Monday, 30 January 2023

आणखी किती कोमल,कठोर पाउल उचलणार...?

हृदयद्रावक घटना...

आई ! माझ्या निलला न्याय देजो.. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

जळगावातील विवाहितेची नाशिकला सासरी आत्महत्या, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव, दि.३० - जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.२७ रोजी घडली. दरम्यान, विष प्राशन केल्यावर विवाहितेने घरी आईला फोनवरून 'आई आई माझ्या निलला न्याय दे जो' अशी आर्त हाक घातली. पिढीजात संपत्तीत हिस्सा न देण्यासाठी तिचा छळ केल्याचे समोर आले असून पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या कोमल सुरेश देवरे या तरुणीचा २१ मार्च २०१६ रोजी नाशिक येथील अभिजीत राजेंद्र बेलगावकर यांच्यासोबत विवाह झाला होता. जुनी महानगरपालिका, मेन रोड येथे सर्व कुटुंबीय एकत्र राहत होते. पावसाळ्यात घर गळत असल्याने सर्व कुटुंबीय हिरावाडी येथे राहावयास गेले. दोघांच्या संसारावर निलराज हा मुलगा देखील झाला. काही दिवसांनी कोमलची सासू किरकोळ कारणावरून कोमल आणि तिची देरानी मीनाक्षी यांच्याशी वाद घालत असल्याने दोघे वेगवेगळ्या ठिकाणी रहावयास गेले.

गेल्या सहा महिन्यापासून कोमल ही पती अभिजीत आणि मुलगा निलराज असे तिघे चिंतामणी नगर, पंचवटी येथे भाड्याच्या घरात राहावयास आले होते. कोमलने स्वतःचे ब्युटीपार्लर सुरू करून सर्व संसारोपयोगी साहित्य देखील खरेदी केले. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कोमलची आई मंगलाबाई देवरे या थायरॉईडच्या उपचारासाठी नाशिक येथे गेल्या होत्या. कोमलची देरानी मिनाक्षीचे पतीसोबत वाद झाल्याने ती माहेरी गेल्याचे तिने आईला सांगितले. १ जानेवारी २०२३ रोजी कोमलची आई घरी परतली. काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी जुन्या घराची दुरुस्ती केली असून ते सर्व तिकडे राहायला जात असल्याचे तिला जेठाणी मेघाने सांगितले. कोमलने देखील पती अभिजीत यांना आपण तिकडे राहायला जाऊ असे सांगितले असता, मला तिकडे राहायचं नाही, मला ते घर पण नको असे ते बोलले. 

कोमल स्वतः सासू भारती यांच्याकडे गेली आणि आम्हाला देखील घरात राहू देण्याची विनंती केली असता सासूने नकार दिला. सासूने नकार दिला असता जुन्या संपत्तीमध्ये मुलगा निलराज याचे देखील नाव घावे असे कोमल सासूला बोलली असता त्यांनी देखील वाद घातले. सर्व प्रकार कोमलने मामसासरे ईश्वर चौधरी यांना कळविला. त्यांनी कोमलच्या सासरच्या मंडळींना याबाबत विचारणा केल्याने सर्वांना कोमलचा राग आला. त्यांनी कोमलचा छळ सुरू केला. पती अभिजीतने देखील तू प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असशील तर मी तुला घटस्फोट देऊन माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी दिली. तसेच कोमलच्या चारित्र्यावर संशय घेत तिला त्रास देणे सुरू केले. घडत असलेला सर्व प्रकार कोमलने आई मंगलाबाई व भाऊ कमलेश देवरे याला कळविला होता.

कोमल ताणतणावात असल्याने तिला माहेरच्या मंडळींनी समजावले होते. अभिजीतने कमलेशला घरातील वादविवाद वाढत असल्याने नाशिक येथे भेटण्यासाठी बोलाविले असता कामात असल्याने ३० जानेवारीनंतर आम्ही नाशिक येथे येतो असे सांगितले होते. दि.२७ रोजी सकाळी १०.३० वाजता कोमलने आईला फोन करून सांगितले की, माझी सासू, जेठ, जेठाणी, दिर हे मला धमकावत असून तुमची मिटिंग होऊ देणार नाही असे सांगत आहे. तुला तुझा हक्क मिळू देणार नाही असे म्हणत असून नवरा साथ देत नाही. मला काही न्याय मिळणार नाही, असे बोलून तिने फोन कट केला. कोमलच्या आईने त्यानंतर अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

११.३० वाजता एका अनोळखी क्रमांकावरून कोमलच्या आईला फोन आला. कोमलला उलट्या होत आहे असे एका अनोळखी महिलेने सांगताच कोमलने फोन घेतला आणि 'आई आई माझ्या निलला न्याय दे जो' असे बोलून फोन कट झाला. कोमलच्या आईने जावई अभिजीतला फोन केला असता मी त्र्यंबकला आहे. आई, दादा, वहिनी कोमलला पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळाने पुन्हा फोन केला असता कोमलला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून ती आयसीयूमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. कोमलची आई व वडिलांनी रेल्वेने रात्री नाशिक गाठले असता ९ वाजता डॉक्टरांनी तिने विषप्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

कोमलची आई मंगलाबाई सुरेश देवरे यांनी फिर्यादी दिल्यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात कोमलचा पती अभिजीत राजेंद्र बेलगावकर, सासू भारती, जेठ आकाश, जेठाणी मेघा, दिर अमित यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरनार करीत आहेत. मयत कोमल देवरे या जळगावातील पत्रकार कमलेश देवरे यांच्या भगिनी असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, मुलगा असा परिवार आहे.

