Friday, 20 May 2022

चांदोरकर प्रतिष्ठाण पुण्यात सन्मानित..

स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

(इंडिया365)

मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या प्रतिथयश संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासम्मेलन -२०२२ च्या आयोजनानिमित्तने *राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक संस्था सेवारत्न पुरस्कार - २०२२* ह्या पुरस्काराने प्रतिष्ठानास गौरविण्यात आले.  
हा पुरस्कार समारंभ पुणे येथे श्री उद्यान कार्यालय, सदाशिव पेठ येथे नुकताच संपन्न झाला. सन्मानचिन्ह, मानपत्र, गौरवपदक, महावस्त्र, मानाचा फेटा व मानाचा बॅच असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा मानाचा पुरस्कार राज्यस्तरीय असून त्यासाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाची निवड होणे हि जळगाव सह खान्देशा साठी अभिमानाची गोष्ट आहे. 
ह्या पुरस्काराचे वितरण श्री. प्रकाश सावंत (महापरिषद समन्वयक) सौ. मनीषा कदम (पुरस्कार समारंभाध्यक्षा) अमोल सुपेकर (अध्यक्ष) एल.एस.दाते (कार्याध्यक्ष, पुरस्कार समिती) यांच्या उपस्थितीत व सुप्रसिद्ध कीर्तनकार व तत्वचिंतक ह.भ.प. श्यामसुंदर आळंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार कार्यकारी समिती सदस्य श्री. निनाद चांदोरकर यांनी स्वीकारला.

Saturday, 16 April 2022

जैन इरिगेशन ची विक्रमी पारितोषिके

*जैन इरिगेशनला निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्लेक्स कौन्सिलची तेरा पारितोषिके*
*ड्रीप इरिगेशन, पाईप्स, पीव्हीसी फोमशीट व  क्षेत्रातल्या निर्यात कार्याबाबत झाला गौरव*

*मुंबई दि. 16 (प्रतिनिधी)* - जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध 13 गटातून प्लेक्स कौन्सिलचे प्रथम क्रमांकाचे निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुंबईच्या कफ परेड येथील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे प्लेक्स कौन्सिलचे  2017-18, 2018-19, 2019-20 व 2020-21 अशा चार आर्थिक वर्षातील 12 प्रथम पुरस्कार व एक द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीच्या ड्रीप इरिगेशन विभागाच्या उत्तुंग कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार स्वीकारला. त्याचप्रमाणे कंपनीच्यावतीने त्या-त्या विभागासाठीचे पुरस्कारदेखील कंपनीच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते, प्लेक्स कौन्सिलचे  चेअरमन अरविंद गोयंका, व्हाईस चेअरमन हेमंत मिनोचा, कार्यकारी संचालक श्रीभाष दासमोहपात्रा, रविश कामत, मुंबई विभाग आयकर आयुक्त आलोककुमार या मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारोह पार पडला.

कृषी व कृषी उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक किर्तीची अग्रणी कंपनी जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखत 2017-21 या वर्षासाठी ठिबक सिंचन (एमआयएस), पीव्हीसी फोम शीट, पाईप्स अॅण्ड होजेस विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली. 2019-20 या वर्षासाठी पाईप्स अॅण्ड होज फिटींगया विभागाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिले गेले. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील कंपनीने उत्पादन व निर्यातीत वर्चस्व कायम ठेवत सर्वोत्तम कामगिरी केली हे या पुरस्कारासासाठी अधोरेखित झाले. कंपनीच्या वतीने चारही वर्षांच्या या एकूण 13 पुरस्कारांचा स्वीकार सहकाऱ्यांनी केला. त्यामध्ये पी. सेनगोट्टीयन, मनिष झेंडे, अजय काळे, संदीप जैन, प्रसाद दुर्गे, विजयसिंग पाटील, प्रवीण कुमट, नितीन चौधरी, संदीप पाटील, राजेंद्र लोढा, महेश इंगळे, प्रशांत जयस्वाल आणि भरत बडगुजर या सहकाऱ्यांचा समावेश आहे.

