचा किंवा धर्म व पंथाचा विचार करत नाही. माणुसकीचा, रुग्णसेवेचा, आपला धर्म आधी पाळायला हवा असे फारूक शेख यांना वाटते.



मानियार बिरादरी असो इदगाह कब्रस्तान ट्रस्ट असो की जळगाव कोविड केअर युनिट असो या तिन्ही संघटना विविध प्रकारे सेवा करीत आहे म्हणूनच जीवाची परवा न करता *"ईश भय"**ठेवून माणुसकीच्या धर्मासाठी आम्ही काम करीत असलो तरी इतरांच्या तुलनेत आमचे व माझे योगदान खूपच कमी असल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

 या समाज कार्या साठी मुफ्ती अतिकउर रहेमान,हाजी गफ्फार मलिक,मजीद राणाणी, सैयद चाँद,डॉ जावेद,अनिस शाह, आबीद हारून,सलीम शेख,डॉ सुयोग चौधरी,डॉ मंधान पंडित व सर्व बीयूएमएस डॉक्टर  सह आपले पूर्ण कुटुंबीयांचे सुद्धा आभार मानले आहे.

Tuesday, 14 July 2020

बकरी ईद बद्दल सरकार ची भूमिका

*कोरोनाविरुद्धचा मुकाबला जोरात सुरू*

*बकरी ईद बद्दल बैठक*

  *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत सर्व संबंधितांचे एकमत* 

            मुंबई दि १४ : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
      बकरी ईद संदर्भात आज आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी देखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी, असे आवाहन केले.
        मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
       यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको.
*उपमुख्यमंत्री*
            महाराष्ट्रातील सर्व जनतेने जात-पात, धर्म-पंथ न मानता कोरोना विरुद्धच्या लढ्यात जे सहकार्य केले, केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यासाठी ज्या यंत्रणा लढल्या, जीवाची जोखीम पत्करली, त्यांचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आभार मानले. ते म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळाले. बकरी ईदमध्ये देखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरे करावी. सण साजरे करताना आरोग्याचा विचार देखील करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
*गृहमंत्री*
गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, कोरोना साथरोगाविरुद्ध लढाई लढताना गेल्या चार महिन्यात जे
सण-उत्सव आले त्यात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य बकरी ईद निमित्त करावे. साधेपणाने हा सण साजरा करावा. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल. कंटेंनमेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसेच पोलीसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी.

   या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार सर्वश्री अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्धीकी यांनी यावेळी मत व्यक्त करून आवश्यक सूचना मांडल्या.

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस. चहल, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

००००

देशमुख यांना भावपूर्ण श्रधान्जली

* *मोहम्मद जाहिद देशमुख यांना विविध संघटनांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*

 जळगाव येथील देशमुख ऍड्वर टाईज चे मालक,मील्लत एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव जिल्ह्याचे ३५ वर्ष अध्यक्षपदी राहिलेले मोहम्मद जाहीद देशमुख यांचा वृद्धापकाळाने १० जुलै रोजी जळगाव येथील त्यांच्या रहाता घरी शनी पेठ येथे निधन झाल.

  आज जळगाव शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांतर्फे त्यांना  भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी फैजपूर येथील तथा महाराष्ट्र प्रदेश चे जमात ए इस्लामीचे प्रमुख अब्दुल रऊफ हे होते.
व्यास पिठावर मुफ्ती अतिकुर रहेमान, गफ्फार मलिक,डॉ अमानउल्लाह शहा,अब्दुल समी, अल्लाउद्दीन सेठ,करीम सालार, फारूक शेख,मुश्ताक मिर्झा, आरिफ देशमुख,साजिद देशमुख,डॉ जावेद शेख आदी होते.

 या सभेचे आयोजन जमियत उलमा ए हिंद,जमात ए इस्लामी, कुल जमाती कौन्सिल, वाहिदात ए इस्लामी, मुस्लिम ईदगाह ट्रस्ट, व एमपीजे यांच्या माध्यमाने ईदगाह  मस्जिद मध्ये करण्यात आले होते.
 या सभेत  येणाऱ्या लोकांचे हात द्वार वर सानिटायझेर करून घेण्यात आले तसेच त्यांना काही सामाजिक अंतर ठेवून बसवण्यात आले होते.
 व्यासपीठावरील खुर्च्या  सुद्धा सामायिक अंतरावर ठेवण्यात आल्या होत्या.
 कार्यक्रमाची सुरुवात मील्ली अहद यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली.

