Sunday, 25 January 2026

इकरा महाविद्यालय _77 व्या प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण संपन्न*

*77 व्या प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण निमित्त कार्यक्रम आयोजन*
         दिनांक 26/01/2026 रोजी  77 व्या प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते ध्वजारोहण इकरा एज्युकेश्नल कॉम्प्लेक्स, शिरसोली रोड येथे करण्यात आले. या वेळी त्यांनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना 77 व्या प्रजासत्ताकदिनाचे शुभेच्छा दिल्या. या मध्ये इकरा युनानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस,  उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, इकरा बी.एड. कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर इरफान शेख, इकरा डिएड कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर सईदा वकील, इकरा पब्लिक स्कुलचे मुख्यध्यापक शकिल शेख,   तसेच सर्व महाविद्यालयाचे शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी , हॉस्पिटल स्टाफ़, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. या निमित्त सोसायटीचे अध्यक्ष यांनी प्रजा सत्ताकदिनाचे महत्व व त्याची कार्य पद्धती आपल्या देशात कशा प्रकारे करण्यात येते व त्याची अमलबजावणी या बाबत आपले मनोगत व्यक्त केले. आणि साक्षरता शपथ सर्व विद्यार्थी, विद्यार्तीनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देण्यात आली.

Wednesday, 14 January 2026

प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार - ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांचा इशारा

*प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार - ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांचा इशारा*

जळगाव: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी, प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व बोगस आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

*नेमके प्रकरण काय?*
नुकतीच निवडणूक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे समोर आले होते. या यादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळा असणे, प्रभागात राहत नसतानाही नावे नोंदवणे आणि संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी करणे असे प्रकार उघडकीस आले होते.

ॲड. पियूष पाटील यांचा आक्रमक पवित्रा
या संदर्भात बोलताना ॲड. पियूष पाटील यांनी थेट आरोप केला आहे की, निवडणूक जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक बोगस मतदारांची मोठी फौज उभी केली गेली आहे. त्यांनी म्हटले की:
> "एकाच मतदाराचे नाव वेगवेगळ्या प्रभागात असणे किंवा एकाच पत्त्यावर अनेक अनोळखी व्यक्तींची नावे असणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. आम्ही या सर्व नावांची सखोल पडताळणी केली असून, पुराव्यांसह प्रशासनाकडे तक्रार दिली आहे. जे लोक बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील."

*प्रशासनाकडे तक्रार दाखल*
प्रभाग क्रमांक ५ मधील या बोगस मतदार प्रकरणाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. यामध्ये खालील 

*मागण्या करण्यात आल्या आहेत:*
 * दुबार नावांची तात्काळ छाटणी करावी.
 * संशयास्पद मतदार नोंदणीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी.
 * बोगसगिरी करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करावेत.

Sunday, 28 December 2025

हेतल पाटिल यांचे 6 मध्ये तगड़े आवाहन...

जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महायुती-महाआघाडीने प्रत्येक प्रभागात विजयी चेहरा देणे आवश्यक झाले आहे.

 अशात प्रभाग क्रमांक ६ मध्ये हेतल महेंद्र पाटील यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

अनेक इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया संपली असली तरी अंतिम यादी जाहीर व्हायची आहे.

 मात्र, हेतल पाटील यांची उमेदवारी नक्कीच विजयाची हमी ठरेल, असा मतदार व कार्यकर्त्यांचा कौल आहे.


स्थानिक आणि उच्चशिक्षित महिला नेतृत्व

B.E. आणि MSW पदवीधारक असलेल्या हेतल पाटील या समस्यांवर प्रत्यक्ष उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

● दिव्यांग, महिलांचे प्रश्न

● आरोग्य सेवा उपक्रम

● गरजू नागरिकांसाठी तत्पर मदत

त्यांचे वडील महेंद्र पाटील व संपूर्ण कुटुंब सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असून लेवा पाटील समाजातील त्यांचा प्रभाव निर्णायक आहे.


पत्रकार पतीची जनसंपर्कातील मजबुती

हेतल पाटील यांचे पती चेतन रविंद्र वाणी हे 15 वर्षांपासून क्राईम रिपोर्टिंगमध्ये कार्यरत.

शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन व समाजघटकांमध्ये त्यांचा मजबूत संपर्क असून याचा थेट फायदा रणनितीत मिळणार आहे.


प्रभाग ६ मधील जनतेचा स्पष्ट संदेश

छत्रपती शाहू नगर, दत्त कॉलनी हा हेतल पाटील यांचा मूळ परिसर. टागोर नगर, दंगलग्रस्त कॉलनी येथे महिलांचा मोठा विश्वास त्यांच्या बाजूने उभा आहे.

मतदारांची मागणीही स्पष्ट —

➡️ बाहेरून लादलेला नव्हे…

➡️ स्थानिक आणि कामातून सिद्ध झालेली महिला हवी!

ही अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद केवळ हेतल पाटील यांच्यात दिसते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेतल पाटिल यांचे 6 मध्ये तगड़े आवाहन...

जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महायुती-महाआघाडीने प्रत्येक प्रभागात विजयी चेहरा देणे आवश्यक झाले आहे.

