*हा सूर्य हा जयद्रथ..*
*डॉ. उल्हास पाटिल यांचा त्वरित प्रतिसाद व पाठपुरावा...*
*गोदावरी मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलबद्दल मिळालेली माहिती निघाली चुकीची...*
*पत्रकारितेत आला विचित्र अनुभव,मात्र अनुभवानेच वाचवली संभाव्य चूकीची बातमी..*
कदाचित, प्रत्येक वेळेस डॉक्टर आणि रुग्णालयच चुकीचे असेल अशे नाही....
न घडलेली बातमी-
(✒️अयाज मोहसिन,रिपोर्टर 'न्यूज24' चॅनल)
----------------------------
आज दुपारी एका नॉनकोविड रुग्णा संदर्भात फोन आला की ,एक रुग्ण काल पासून गोदावरी फौंउडेशन संचलित 'डॉ.उल्हास पाटिल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल'मध्ये मृत झालेला आहे मात्र रुग्णाची परिस्थिती हलाखीची असल्याने 60,000 रु बिल भरण्याची क्षमता त्याच्या कुटुंबियांकडे नाही,पैसे नसल्याने रुग्णालय व्यवस्थापन पेशन्ट चे पार्थिव देण्यास टाळाटाळ करित आहे.
खरं बघितलं तर कोविड च्या या महासंकट काळात ही मोठी ब्रेकिंग न्यूज ठरली असती मात्र पत्रकारिता नितीमूल्या नुसार माहिती ची शहानिशा करणे अत्यावश्यक होते.यासंदर्भात माहिती घेण्यासाठी डॉ उल्हास पाटिल यांना कॉल लावला.डॉक्टरांनी सांगितले की लगेच फॉलोअप घेऊन कॉल बॅक करतो.थोड्या वेळात जनसंपर्क अधिकारी राहुल कुळकर्णी यांचा सुध्दा फोन आला की 2 मिनिटात सर्व माहिती देतो.त्यानुसार डॉ उल्हास पाटिल यांचा फोन आला,त्यांनी स्वतः संबंधित रुग्णाबद्दल,त्या वार्डात कार्यरत असलेले डॉक्टर यांच्याशी चर्चा केली असता धक्कादायक माहिती मिळाली की सदर रुग्ण हा जिवंत असून,तो कालच मेला ही माहिती पुर्णतः चुकीची आहे,शिवाय रुग्ण गंभीर जरी असला तरी त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत याची कल्पना नातेवाईकाना वेळोवेळी दिली जात आहे.तुम्ही स्वतः रुग्णालयात येऊन शहानिशा करू शकता...
हे ऐकून मी चकित झालो, कारण जी माहिती मला मिळाली होती ती अगदीच उलट होती.कदाचित बातमी 'ब्रेक' करण्याच्या उत्साहात न्यूज लावली गेली असती तर चुकीचा संदेश गेला असता,मात्र अनुभव अशावेळी कामी आला की थोडा वेळ उशीर झाला तरी चालेल मात्र शहानिशा न करता चुकीची बातमी लागायला नको.शिवाय डॉ उल्हास पाटिल यांनी त्वरित दखल घेत,लगेच प्रतिसाद दिल्याने गैरसमज दूर झाला.. *हा सूर्य,हा जयद्रथ*.
यानिमित्ताने पुन्हा एकदा पत्रकारितेच्या त्या गुरुवर्यांचे स्मरण झाले ज्यांनी पत्रकारिता शिक्षणा दरम्यानच हे शिकविले होते की कुठलीही बातमी ही एकांगी न लावता योग्य ती परिपूर्ण माहिती घेऊन तसेच नैसर्गिक न्याय हक्काने दुसऱ्या बाजूला सुध्दा खुलासा सादर करण्याची पुरेपूर संधी द्यावी,हे बाळकडू पुन्हा अनुभवास आले..
कदाचित, प्रत्येक वेळेस डॉक्टर आणि रुग्णालयच चुकीचे असेल अशे नाही....

No comments:
Post a Comment