 यात खालील वक्त्यांनी मोहम्मद जाहिद देशमुख यांच्या आठवणी थोडक्यात विशद केल्या त्यात प्रामुख्याने मौलाना अहद मिल्ली,सोहेल अमीर , ज़ाकिर ख़ान सर,मुश्ताक़ मिर्ज़ा, इकबाल शाह,फारूक शेख,डॉ. अमानुल्लाह शाह, जमील देशपांडे, अब्दुल करीम सालार,अब्दुल समी खान,सैय्यद चाँद अमीर,अलाउद्दिन सेठ,अलहाज अब्दुल गफ्फार मालिक,मुफ़्ती अतिकुर्ररहमान,आरिफ देशमुख,जावेद देशमुख, अब्दुल रऊफ शेख, आदी ची भाषणे झाली.
यात प्रामुख्याने डॉ प्रो एम इकबाल,इंजिनिर अल्तामश खान,  ताजुद्दीन शेख,फरीद शेख,आबिद शेख,अझीझ सालार,सलीम मानियार,नदीम काझी,ताहेर शेख,तय्यब शेख,अहेमद सर,महेमुद खान,आदी उपस्थित होते
 या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जावेद शेख यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिस शहा, महमूद खान, फारुक शेख, मोहसिन सय्यद ,जाकीर खान व मुस्ताक मिर्झा आदींनी प्रयत्न केले.

ईकरा यूनानी कॉलेज मधे 50 ऑक्सीजन युक्त बेड,100 आइसोलेशन.

*इकरा युनानी महाविद्यालयातील *
*डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी*
*कोरोना बाधित रुग्णांसाठी ५० ऑक्सिजनयुक्त बेड तर* 
*१०० व्यक्तींसाठी अलगीकरणाची सुविधा उपलब्ध *
  जळगाव, (जिमाका) दि. १४ - जिल्ह्यातील कोरानाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावे. याकरीता जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावे याकरीता प्रशासनाने येथील इकरा युनानी महाविद्यालयात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार केले आहे. याठिकाणी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, इकरा एज्युकेशन सोसायटी व विविध सामाजिक संस्था, व दानशूर व्यक्तींच्या मदतीने ५० ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्यात आले असून ५० बेडची सुविधा तयार करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय याठिकाणी १०० व्यक्तींच्या अलगीकरणाचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 
  या हॉस्पिटलला आज सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन येथील सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच याठिकाणी आवश्यक असणारा वैद्यकीय स्टॉफ जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपलब्ध करुन दिला असून अजून आवश्यकता भासल्यास स्टाफ देण्याच्या सुचना संबंधितांना केल्यात. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्या बाधित रुग्णांना कोरोनाची मध्यम व सौम्य लक्षणे आहेत, परंतु त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात तीव्र लक्षणे असणाऱ्या ५० रुग्णांना बेड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याठिकाणी दाखल होणाऱ्या रुगणांवर चांगल्या प्रकारचे उपचार करतानाच त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा, चहा, नाश्ता, जेवण चांगल्या दर्जाचे व वेळेवर उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही  श्री. राऊत यांनी सर्व संबंधितांना दिलेत. 
  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकणी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांचेसह इकरा एज्युकेशन सोसायटीचे अब्दुल करीम सालार, अब्दुल गफार मलीक, इक्बाल शाह, रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेनन, अनिल कांकरीया, डॉ. शोएब शेख आदि उपस्थित होते. 
  यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या हस्ते कोविड हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मदत करणारे तसेच जिल्ह्यातील नागरीकांना मोफत वाटप करण्यात येणाऱ्या आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांच्या निर्मितीसाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कोविड हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कौतुक करुन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलसाठी दानशूर व्यक्तींने पुढे येण्याचे आवाहन केले. 

