Saturday, 2 July 2022

"वाह ताज" -अभूतपूर्व प्रचंड बंदोबस्त आणि मर्सिडीज बस मधे बंडखोर राज्यात परतले,वाह "ताज"...

मुंबई-(अयाज़ मोहसिन,इंडिया365)

मागे पुढे शेखडो पोलिस वाहन,विशेष केंद्रीय सुरक्षा आणि केंद्रीय राखीव दल असा अभूतपूर्व तगड़ा बंदोबस्त ,विमानतळ ते पंचतारांकित हॉटेल ताजप्रेसिडेंट पर्यंत 'ग्रिन कॉरिडोर' निर्माण केलेला,आजु बाजू मागे पुढे रक्षक वाहनाचा ताफा आणि ठिक केन्द्रस्थानी मुख्यमंत्री आणि 50 बंडखोर मर्सिडीज बस मधे विराजमान...


वरली सी लिंक वरिल सर्व वाहतूक थांबविली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक करिता तब्बल 11 दिवसानंतर बंड यशस्वी केलेले बंडखोर मुम्बई परतले...


बंडखोर वर्तुळ पूर्ण-मुम्बई-सूरत-गुवाहाटी-गोवा-मुम्बई

Wednesday, 29 June 2022

बिग ब्रेकींग-मुख्यमंत्र्यांचा राजिनामा

मा.सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी चे निर्णय दिल्यानंतर फेसबूक लाईव करत अखेर आपला राजिनामा घोषित केला आहे.या वेळी मात्र काहिसे तणावमुक्त दिसत होते.

राज्यपाल यांचे आभार व्यक्त केले.

अशोक चव्हाण यानी बाहेरुन पाठिंबा देण्याची ऑफर केली.

नामांतर करुन हिन्दुत्व सिध्द केले.

आता ही समोर येउन नाराजी व्यक्त करा...

चिन बोर्डर चे सरक्षण मुंबईत लावणार का?

नविन लोकशाही चा पाळणा जल्लोशात हौऊ द्या...

लोकशाही मधे डोकी मोजतत..

भावनिक वक्तव्य-- बाळासाहेब यांच्या पुत्राला खाली खेचण्याची पुण्य लाभू द्या...

वर्षा निवास सोडले,आता राजिनामा

गुलाबरावांचे संजय राऊत याना खुले आव्हान..

*गुलाबराव पाटिल यांचे संजय राउत यांना खुले आव्हान..*

*जळगाव येथील 47 डिग्री तापमानात काम करून दाखवा...*

शेर शायरी मधून टोलेबाजी..
*लोग टूट जाते है एक घर बनाने में,तुम तरस नही खाते बस्तिया जलाने में...*

*वर्षा बंगला सोडला,पवार यांना नाही सोडले...*

*संजय राउत यानां माहित नाही चुना कसा लावतात...योग्य वेळी दाखवून देउ..*

*शिंदे साहेबाना लढाई जिंकन्याच्या शुभेच्छा--गुलाबराव पाटिल.*


गुलाबराव यांचा विरोधकाना प्रश्न *"इतना सन्नाटा क्यों है भाई?*

Sunday, 26 June 2022

'सेवांकुर भारत' ची सेवा जळगाव येथे प्रारंभ

*'सेवांकुर भारत' जळगाव* शहराचा पहिला कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न... !! 

*'एक सप्ताह देश के नाम २०२२'* या कार्यक्रमाचा जळगाव शहर अनुभव कथनाचा कार्यक्रम आज दिनांक २६ जून २०२२ रोजी बाबा हरदास समाज मंदिर येथे पार पडला. 

कार्यक्रमाची सुरुवात *'सेवेयंब यज्ञदल्ली'* ह्या गीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उमेश जाधव यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा हस्ते दीपप्रज्वलन व भारत माता पूजन झाले. सेवांकुर जळगावच्या प्रतिनिधींनी मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत केले. 

डॉ. विशाल ढाकरे सरांनी सेवांकुरची सुरुवात कशी झाली ते OWFN चे नियोजन याबद्दल माहिती सांगितली. 

त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथनाला सुरुवात झाली. GMC जळगावचे विशाल प्रजापती, गायत्री उगाले व प्रणव जाजू तसेच DUPMC जळगावचे वरुणराज ननावरे, वरूण जोशी आणि गुंजन जैन यांनी अनुभव कथन सादर केले. 

DUPMC च्या चाहूल मानकर या विद्यार्थिनीने आपल्या सुमधुर आवाजात वैयक्तिक गीत सादर केले. 

त्यानंतर डॉ. विलास भोळे (Senior Gynecologist), डॉ. लीना पाटील (Intensivist), श्री. रत्नाकर जी पाटील (केशवसृष्टी प्रतिष्ठान सचिव) या प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

डॉ. नितीन गादेवाड सरांनी कार्यक्रमाचा समारोप केला. 