प्लेक्स कौन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाद्वारे 1955 मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. चा प्लास्टीक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल प्लेक्स कौन्सिलतर्फे 1991 पासून दरवर्षी सन्मान होत आला आहे.
*(चौकट – मा. अशोकभाऊ जैन यांची प्रतिक्रिया)*
कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कै. भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक होय, ते म्हणत असत की, "गुणवत्तेच्या जोरावरच आपण स्पर्धेला पात्र ठरू शकतो; किंबहुना स्पर्धकांना मागे टाकू शकतो. तसेच चोखंदळ ग्राहक व बाजारपेठ आपणास जागतिक कीर्ती मिळवून देऊन अग्रस्थानी बसवू शकते.” उत्तम, उदात्त, गुणवत्तेचा ध्यास घेत भविष्यात अनेक दर्जेदार वस्तु, शेतीत प्लास्टिकल्चर कशा वापरता येईल याकडे लक्ष दिले. जैन इरिगेशनला 1991 पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यांच्या कष्टाचा, समर्पण भावनेचा हा सन्मान आहे असे मी मानतो."
-    *अशोक जैन*
*अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव*

*फोटो कॅप्शन*   जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन कंपनीच्या ड्रीप इरिगेशन विभागासाठी वर्ष 2020-21 चा पुरस्कार केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते स्वीकारताना शेजारच्या छायाचित्रात प्लेक्स कौन्सिलच्या विविध पुरस्कारांसह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांच्यासमवेत कंपनीचे सहकारी पी. सेनगोट्टीयन, मनिष झेंडे, अजय काळे, संदीप जैन, प्रसाद दुर्गे, विजयसिंग पाटील, प्रवीण कुमट, नितीन चौधरी, संदीप पाटील, राजेंद्र लोढा, महेश इंगळे, प्रशांत जयस्वाल आणि भरत बडगुजर

Saturday, 9 April 2022

जैन्स च्या शिरपेचात मोठा तुरा

*महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव*
*राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला पुरस्कार*
*नाशिक (ता.9) प्रतिनिधी –* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखेतर्फे सुवर्ण वर्ष महोत्सवानिमित्त दोन दिवसांची विकास परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये कान्हदेशच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा गौरव करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार समारंभ नाशिक येथील कालीदास कलामंदिर येथे पार पडला.
याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ,  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सुधाकर देशमुख उपस्थित  होते.
या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार देवयानी फरांदे , महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. व नाशिक जिल्हाचे पोलीस अधिक्षक व अनेक मान्यवर उपस्थित होते .
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या दोन दिवसीय विकास परिषदेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य व कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे,   वेगवेगळ्या सत्रांमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेसाठी राज्यभरातील 120 पदाधिकारी सहभागी झाले होते. विकासात महिलांचा सहभाग वाढविणारे धोरण, औद्योगिक विकासात नव्या तंत्रज्ञानाचा सहभाग, पर्यटन आणि क्लस्टर बेस डेव्हलपमेंटचे धोरण यावर विचार मंथन करण्यात आले.  
जैन इरिगेशन सिस्टीम लि. यांच्यासह महिंद्रा एण्ड महिंद्रा, एचएएल, सह्याद्री फार्म, बेदमुथा इंडस्ट्री, नाशिक, दादासाहेब रावल ग्रुप ऑफ इंडस्ट्री, शिरपूर एज्यकेशन सोसायटी, महाराष्ट्र सलवंत एक्सट्रेक्शन- धुळे, मालपाणी ग्रुप-संगमनेर नगर, यांचाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते गौरव यावेळी करण्यात आला.

*फोटो कॕप्शन* - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार स्वीकारताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन सोबत पालकमंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र चेंबर आॕफ काॕमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सुधाकर देशमुख.

Tuesday, 15 March 2022

"गर्भवती माता आणि गुंतागुंती चे आजार"-चर्चासत्र संपन्न.

