Tuesday, 1 July 2025

*गृहपयोगी वस्तूंचा संच वितरणासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू – बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक* रिपोर्ट अयाज मोहसीन.

*गृहपयोगी वस्तूंचा संच वितरणासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू – बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक*

*जळगाव, दि. 1 जुलै (जिमाका)-* महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तूंच्या संचांचे वितरण आता नवीन सुधारीत कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे. मंडळाच्या http://hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत संकेतस्थळावर १ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली सुरु करण्यात येत असून, १५ जुलै २०२५ पासून प्रत्यक्ष संच वितरणास प्रारंभ होणार आहे.

              मंडळाने बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या वस्तूंचा संच मोफत वितरित करण्यासाठी राज्यभरात जिल्हानिहाय वितरण केंद्रे निश्चित केली असून, संबंधित कामगारास केवळ त्यांच्या नोंदणी असलेल्या जिल्ह्याच्या वितरण केंद्रातूनच संच प्राप्त करता येईल.
             प्रत्येक जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या जिल्ह्यातीलच वितरण केंद्रावर संच दिला जाईल. बांधकाम कामगाराने संकेतस्थळावर आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉग-इन करायचे आहे. जर कामगाराची नोंदणी निष्क्रिय असेल किंवा यापूर्वी संच घेतलेला असेल, तर तो योजनेस अपात्र ठरेल.
              पात्र कामगार आपल्या सोयीने दिनांक व केंद्र निवडू शकतो. त्यानंतर त्याला Appointment Letter मिळेल. Appointment Letter, आधार कार्ड/मंडळ ओळखपत्र घेऊन कामगाराने दिलेल्या दिनांकास संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. केंद्रावर बायोमेट्रिक ओळख व ऑनलाइन फोटो घेण्यात येईल. त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच दिला जाईल.
            संच प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्याने मंडळाचे ओळखपत्र अथवा आधार कार्ड व Appointment Letter घेऊन ठरवलेल्या दिवशी वितरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तेथे बायोमेट्रिक पडताळणी व ऑनलाईन छायाचित्र घेण्यात येणार असून त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच ताब्यात दिला जाईल.
             मंडळाच्या निर्देशानुसार, प्रत्येक कुटुंबास (पती किंवा पत्नी) केवळ एकदाच संच अनुज्ञेय राहणार आहे. तसेच, केंद्रात दररोज २५० लाभार्थ्यांना संच वितरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, कोणत्याही कारणास्तव Appointment Letter शिवाय संच वितरण केले जाणार नाही.
      वितरण प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य असून, कोणत्याही स्वरूपात शुल्क किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वितरणाच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येक केंद्रावर मंडळाचे प्रतिनिधी व नियुक्त संस्थेचे अधिकारी कार्यरत राहणार आहेत. आवश्यक सुविधा जसे संगणक, इंटरनेट, वीज, पिण्याचे पाणी इत्यादींची जबाबदारी नियुक्त संस्थेवर असेल.
        या संदर्भात अधिक माहिती व अपॉइंटमेंटसाठी कामगारांनी http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

Thursday, 29 May 2025

TAIT-2025 परीक्षा वेळापत्रकात बदल : उर्दू माध्यमातील D.El.Ed विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था*

रिपोर्ट अयाज मोहसीन (Suscribe "इंडिया 365 न्यूज")
*TAIT-2025 परीक्षा वेळापत्रकात बदल : उर्दू माध्यमातील D.El.Ed विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था* 

*जळगाव दि. 29(जिमाका) :-* महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-2025 या परीक्षेचे आयोजन 27 मे ते 30 मे 2025 आणि 2 जून ते 5 जून 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. ही परीक्षा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमध्ये "पवित्र" प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.
              दरम्यान, उर्दू माध्यमातील एकूण 1107 उमेदवारांची डी.एल.एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षा आणि TAIT-2025 परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने, संबंधित उमेदवारांची TAIT परीक्षा 3 जून 2025 ऐवजी 30 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे. 
                  तरी विद्यार्थी उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे. त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेऊन परीक्षेस उपस्थित व्हावे याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराबर राहिल याची नोंद घेण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.