डॉ शुभम भोलाने यांनी आभार मानले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन GMC जळगाव चे विद्यार्थी श्रेया घाग आणि प्रद्युमन होगे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट कृष्णाई सोळंके ने शांती मंत्र सांगून केला. 

कार्यक्रमाला आलेल्या नवीन विद्यार्थ्यांनी सेवांकुर भारत सोबत जोडण्याबद्दल उत्साह दाखवला. त्यांना वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आले.

सर्वांनी शेवटी जेवांकुरचा आस्वाद घेतला.

आजच्या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर मंडळींनी सुध्दा हजेरी लावली त्यात डॉ. सुनील नहाटा (Senior Orthopaedic Surgeon), डॉ. सचिन इंगळे (Onco Surgeon), डॉ. श्री व सौ जहागीरदार, डॉ. सुनील सुर्यवंशी (MD Medicine) डॉ. सौ बंगाळे मॅडम (MD Medicine) तसेच डॉ. क्षितिज गर्गे (रा स्व संघ शहर बौद्धिक प्रमुख), श्री. विजय ठाकरे (रा स्व संघ शहर कार्यवाह), श्री. राजेन्द्र ननावरे, श्री सुनील जी यादनिक हे  उपस्थित होते.

उपक्रम प्रमुख - शिवराज मुसळे, अविरत पांडव आणि टीम

बौद्धिक प्रमुख - अर्चना पंजाबी आणि टीम

संपर्क प्रमुख - वरूणराज ननावरे आणि टीम.

कार्यक्रम प्रमुख - हरीष कुटे 
कार्यक्रम सहप्रमुख - हर्षल लांडगे

Friday, 20 May 2022

चांदोरकर प्रतिष्ठाण पुण्यात सन्मानित..

स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

(इंडिया365)

मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या प्रतिथयश संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासम्मेलन -२०२२ च्या आयोजनानिमित्तने *राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक संस्था सेवारत्न पुरस्कार - २०२२* ह्या पुरस्काराने प्रतिष्ठानास गौरविण्यात आले.  
हा पुरस्कार समारंभ पुणे येथे श्री उद्यान कार्यालय, सदाशिव पेठ येथे नुकताच संपन्न झाला. सन्मानचिन्ह, मानपत्र, गौरवपदक, महावस्त्र, मानाचा फेटा व मानाचा बॅच असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा मानाचा पुरस्कार राज्यस्तरीय असून त्यासाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाची निवड होणे हि जळगाव सह खान्देशा साठी अभिमानाची गोष्ट आहे. 
ह्या पुरस्काराचे वितरण श्री. प्रकाश सावंत (महापरिषद समन्वयक) सौ. मनीषा कदम (पुरस्कार समारंभाध्यक्षा) अमोल सुपेकर (अध्यक्ष) एल.एस.दाते (कार्याध्यक्ष, पुरस्कार समिती) यांच्या उपस्थितीत व सुप्रसिद्ध कीर्तनकार व तत्वचिंतक ह.भ.प. श्यामसुंदर आळंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार कार्यकारी समिती सदस्य श्री. निनाद चांदोरकर यांनी स्वीकारला.

Saturday, 16 April 2022

जैन इरिगेशन ची विक्रमी पारितोषिके

*जैन इरिगेशनला निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्लेक्स कौन्सिलची तेरा पारितोषिके*
*ड्रीप इरिगेशन, पाईप्स, पीव्हीसी फोमशीट व  क्षेत्रातल्या निर्यात कार्याबाबत झाला गौरव*

*मुंबई दि. 16 (प्रतिनिधी)* - जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध 13 गटातून प्लेक्स कौन्सिलचे प्रथम क्रमांकाचे निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुंबईच्या कफ परेड येथील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे प्लेक्स कौन्सिलचे  2017-18, 2018-19, 2019-20 व 2020-21 अशा चार आर्थिक वर्षातील 12 प्रथम पुरस्कार व एक द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीच्या ड्रीप इरिगेशन विभागाच्या उत्तुंग कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार स्वीकारला. त्याचप्रमाणे कंपनीच्यावतीने त्या-त्या विभागासाठीचे पुरस्कारदेखील कंपनीच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते, प्लेक्स कौन्सिलचे  चेअरमन अरविंद गोयंका, व्हाईस चेअरमन हेमंत मिनोचा, कार्यकारी संचालक श्रीभाष दासमोहपात्रा, रविश कामत, मुंबई विभाग आयकर आयुक्त आलोककुमार या मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारोह पार पडला.