Thursday, 9 July 2020

दुबे का ENCOUNTER

*आखीरकार विकास दुबे का Encounter*

8 पुलिसकर्मियों की हत्या का मुख्य आरोपी विकास दुबे को कानपुर ला रही STF टीम की गाड़ी पलट गई। इस बीच सूत्रों के हवाले से खबर आ रही है कि गाड़ी पलटने के बाद विकास दुबे ने पुलिसकर्मियों से हथियार छीनकर भागने की कोशिश की और वह मुठभेड़ में मारा गया है। हालांकि, अभी आधिकारिक पुष्टि नहीं हुई है।
गाड़ी में मौजूद एसटीएफ के दो कर्मचारी भी घायल हुए हैं। घायलों को हैलेट अस्पताल पहुंचाया गया है। विकास दुबे को भी अस्पताल लागाय गया है। वह जिंदा है या मारा जा चुका है अभी पुलिस ने इसकी आधिकारिक पुष्टि नहीं की है। बताया जा रहा है कि जिस गाड़ी में विकास दुबे वह गाड़ी कानपुर में एंट्री करते ही पलट गई। इस गाड़ी में एसटीएफ के जवान मौजूद थे। इस हादसे में सभी घायलों को अस्पताल ले जाया गया।

आसमा आणि अंतरा या महाराष्ट्र कन्याचा गृहमंत्री यांना अभिमान

सहाय्यक
विक्रीकर आयुक्त या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेली नांदेडच्या पोलीस वाहनचालकांची कन्या आस्मा आणि अंतराळात झेप घेऊन फायटर पायलट झालेली नागपूरची कन्या अंतरा मेहता. या दोन्ही महाराष्ट्र कन्यांचा आम्हाला सदैव अभिमान आहे, अशा शब्दात या दोघींचे कौतुक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
नांदेड पोलीस दलामध्ये वाहनचालक या पदावर कार्यरत असलेले सय्यद जहीर अहमद यांची कन्या आस्मा हिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवून, तिची निवड सहायक विक्रीकर आयुक्त या पदी झाली याचा खूप आनंद व अभिमान वाटला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आस्माच्या  घरी दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नागपूरची कन्या

त्याचप्रमाणे नागपूरची कन्या अंतरा मेहता हिची संरक्षण दलात फायटर पायलट म्हणून निवड झाली. त्याबद्दल तिचे कौतुक गृहमंत्र्यांनी फोन करून केले. या दोघींचीही ते लवकरच भेट घेणार आहेत.
राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गृहमंत्री या नात्याने मी कुटुंबप्रमुख आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या  सुख दुःखात  सहभागी होण्याचा मी प्रयत्न करत आहे. पोलीस दलातील नोकरी सांभाळत आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण व उच्च ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मला अभिमान आहे, त्यांचे कौतुक आहे, अशा भावना गृहमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
तसेच अंतरा ही आमच्या नागपूरची कन्या असल्याने तिचाही खूप अभिमान आहे. अंतरा ही आपल्या राज्यातील पहिली महिला फायटर पायलट असून ती देशात दहावी आली आहे. तिच्या वडिलांनाही मी फोन करून शुभेच्छा दिल्या आणि अंतरालाही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन कौतुक केले.
आपल्या राज्यातील असे  कौतुकास्पद काम करणाऱ्या युवांचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप  आपण द्यायला हवी. त्यामुळे निश्चितच त्यांचे मनोबल वाढेल आत्मविश्वास वाढेल असे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

*शाहरुख खान के यहा से बिडी चोरी,मची खलबली..*

कोरोना संकट काल मे कौन कब मौका देखकर चौका मारेंगा कुछ कह नही सकते.जाने माने व्यक्ती शाहरुख खान जो मेहनत मशकक्त से रोज कमाते रोज खाते इनको भी ईस काल मे परेशान होना पडा है.लॉक डॉउन से पाकिटमार,उठाईगिर,सेंधमार,घरफोडे भी परेशान है,और छोटी मोटी चोरी कर के अपना और अपने परिवार के पेट पाल रहे है.शाहरुख खान की शॉप से बिडी,साबून, खाने की चिजे किसीं 420 व्यक्ती ने चुराते हुए कुल 5,420 रुपयो का फटका शाहरुख खान को दिया है.हालाकी ये बडी अमोउंट नही है मगर,मंदी के दौर मे और  अनलॉक के चलते ये शाहरुख खान जैसे गरिब इंसान के लिये बडा फटका है.

चोरी हुआ माल ईस प्रकार है,बिडी 1200 ₹,तेल 450,साबून 300,ईसी के साथ शेव चुडा, आचार,पेठा चुराये जाने से अज्ञात चोर निश्चित ही नंगा भुका होगा ये अनुमान लगाया जा रहा है.


बहरहाल शाहरुख खान की शिकायत पर रावेर पुलिस ने मदिना कॉलोनी स्थित ,शाहरुख खान की किराणा दुकान पर मुआयना करने पश्चात चोरी का गुनाह दाखल कर लिया है.