*"गर्भवती माता आणि गुंतागूंती चे आजार" -चर्चासत्र संपन्न*

 जळगाव क्रिटिकल सोसायटी आणि आय एम  ए जळगाव 
यांनी एक  कॉन्फरन्स आय एम ए हॉल जळगाव येथे आयोजित केली .
गर्भवती माता आणि त्यांच्यातला गुंतागुंतीचे आजार , त्यांच्यातले डिलिवरी क्या वेळेस होणारे रक्त स्त्राव त्यांच्यात बऱ्याचदा त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे गर्भाशय काढावे लागते त्यावर जास्त चर्चा झाली ..
गर्भवती मध्ये  एच आय व्ही चे प्रमाण वाढले आहे त्यावर चर्चा झाली ..
उच्च रक्तदाब आणि त्यातून होणारे complication कसे हाताळायचे यावर  चर्चा झाली ..यावेळी गर्भवती स्त्रिया ना होणारे इन्फेक्शन आणि महिलांमध्ये जडपणामुळे होणारे प्रॉब्लेम ...आणि  हार्ट अटॅक , कॉर्डियाक  अरेस्ट यावर देखील चर्चा झाली 
यावेळी औरंगाबाद येथील एम जी एम  हॉस्पिटल मधील  consultant डॉ साधना कुलकर्णी आणि डॉ आनंद निकाळजे , नोबल हॉस्पिटल पुणे येथील कन्सल्टंट डॉ बाळासाहेब बांडे ,डॉ अमित द्रविड , पंढरपूर येथील स्त्रीरोग तज्ञ आणि लॉ केलेले डॉ सुजित दोषी यांनी  वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले .
यावेळी सूत्र संचालन डॉ प्रीती भारुडे आणि डॉ लीना पाटील आय सी यू तज्ञ यांनी केले.
क्रिटिकल केअर सोसायटी जळगाव संघटना  ची नवीन कार्यकारणी जाहीर झाली . chairperson डॉ राजेश दाबी , सेक्रेटरी डॉ रविंद्र पाटील ,tresurer डॉ अमित हिवरकर , excutive पद ,डॉ सुनील सूर्यवंशी , डॉ पंकज बढे , डॉ राजेश मंवतकर भुसावळ ,डॉ डी ओ पाटील चोपडा ,डॉ पल्लवी राणे ,डॉ कल्पेश गांधी 
यांनी पदभार स्वीकारला.
यावी डॉ संजय उंबरकर ,डॉ अभिनय हरणखेडकर , डॉ राहुल महाजन,  माजी नगराध्यक्ष डॉ के डी पाटील ,  उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि माझी खाजदार 
 डॉ उल्हास पाटील , आय एम ए अध्यक्ष डॉ सी जी चौधरी , आय एम ए  सेक्रेटरी डॉ radhyshyam चौधरी , डॉ सुमन लोढा , डॉ विलास भोळे ..आदी मान्यवर उपस्थित होते..
या conferance मध्ये जळगाव जिल्यातील  १५० पेक्षा जास्त  भुलतज्ञ , स्त्रीरोग तज्ञ , आणि physician यांनी लाभ घेतला..

Tuesday, 1 February 2022

बजेट-संमिश्र प्रतिक्रिया

बजट संदर्भात विविध प्रतिक्रिया ...
1) माजी खासदारडॉ उल्हास पाटिल
2) गिरिश महाजन,माजी मंत्री
3) अशोक भाऊ जैन


घोषणाबाज अर्थसंकल्प 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा निव्वळ घोषणाबाज असल्याचा भासत आहे. सहकार, शेती क्षेत्र, आरोग्य, गुंतवणूक यासारख्या महत्वाच्या बाबींसंदर्भात भरीव तरतुदीची अपेक्षा होती. ज्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत त्या प्रत्यक्षात कशा अंमलात आणल्या जातील याविषयीचे ठोस नियोजन दिसत नाही. आरोग्य क्षेत्र डिजीटल करण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली असली तरी त्याची व्याप्ती आणि स्वरूप कसे राहील हे स्वप्नरंजनच आहे. कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रात कमालीचे बदल झाले आहेत. त्यादृष्टीने आरोग्यासाठी भरीव तरतूद करणे आवश्यक होते. कररचनेत कुठलाही बदल न झाल्याने सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. यापुर्वीच मोदी सरकारने २ कोटी रोजगाराची घोषणा केली होती. ती अद्याप पूर्ण झाली नाही. तोच आता नव्याने ६० लाख रोजगारांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. २०४७ च्या विकासाची ब्लु प्रिंट म्हणून घोषित झालेला हा अर्थसंकल्प केवळ घोषणाबाजच असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.

गिरिश भाऊ महाजन:-

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प : आ. गिरीश महाजन

जळगाव प्रतिनिधी | केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कोविडच्या आपत्तीतही शेतकर्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा असून यातून देशाचा चौफेर विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे आ. गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले की, सध्या देशावर कोविडच्या आपत्तीचे संकट असतांनाही शेतकरी, शेतमजूर, कामगार आदींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय आज सरकारने जाहीर केले आहेत.

यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे केंद्र सरकारने कडधान्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले असून याचे मूल्य शेतकर्यांना थेट आपल्या खात्यामध्ये मिळणार आहेत. रासायनिक खतांनी मुक्त असणार्या शेतीला यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये आता नैसर्गिक शेती, झीरो बजेट शेती आदी विषयांचा समावेश करण्यात येणार असल्याची बाब अतिशय महत्वाची अशीच आहे. अर्थमंत्र्यांनी किसान ड्रोनच्या माध्यमातून आधुनीक शेतीसाठीची तरतूद देखील केलेली आहे. शेतीसोबत यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगारालाही प्राधान्य देण्यात आले असून वर्षभरात ६० लाख नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. तर लहान व मध्यम व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी देखील अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आधीच आत्मनिर्भर भारताचे व्हिजन मांडले असून निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात याचे प्रतिबिंब उमटल्याचे आ. गिरीशभाऊ महाजन यांनी नमूद केले आहे. यात अर्थव्यवस्थेची प्रगती ही समाधानकारक राहणार असून यंदा झालेले विक्रमी जीएसटी संकलन हे याचेच प्रतीक आहे.