कृषी व कृषी उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक किर्तीची अग्रणी कंपनी जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखत 2017-21 या वर्षासाठी ठिबक सिंचन (एमआयएस), पीव्हीसी फोम शीट, पाईप्स अॅण्ड होजेस विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली. 2019-20 या वर्षासाठी पाईप्स अॅण्ड होज फिटींगया विभागाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिले गेले. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील कंपनीने उत्पादन व निर्यातीत वर्चस्व कायम ठेवत सर्वोत्तम कामगिरी केली हे या पुरस्कारासासाठी अधोरेखित झाले. कंपनीच्या वतीने चारही वर्षांच्या या एकूण 13 पुरस्कारांचा स्वीकार सहकाऱ्यांनी केला. त्यामध्ये पी. सेनगोट्टीयन, मनिष झेंडे, अजय काळे, संदीप जैन, प्रसाद दुर्गे, विजयसिंग पाटील, प्रवीण कुमट, नितीन चौधरी, संदीप पाटील, राजेंद्र लोढा, महेश इंगळे, प्रशांत जयस्वाल आणि भरत बडगुजर या सहकाऱ्यांचा समावेश आहे.

प्लेक्स कौन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाद्वारे 1955 मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. चा प्लास्टीक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल प्लेक्स कौन्सिलतर्फे 1991 पासून दरवर्षी सन्मान होत आला आहे.
*(चौकट – मा. अशोकभाऊ जैन यांची प्रतिक्रिया)*
कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कै. भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक होय, ते म्हणत असत की, "गुणवत्तेच्या जोरावरच आपण स्पर्धेला पात्र ठरू शकतो; किंबहुना स्पर्धकांना मागे टाकू शकतो. तसेच चोखंदळ ग्राहक व बाजारपेठ आपणास जागतिक कीर्ती मिळवून देऊन अग्रस्थानी बसवू शकते.” उत्तम, उदात्त, गुणवत्तेचा ध्यास घेत भविष्यात अनेक दर्जेदार वस्तु, शेतीत प्लास्टिकल्चर कशा वापरता येईल याकडे लक्ष दिले. जैन इरिगेशनला 1991 पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यांच्या कष्टाचा, समर्पण भावनेचा हा सन्मान आहे असे मी मानतो."
-    *अशोक जैन*
*अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव*

*फोटो कॅप्शन*   जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन कंपनीच्या ड्रीप इरिगेशन विभागासाठी वर्ष 2020-21 चा पुरस्कार केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते स्वीकारताना शेजारच्या छायाचित्रात प्लेक्स कौन्सिलच्या विविध पुरस्कारांसह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांच्यासमवेत कंपनीचे सहकारी पी. सेनगोट्टीयन, मनिष झेंडे, अजय काळे, संदीप जैन, प्रसाद दुर्गे, विजयसिंग पाटील, प्रवीण कुमट, नितीन चौधरी, संदीप पाटील, राजेंद्र लोढा, महेश इंगळे, प्रशांत जयस्वाल आणि भरत बडगुजर

Saturday, 9 April 2022

जैन्स च्या शिरपेचात मोठा तुरा

*महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव*
*राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला पुरस्कार*
*नाशिक (ता.9) प्रतिनिधी –* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखेतर्फे सुवर्ण वर्ष महोत्सवानिमित्त दोन दिवसांची विकास परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये कान्हदेशच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा गौरव करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार समारंभ नाशिक येथील कालीदास कलामंदिर येथे पार पडला.
याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ,  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सुधाकर देशमुख उपस्थित  होते.
या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार देवयानी फरांदे , महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. व नाशिक जिल्हाचे पोलीस अधिक्षक व अनेक मान्यवर उपस्थित होते .
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या दोन दिवसीय विकास परिषदेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य व कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे,   वेगवेगळ्या सत्रांमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेसाठी राज्यभरातील 120 पदाधिकारी सहभागी झाले होते. विकासात महिलांचा सहभाग वाढविणारे धोरण, औद्योगिक विकासात नव्या तंत्रज्ञानाचा सहभाग, पर्यटन आणि क्लस्टर बेस डेव्हलपमेंटचे धोरण यावर विचार मंथन करण्यात आले.  
जैन इरिगेशन सिस्टीम लि. यांच्यासह महिंद्रा एण्ड महिंद्रा, एचएएल, सह्याद्री फार्म, बेदमुथा इंडस्ट्री, नाशिक, दादासाहेब रावल ग्रुप ऑफ इंडस्ट्री, शिरपूर एज्यकेशन सोसायटी, महाराष्ट्र सलवंत एक्सट्रेक्शन- धुळे, मालपाणी ग्रुप-संगमनेर नगर, यांचाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते गौरव यावेळी करण्यात आला.

*फोटो कॕप्शन* - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार स्वीकारताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन सोबत पालकमंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र चेंबर आॕफ काॕमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सुधाकर देशमुख.