Saturday, 13 November 2021

मुख्यमंत्री ठाकरे की सेहत के लिए नियाजे पाक--अजमेर दौरा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी जळगावच्या शिवसैनिकांची मन्नत

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळताच जळगावचे शिवसैनिक फरीद खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी
ख्वाजा मीया बाबांच्या दर्ग्यावर 11 किलो न्याज व 50 बांधवांना अजमेर येथील प्रसिद्ध बाबांच्या दर्ग्यावर स्वखर्चाने घेऊन जाण्याची मन्नत मागितली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका व मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती समोर आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील  शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याने जळगाव शहारतील गणेश कॉलनी परिसरातील ख्वाज्या मिया दर्ग्यावर न्याज वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात होता कार्यक्रमाची सूर्वात दर्गेवर फुलांची चादर  शिवसेनेचे उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, फरीद खान, फिरोज पिंजारी, जाकिर पठाण, यांच्या हस्ते करण्यात आले असून 21 नोव्हेंबर रोजी शिवसैनिक फरीद खान हे 50 शिवसैनिकांना अजमेर येथे घेऊन जाणार आहेत.

Friday, 27 August 2021

शिवसेना आंदोलना मूळे ,भाजपा कार्यालय शुद्धीकरण

भाजपा जळगाव तर्फ़े प्रकाशित प्रेस नोट:-

आज दिनांक २७/०८/२०२१ रोजी भाजपा महिला मोर्चा व अध्यात्मिक आघाडी जळगाव यांच्यातर्फे वसंत स्मृती कार्यालय जळगाव येथे शुद्धीकरणाचे कार्यक्रम संपन्न झाले असून दिनांक 24 तारखेला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालय येथे कोंबड्या वेगळ्या व हिंदूंचे पवित्र शब्द काढले व कार्यकर्त्यांना मारहाण करून अत्यंत खालच्या शब्दात घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांच्या वतीने उभा राहिलेल्या असे राजकीय वस्तू शुद्धीकरण अध्यात्मिक आघाडी यांच्यातर्फे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, यांच्या नेतृत्वात अध्यक्षा दिप्ती ताईचे, माड्या सरचिटणीस रेखाताई वर्मा, सरोज पाठक, जिल्हा पदाधिकारी रेखाताई कुलकर्णी, महिला आघाडीच्या पूजाताई चौधरी, तृप्ती पाटील, सरचिटणीस उदय परदेशी छायाताई ,सरस्वती मोरे, शर्वरी मोरे, ज्योती बर्गे, आदी महिला उपस्थित होत्या.

 यांच्यातर्फे कार्यालय येथे हवन करून शुद्धीकरण करण्यात आले या होणार जिल्हाध्यक्ष दीपक यांनी सिद्ध करणार होती कार्यक्रम या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र दिपक जी साखरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद मिलिंद चौधरी, व कार्यालय मंत्री सकाळची पंडित जिल्ह्यासह प्रसिद्धीप्रमुख योजना धिरज वर्मा, राहुल भाऊ वाघ, निलेश भाऊ झोप, या आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tuesday, 24 August 2021

कोरोना काळातही जैन इरिगेशन ने दिला रोजगार..

कोरोनाकाळातही जैन इरिगेशनने 

नवीन १०६० जणांना दिली कायमस्वरूपी नोकरीची संधी

जळगाव दि२४ प्रतिनिधी - दोन वर्षाच्या कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी वेळोवेळी पूर्णतः लॉकडाऊन आणि काही वेळा निर्बंध घातल्याचा प्रतिकूल परिणाम उद्योग-व्यवसाय-व्यापारावर झालाबहुतांश उद्योगांमध्ये कामगार यांना दीर्घ सुटी देण्यात आली किंवा कामगार कपात करावी लागली तर काहींनी वेतन कपात केलीअशाही स्थितीत जळगावमधील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमध्ये असे काहि न करता विविध कामांसाठी पदांवर नव्याने १०६० जणांना कायमस्वरूपी नोकरीची संधी देऊन सामावुन घेतले आहे.

जैन इरिगेशन आणि संलग्न उत्पादक कंपन्यांवर सध्या वित्त पुरवठा विस्कळीत झाल्याचे संकट आहेतरीही सामाजिक बांधिलकी ठेऊन नियमित सहकारी (कामगारशिवाय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेतसध्या जैन इरिगेशनच्या जळगाव स्थित आस्थापनामधे ६२५० कायमस्वरूपी सहकारी आहेत याशिवाय सरासरी २५०० ते ४५०० कंत्राटी कामगार गरजेनुसार सेवा पुरवित आहे.