आ. महाजन पुढे म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे.  महाराष्ट्राच्या वाटेलाही यात भरीव तरतुद करण्यात आलेली आहे. यात नागपूर व नाशिक येथील मेट्रोसाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर भुसावळ-खरगपूर कॉरिडॉरमुळे माल वाहतुकीची सुविधा होणार असून याचा स्थानिक शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांना लाभ होणार आहे.

आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की, प्रथमच शेती करता बॉस सारख्या आधुनिक उपक्रमाचा वापरामध्ये प्रोत्साहन दिलं शिक्षण क्षेत्रात भरीव तरतुदी करून अंगणवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत जागतिक दर्जाच्या संस्थांना आमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण निर्मितीचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे.  साठ लाख नोकर्‍या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलं उद्योगांना तसंच कर न चुकविणार्‍या यांना जर रेड पडली तर त्यामध्ये जप्त असलेले सर्व साहित्य कायमस्वरूपी जप्तीचा मोठ्या निर्णयाचे स्वागत आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच डिजिटल यंत्र भरीव तरतूद करून याच्या वापराला प्रोत्साहन दिलं तसेच ८० हजार नवीन घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून निर्मितीचे उद्दिष्ट या यावेळी ठेवण्यात आले असून प्रगतीसाठी या बाबी पूरक असल्याचेही आमदार गिरीश महाजन यांनी नमूद केले आहे.

अशोक भाऊ जैन:-
*"हा तर डिजिटल अर्थसंकल्प"--अशोक भाऊ जैन यांची बजेट वर प्रतिक्रिया..*

*ड्रोन टेक्नोलॉजी मुळे एक कोटि शेतकऱ्यांचे लाभ शक्य...*

*पहा सविस्तर...."इंडिया365" वर.....*

अयाज़ मोहसिन 9273403088.

https://youtu.be/Ed1aVsjB_JQ




Tuesday, 11 January 2022

घुबडाला मिळाले नवजिवन,युवकांचे अभिनंदन

*पोरांचा पतंग खेळ रंगला अन अंधाऱ्या रात्री जीव झाडाले टांगला त्याले वाचवण्यासाठी पक्षीमित्र धावला* 
नागरिकांची सतर्कता , वन्यजीव चे पक्षीमित्र आणि मनपा प्रशासनाचे टीम वर्क घुबडाला दिले जीवदान 

सध्या पतंग बाजी चा खेळ जोर धरत आहे अनेक भागात चोरी छुपे नायलॉन मांजा वापरून पतंग उडवले जातात अनेक ठिकाणी ते मांजे झाडात गुंतून आहेत त्यात पक्षी फसून अडकतात आणि जीवाला मुकतात काही वाचवले जातात असाच एक प्रकार काल वाल्मिक नगरात घडला 
मध्यरात्री नायलॉन मांजात अडकलेल्या शृंगी घुबडाला सागर पहेलवान यांच्या सतर्कतेमुळे आणि मनपा प्रशासन वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षीमित्र यांच्या  टीम वर्क मुळे वाचवणे शक्य झाले 

वाल्मिक नगर भागातील सागर पहेलवान हे रेल्वे कर्मचारी वन्यजीवप्रेमी नागरिक आहेत त्यांचे घरा समोर पुरातन पिंपळ वृक्षावर गेल्या 7,8 वर्षा पासून एक शृंगी घुबड नेहमी बसलेले असते कधी उंदीर तर कधी इतर भक्ष घेऊन झाडावर बसलेले घुबड ते कुतूहलाने बघत असतात. 
 सोमवारी मध्यरात्री देखील त्यांनी घुबडाला शोधण्यासाठी झाडावर नजर लावली असता झाडावर फडफड जाणवली बारीक टॉर्च च्या प्रकाशात ते घुबड मांजात अडकून जगण्याचा संघर्ष करत असल्याचे दिसले त्यांनी तात्काळ वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे यांना कळवले की कोणत्याही परिस्थितीत हे घुबड वाचले पाहिजे आता वाचवले नाही तर सकाळ पर्यंत त्याचा जीव जाईल योगेश गालफाडे यांनी संस्थेचे पक्षीमित्र बाळकृष्ण देवरे यांच्याशी चर्चा करत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरम्यान मनपा अग्निशमन विभागात कॉल केला तिथे फायरमन देविदास सुरवाडे वसंत कोळी, परमेश्वर सोनवणे , यांनी फायर ऑफीसर शशिकांत बारी यांचे मार्गदर्शन घेत क्षणाचाही विलंब न करता सहमती दर्शवली पथक घटनास्थळी दाखल झाले आणि टीम वर्क रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. 

