Friday, 18 April 2025

*दाऊदी बोहरा समाजाच्या सय्यदना यांना वक्फ बचाव समितीच नाराजी चेे निवेदन*

गुरुवारी  दाऊदी बोहरा समाजाच्या एका शिष्टमंडळाने दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भारतात वक्फ कायदा मध्ये सुधारणा करून तो मंजूर केल्याबाबत त्यांचे आभार व्यक्त करण्यास आले असल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. सदरचे वृत्त वाचून मुस्लिम समुदायाने त्या वृत्ता बद्दल नाराजी व्यक्त केली.
*वक्फ बचाव समिती चे निवेदन*

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड च्या मार्गदर्शना प्रमाणे कार्यरत
वक्फ बचाव समिती जळगाव तर्फे दाऊदी बोहरा समाजाचे सय्यदना मुफ्फादल सैफुद्दीन बद्री महाल, फोर्ट ,मुंबई यांना जळगाव जिल्हा बोहरी समाजा चे सचिव हातीम इंजिनिअर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनात मुस्लिम समाजाने व्यक्त केलेली खंत तसेच वक्फ म्हणजे काय ? याचा अर्थ विशद केलेला आहे. 

 बोहरा समाजाने ज्याप्रकारे  वक्फ चा गैर अर्थ काढून तो समाजापुढे आणला त्याबाबत त्याचा निषेध करण्यात आला.
 तसेच  वक्फ कायदा हा कसा असंविधानिक असून , वक्फ बाय यूजर व लिमिटेशन ऍक्ट च्या विरोधात असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात लोकसभा, राज्यसभा मध्ये खासदारांनी विरोध नोंदविला तर जेपीसी मध्ये सुद्धा त्याला विरोध दर्शवण्यात आला एवढेच नव्हे तर भारतभरातून सुमारे एक करोड लोकांनी त्याला लेखी स्वरूपात विरोध दर्शविला  असला तरी
  कायद्याचे समर्थन बोहरा समाजाने केल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे.

*असविधानिक असल्याने न्यायालयाने घेतली दखल*
सदर कायदा असंविधानिक असल्याने सुप्रीम कोर्टाने दखल घेऊन तात्पुरते स्थगिती दिली असल्याचे दाऊदी बोहरा समाजाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे 
*हातिम इंजिनियर चे आश्वासन*

जळगाव जिल्हा बोहरा समाजाचे सचिव हातिम इंजिनियर यांना वक्फ बचाव समितीच्या शिष्टमंडळाने त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेऊन आपला तीव्र भावना विशद करून सदर भावना या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या नव्हे तर इतर समाजाच्या सुद्धा असल्याने त्याची कल्पना आपण आपले धर्मगुरू सय्यदना यांना द्यावी अशी विनंती केली असता हातिम इंजिनियर यांनी शिष्टमंडळाच्या भावनांची कदर करून हे निवेदन त्वरित सय्यदना यांना पाठवण्यात येईल व  आपल्या तीव्र भावनांची दखल घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

 *शिष्टमंडळात यांचा होता समावेश* 

 मुफ्ती खालीद, मुफ्ती रमीज, मौलाना कासिम नदवी, हाफिज रहीम पटेल, सय्यद चांद, फारुक शेख, मजहर पठाण, कासिम उमर ,अब्दुल रऊफ टेलर, मुजाहिद खान व अखिल शेख आदींची उपस्थिती होती.
 
फोटो कॅप्शन 
दाऊदी बोहरा समाजाचे सेक्रेटरी हातिम इंजिनियर यांना  वक्फ बचाव समितीतर्फे निवेदन देताना मुफ्ती खालीद,  मुफ्ती रमीज, हाफिज रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, फारुख शेख, मजहर पठाण आदी दिसत आहे।
फोटो
 
१) हातिम इंजिनियर यांच्याशी शिष्टमंडळ चर्चा करताना
२) हातिम इंजीनियर याना निवेदन देताना मुफ्ती खालिद, मुफ्ती रमीज, फारूक शेख, हाफिज रहीम, आदि दोस्त आहे।

Tuesday, 15 April 2025

*एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी*-अयाज द इंडियन.


*जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी राज्य पॅनलमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये होणाऱ्या स्कोअरर्सच्या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पॅनलमध्ये स्थान मिळणार आहे.  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना २५ एप्रिल २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीची लिंक व अधिक माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाईटवर व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेचा अचूक दिनांक, स्वरूप आणि पुढील प्रक्रियेची माहिती उमेदवारांना देण्यात येणार आहे.  जळगाव जिल्ह्यातील  होतकरू स्कोअरर्स यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. सहव्यस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले आहे. त्यासाठी अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५) व मोहम्मद फजल (७८७५४६६३०३२) यांच्याशी संपर्क साधावा.

या उपक्रमामागील उद्देश राज्यातील प्रत्येक भागातील, ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रतिभावान स्कोअरर्सना व्यासपीठ उपलब्ध करून देणे असा आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व सर्व अपेक्स कौन्सिल मेंबर्स यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या उपक्रमाबाबत बोलताना अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, "ज्यांना क्रिकेट या खेळाविषयी आवड आहे व बारकावे लक्षात ठेवण्याची क्षमता आहे, त्यांच्यासाठी क्रिकेट स्कोअरर म्हणून करिअर करणे हे अत्यंत उपयुक्त आणि समाधानकारक ठरू शकते. याद्वारे विविध स्तरांवर क्रिकेटशी जोडले जाऊन काम करण्याची संधी स्कोअरर्सना मिळू शकते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील प्रतिभावान युवकांना स्वतःची क्षमता दाखविण्याचे व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. "  एमसीए तर्फे या उपक्रमाचे समन्वयक कुमार ठक्कर (7249877417) हे असतील. 

ज्यांनी मागील वर्षी परीक्षा दिली नव्हती, फक्त त्या नवीन अर्जदारांसाठीच ही लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ज्यांनी मागील वर्षी ही परीक्षा दिली आहे, त्यांची केवळ प्रायोगिक परीक्षा घेतली जाईल. प्रायोगिक परीक्षेची वेळ आणि स्थळ लवकरच कळविण्यात येईल.  असे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे सचिव कमलेश पिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.