मार्च २०२० पासून भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागलाजुलै २०२० पासून विषाणूच्या संसर्गाने बाधित रूग्ण संख्या सप्टेंबरपर्यंत लाखांच्यावर पोहचलीकेंद्र सरकारने सलग तीन वेळा लॉकडाऊन वाढवलेत्यामुळे उद्योगातील उत्पादन निर्मिती थांबलीकच्चामाल पुरवठा थांबलाजे उत्पादन तयार होते ते पोहचवले जात नव्हतेअशा स्थितीत आर्थिक अडचणी अजून वाढल्याहे सर्व अनुभवाला येत असतानासुद्धा जैन इरिगेशनच्या व्यवस्थापनाने महामारी व लॉकडाऊन काळात नियमित कामगाराचा रोजगार कमी करायचा नाही असा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला.

खाजगी संस्थाना लस विकत घेण्याची परवानगी मिळालेनंतर जैन इरिगेशनने कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करून सर्व सहकाऱ्यांना टोचणी करून घेतलीया लसीकरणाचा लाभ ४६०० कर्मचाऱ्यांनी घेतला आहेयाशिवाय कामावर येणाऱ्या सर्व सहकारी-कामगारांची लसीकरणाची व्यवस्था करून या सहकाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व तपासणी करण्यासाठी १० डॉक्टर तसेच १७ वैद्यकीय सहाय्यकांचे पथक रोज कार्यरत होते व आहेजैन इरिगेशन व्यवस्थापनाने वेळोवेळी सहकारी-कामगारांशी परिपत्रकांद्वारे संपर्क करून कोरोनाची लक्षणेप्रतिबंधात्मक उपायआजारपणात घ्यायची काळजीआजार बरा झाल्यानंतर पश्चात घ्यायची काळजी याविषयी कामगार व त्यांच्या कुटुंबात जागृती केली आणि करीत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव संपर्कातून होतो हे लक्षात घेऊन उत्पादन निर्मिती पाळ्यांमध्ये अर्धा तासाचे अंतर वाढविलेया काळात योग्य पद्धतीने कामाची जागा सॅनिटायझर केलीया शिवाय कामगारांमधील अंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार राखलेकंपनीच्या आवारात जेवणाची व्यवस्था बदललीबंदिस्त जागेतून खुल्याजागेत योग्य अंतरावर बसायची व्यवस्था केली आहेकाही कामगारांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आलीबाहेरगावाहून कंपनीत कामावर येणाऱ्यांसाठी आरोग्याची माहिती देणारे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होतेरोज कामावर येणार्‍या सहकार्‍यांची प्रवेशद्वारावर ऑक्सिमीटर व थर्मामीटरने वेळोवेळी तपासणी केली जातेतेथे साबणाने हात धुवून सॅनिटायझर फवारणीची व्यवस्था केली आहे.

कामगारांसाठी विशेष योजना

लॉकडाऊन काळात काही कामगारांचे येणे-जाणे सुरक्षित व्हावे यासाठी व्यक्तिगत दुचाकी वाहन खरेदी योजनेत कंपनीकडून ६० टक्के उचल दिली गेलीत्यात १४४ महिला तसेच २५५ पुरूष अशा एकूण ३९९ कामगारांनी लाभ घेतलाकंपनीमध्ये कोरोनाच्या तपासणी शिबिर घेऊन ५३६७ सहकारी-कामगारांची ॲन्टीजन टेस्ट करून घेतलीएवढी काळजी घेऊनही जे कामगार कोरोना संसर्गामुळे आजारी झाले त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी खास पथक आहेया पथकाचे नियंत्रण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्याकडे आहेया पथकाने वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्ला-मसलत केलीकामगारांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्यासंसर्ग बाधित कामगाराला दवाखान्यात बेड-गरजेनुसार ऑक्सिजनइतर उपकरणे उपलब्ध करून दिली यासह रूग्ण कामगार व कुटुंबाची भोजन व्यवस्था केली.