 जमिनी पासून 20 फुटावर हाय टेंशन लाईन त्याला समांतर वरती झाडावर सुमारे 40 फूट उंचीवर हे घुबड अडकलेलं होते . पिंपळाचे झाड पुरातन असल्याने बुंधा मोठा आणि सरळ  म्हणून चढताही येईना , 
खाली इलेक्ट्रिक तार असल्याने धोका देखील होता म्हणून मनपा विद्युत विभागाचे वाहन मिळवण्यासाठी त्या विभागाचे अभियंता एस एस पाटील यांना कॉल केला त्यांनी मध्य रात्र असून देखील प्रतिसाद दिला विद्युत वाहन चालक प्रशांत कंखरे देखील यायला तयार झाले. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कंट्रोल रूम गृप वर पोस्ट बघून vjss चे हरीश चौधरी, यश चौधरी , देखील पोचले
विद्युत वाहन यायला वेळ लागत असल्याने आणि सकाळ पर्यंत घुबड वाचण्याची शक्यता नव्हती म्हणून विविध कोनातून प्रयत्न करत ladder ( फायर फायटर ची शिडी ) उभे केले या साठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शिबिरात उपलब्ध संसाधनांचा वापर करत सुरक्षित रेस्क्यू चे प्रशिक्षण कामी आले 
दीड तास ladder सेट करण्यात गेला कारण हाय टेंशन तारेला स्पर्श व्हायला नको ( शक्य झाले नसते किंवा धोका जास्त असता तर मेन सप्लाय बंद करण्यासाठी परमिट घेण्याची तयारी करून ठेवली होती) 
अंधार असल्याने लांब बीम असलेल्या प्रखर टॉर्च ची आवश्यकता होती ती आमच्या जवळ नव्हती म्हणून अमन गुजर यांना कॉल केला ते 10 मिनिटात टॉर्च घेऊन पोचले 
विद्युत वाहन देखील दाखल झाले त्याने सुद्धा पक्षा पर्यंत पोचणे शक्य नव्हते म्हणून सेट केलेल्या ladder वर vjss चे पक्षीप्रेमी हरीश चौधरी ला 12 फुटाचा बांबू आकोडा लावून पाठवले तो कमी पडला म्हणून त्याला अजून एक 7 फुटाची बारीक काठी बांधली मग अलगद अंदाज घेत घुबडाला इजा होणार नाही आणि ते सरळ तारांवर देखील नको पडायला झाडात अडकले पाहिजे अश्या बेताने मांजा तोडला 4 ,5 वेळा प्रयत्न केल्यावर यश आले आणि घुबडाने भरारी घेत समोरच्या बिल्डिंग वर विसावा घेतला आणि उपस्थितांच्या तोंडून हे उदगार निघाले 
*पोरांचा पतंग खेळ जोरात रंगला अन अंधाऱ्या रात्री जीव झाडाले टांगला ...त्याले वाचवण्यासाठी पक्षीमित्र धावला*

Saturday, 13 November 2021

मुख्यमंत्री ठाकरे की सेहत के लिए नियाजे पाक--अजमेर दौरा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी जळगावच्या शिवसैनिकांची मन्नत

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळताच जळगावचे शिवसैनिक फरीद खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी
ख्वाजा मीया बाबांच्या दर्ग्यावर 11 किलो न्याज व 50 बांधवांना अजमेर येथील प्रसिद्ध बाबांच्या दर्ग्यावर स्वखर्चाने घेऊन जाण्याची मन्नत मागितली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका व मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती समोर आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील  शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याने जळगाव शहारतील गणेश कॉलनी परिसरातील ख्वाज्या मिया दर्ग्यावर न्याज वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात होता कार्यक्रमाची सूर्वात दर्गेवर फुलांची चादर  शिवसेनेचे उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, फरीद खान, फिरोज पिंजारी, जाकिर पठाण, यांच्या हस्ते करण्यात आले असून 21 नोव्हेंबर रोजी शिवसैनिक फरीद खान हे 50 शिवसैनिकांना अजमेर येथे घेऊन जाणार आहेत.