 अशात प्रभाग क्रमांक ६ मध्ये हेतल महेंद्र पाटील यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

अनेक इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया संपली असली तरी अंतिम यादी जाहीर व्हायची आहे.

 मात्र, हेतल पाटील यांची उमेदवारी नक्कीच विजयाची हमी ठरेल, असा मतदार व कार्यकर्त्यांचा कौल आहे.


स्थानिक आणि उच्चशिक्षित महिला नेतृत्व

B.E. आणि MSW पदवीधारक असलेल्या हेतल पाटील या समस्यांवर प्रत्यक्ष उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

● दिव्यांग, महिलांचे प्रश्न

● आरोग्य सेवा उपक्रम

● गरजू नागरिकांसाठी तत्पर मदत

त्यांचे वडील महेंद्र पाटील व संपूर्ण कुटुंब सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असून लेवा पाटील समाजातील त्यांचा प्रभाव निर्णायक आहे.


पत्रकार पतीची जनसंपर्कातील मजबुती

हेतल पाटील यांचे पती चेतन रविंद्र वाणी हे 15 वर्षांपासून क्राईम रिपोर्टिंगमध्ये कार्यरत.

शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन व समाजघटकांमध्ये त्यांचा मजबूत संपर्क असून याचा थेट फायदा रणनितीत मिळणार आहे.


प्रभाग ६ मधील जनतेचा स्पष्ट संदेश

छत्रपती शाहू नगर, दत्त कॉलनी हा हेतल पाटील यांचा मूळ परिसर. टागोर नगर, दंगलग्रस्त कॉलनी येथे महिलांचा मोठा विश्वास त्यांच्या बाजूने उभा आहे.

मतदारांची मागणीही स्पष्ट —

➡️ बाहेरून लादलेला नव्हे…

➡️ स्थानिक आणि कामातून सिद्ध झालेली महिला हवी!

ही अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद केवळ हेतल पाटील यांच्यात दिसते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Monday, 15 December 2025

पोलिस ने पकडा कालिया बंदर


दि.१३/१२/२०२५ रोजी फियांदी शरीफ मुराद खाटिक, रा. सुप्रिम कॉलनी जळगांव हे चाळीसगांव येथे लग्न समारंभाकरीता गेले असता त्यांचे राहते घराचे कडी कोंडा तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ४९६००/- रु. चा मुद्देमाल चोरुन नेल्या बाबत तक्रार दिल्याने एमआयडीसी पो. स्टे येथे अज्ञात इसमाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची घरफोडी ही अभिलेखावरील गुन्हेगार १) शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर रा. कासमवाडी जळगांव २) साहिल शहा सदाम शहा ऊर्फ काल्या रा. तांबापुरा जळगांव यांनी केली असल्याबाबतची माहिती मा. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना मिळाली होती, त्याप्रमाणे कासमावडी परिसरातून नमुद आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. म्हणून नमुद आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी एमआयडीसी पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. चे पोहेकों/किरण चौधरी हे करीत आहेत, नमुद दोन्ही आरोपी मजकुर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा, श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, मा. श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, तसेच पोउपनि, शरद बागल, सफी/अतुल बंजारी, पोहेकों/अक्रम शेख, विजय पाटील, पोना/किशोर पाटील, पोकों/राहुल रगडे, रविंद्र कापडण, गोपाल पाटील सर्व स्थागुशा जळगांव यांनी केली आहे.

Saturday, 29 November 2025

*वरणगाव येथे या मंगळवारी आठवडे बाजार नाही.जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी* *आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी*

*वरणगाव येथे या मंगळवारी  आठवडे बाजार नाही.जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी* 
*आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी* 


*जळगाव, दि. 28 नोव्हेंबर (इंडिया 365 न्यूज) :–* नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला असून आदर्श आचारसंहिताही त्याच दिवसापासून लागू आहे. निवडणुकीचे मतदान मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत मंगळवार व बुधवार या दिवशी अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने मतदान व मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नये म्हणुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अँण्ड फेअर्स अॅक्ट 1862 च्या कलम 5 (अ) व (क) मधील अधिकारांचा वापर करून महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. 

त्यानुसार 02 डिसेंबर 2025 (मतदानाचा दिवस) आणि 03 डिसेंबर 2025 (मतमोजणीचा दिवस) या दोन्ही दिवशी जळगाव जिल्ह्यातील नगर पालिका हद्दींमध्ये भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यात येतील.तसेच नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Tuesday, 18 November 2025

*जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भाजपा ची बिनविरोध बोहनी*

*जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात कमळ फुलण्यास सुरुवात...*

नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या पत्नी सौ.उज्वला दीपक तायडे यांची प्रभाग क्रमांक ११ ब मधून बिनविरोध निवड झाली.


जामनेर नगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचा प्रभाव असलेल्या प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ.उज्वला दीपक तायडे यांचा विरोधातील उमेदवार यांचा अर्ज छाननी मध्ये फॉर्म बाद करण्यात आला. त्यामुळे उज्वला दीपक तायडे ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ह्या निवडीमुळे जामनेर शहरात भाजपाचे कमळ फुलण्यास सुरुवात झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीचे ना . गिरीषभाऊ महाजन, नगराध्यक्ष साधना ताई महाजन, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व भाजप पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.