कामगारांच्या वारसांना रोजगार व शिष्यवृत्ती

कोरोना प्रकोपाच्या काळात योग्य काळजी घेऊनही दुर्दैवाने जैन उद्योग समुहातील काहि सहकाऱ्यांचा मृत्यू झालात्या कामगारांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत दिली गेली या सह त्या कामगारांच्या वारसाला त्याच्या शिक्षण व गुणवत्तेनुसार कायम स्वरुपाचा रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आलाशिक्षण घेत असलेल्या पाल्याच्या मूलभूत शिक्षणाचा खर्चही कंपनी उचलणार आहेकाही कामगाराचे पाल्यपत्नी हे कामावर रुजू ही झालेले आहेत.

कोट...

करोना काळात सर्वच उद्योगांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले याही परीस्थितीत जैन इरिगेशनने कामगार कपाती याऐवजी नव्याने १०६० लोकांना कायमस्वरूपी सामावून घेतले यासह त्यांचा सुरक्षिततेसाठी संपूर्ण लसिकरणदुचाकी वाहन योजनाआरोग्याची पुरेपुर काळजी घेत असल्याने कंपनी आपले उत्पादन नियमीत सुरू ठेऊ शकत आहे.

अतुल जैनसहव्यवस्थापकीय संचालकजैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमीटेड

Monday, 23 August 2021

जवान गोपालच्या कुटुंबाचे पालकमंत्रीनी केले सांत्व

जवान गोपाल सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सात्वंन
  जळगाव, (जिमाका) दि. 23 - ओडिशा येथे सीआयएसएफ मध्ये कार्यरत असलेले कुऱ्हाड, ता. पाचोरा येथील जवान गोपाल अरुण सुर्यवंशी यांचे नुकतेच निधन झाले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज कुऱ्हाड येथे जावून जवान गोपाल सुर्यंवशी यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंन केले. 
  यावेळी पालकमंत्र्यांनी जवान अरुण सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे यावेळी सांगितले. याप्रसंगी पालकमंत्र्यांसोबत आमदार किशोर पाटील यांचेसह ग्रामस्थ, कुटूंबिय उपस्थित होते. 
000000

*दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका सुरु* जळगाव, (जिमाका) दि. 23 - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच 19-सीपी-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 25 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावेत. या अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनादेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा. शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.00000

Thursday, 12 August 2021

मोहर्र्म के बारे मे कलेक्टर महोदय के निर्देश

*मोहरम साध्या पध्दतीने साजरा करण्यासाठी*
*जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांनी निर्गमित केल्या मार्गदर्शक सुचना*
 जळगाव, (जिमाका) दि. 12 - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा मोहरम साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहिर करण्यात आल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करुन साध्या पध्दतीने साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 
यावर्षी मोहरम महिन्याच्या 9 व्या दिवशी दिनांक 18 ऑगस्ट, 2021 रोजी शहादत की रात तसेच योम-ए-आशुरा 10 व्या दिवशी दिनांक 19 ऑगस्ट, 2021 येत असून त्यानिमित्त मात्तम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूक काढता येणार नाही. कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरीकांनी देखली एकत्रित मातम/दुखवटा करु नये. वाझ/मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावे. ताजिया/आलप, ताजिया/आलम काढु नयेत. सबील/छबील बांधण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्याठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोणातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीने पाण्याचे वाटप करावे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.  
  कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या काळात आणखी काही मार्गदर्शक सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असेही श्री. राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000

Wednesday, 4 August 2021

वाहन लिलाव-11 आगस्ट रोजी

*जळगाव तहसील कार्यालयाने*
*जप्त केलेल्या वाहनांचा 11 ऑगस्ट रोजी लिलाव*
जळगाव, (जिमाका) दि. 4 - जळगाव तालुक्यातील नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन व वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनमालकांविरुध्द तहसिलदार, जळगाव यांनी दंडात्मक कार्यवाहीची नोटीस व आदेश दिलेले आहेत. परंतु संबधित वाहनमालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही.  त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांची जाहिर लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करण्यात येणार आहे. याकरीता या वाहनांचा बुधवार, 11 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. असे प्रसाद मते, उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
  या वाहनांवर कोणत्याही फायनान्स कंपनी व बँकेचे कर्ज किंवा रक्कम येणे बाकी असेल तर अशा फायनान्स कंपनी व व बँकेने आपली हरकत जाहिरनामा प्रसिध्द होण्याच्या दिनाकांपासून सात दिवसाच्या आत लेखी स्वरुपात उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांचेकडे समक्ष दाखल करावी. 
जास्तीत जास्त इच्छुक नागरीक, संस्थांनी या लिलावात भाग घ्यावा. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती याकरिता उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, जळगाव यांचे कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असेही श्री. मते यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 
00000