Wednesday, 18 January 2023

सलिम इनामदार,राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मेहरून वॉर्ड क्रमांक 18 मध्ये रस्त्यांची मागणी.

*सलीम इनामदार यांची मागणी. मेहरून मास्टर कॉलनी वार्ड 18* चे त्वरित रस्त्यांचे काम नाही सुरु केल्यास अन्दोलन निवेदन, उपोषण करुंन लढा उभारवा लागेल*. मेहरून येथील( मास्टर कॉलनी, उमर मस्जिद रोड, रजा मस्जिद रोड़) अर्धवट सोडलेले काम मागील एक वर्षा पासुन अचानक काम बन्द क्ररुन मक्तेदारने काम बन्द केला। हां  रस्ता एका वर्षा मध्ये अर्धवट टुटलेला खड्डे पडलेले आहे। कोणीच आज पर्यन्त विचार्यला सुधा आलेला नाही। जलगॉव मनपा डोळे झाकुंन  बसलेला आहे। नागरिकांना कोणी , काय त्रास आहे कसे जीवन जगत आहे खुप वाइट अवस्था आहे। रोज चे लहान मोठे अपघात होत आहे, मोठा अपघात घडण्या ची शक्यता आहे। लवकरात लवकर अर्धवट सोडलेले रस्ते त्वरित बन्विन्यात यावे। अन्यथा नाइलाजे मनपा च्या विरोधात रस्त्यावर उतरून अंदोलंन करावा लागेल। सलीम इनामदार मीडिया प्रमुख राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी जालगॉव. सामाजिक कार्यकर्ते मेहरून वार्ड क्र १८ ज.

Thursday, 5 January 2023

राज्य ऑलिंपिक -नगरकर,सिद्दीकी आणि जयंत चौधरी यांची निवड...

*महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलावाचे खेळाडूंची निवड*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा 
2023 या दिनांक 1 ते 12 जानेवारी 2023 यादरम्यान संपन्न होणार आहे यात मॉडर्न पेटयथलॉन, वॉटर पोलो, ट्रायथलॉन स्पर्धा पुणे बालेवाडी येथे होणार आहे या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातर्फे पोलीस जलतरण तलावाचे खालील जलतरणपटू यांची निवड झालेली आहे
*वॉटर पोलो पुरुष संघ अमेय नगरकर,ओम चौधरी, तलाह सिद्दिकी, हर्षवर्धन महाजन टीम मॅनेजर हिदायत खाटीक सर*
*मॉडर्न पेटयथलॉन पुरूष अमेय नगरकर तलाह सिद्दिकी हर्षवर्धन महाजन ओम चौधरी आयान शेख महिला लाजरी खाचणे धनश्री जाधव जान्हवी महाजन टिम मॅनेजर सौ कुमुदिनी खाचणे, सौ दिपाली महाजन कोच गजानन महाजन रवींद्र चौधरी*
*ट्रायथलॉन महिला धनश्री जाधव टिम मॅनेजर राजीव जाधव*
 वरील स्पर्धेकरिता तांत्रिक पंच म्हणून  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या कडून *कमलेश नगरकर जयंत चौधरी सुरज दायमा**यांची निवड करण्यात आलेली आहे

Sunday, 27 November 2022

26-11 शहिदांना श्रद्धांजली अर्पण

(इंडिया365, अयाज मोहसिन)
:- सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे शहिदांना श्रद्धांजली -:
        भारताची आर्थिक तसेच  महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरावर आजच्या दिवशी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या दुष्ट सहकारी आतंकवाद्यांनी आज  भ्याड पणे हल्ला केलेला होता.  त्यात अनेक निष्पाप लोक तसेच भारत मातेचे वीर सुपुत्र, पोलीस या ठिकाणी देशाचे व देशवासीयांचे रक्षण करताना शहीद झालेले होते. 
          म्हणून 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली   अर्पित करण्यासाठी  आज सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे   संध्याकाळी 6:30 वाजता भीलपुरा चौकात  श्रद्धांजली  सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. 
          याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली  यांनी मनोगतात कशाप्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता व त्याला आपल्या वीर  जवानांनी कशाप्रकारे उत्तर दिलेले होते.   आपल्या वीर जवानांची शौर्यगाथा उपस्थित लोकांसमोर सांगितली.   तसेच अल्लाने फर्मविले आहे की जो कोणी एका निर्दोष व्यक्तीची हत्या करेल  त्याला संपूर्ण मानव जातीची हत्या केल्याचा पाप लागेल.  अशा अतिरेक्यांना नरकात  सुद्धा जागा भेटणार नाही असे  उपस्थितांना सांगितले. प्रसंगी पाकिस्तान व आतंकवाद्यांचा निषेध करण्यात येऊन   पेटत्या  मेणबत्त्या हातात घेऊन दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत  करकरे,  शहीद अशोक कामटे,  शहीद विजय साळसकर,  शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन,  शहीद तुकाराम  यांच्यासह निष्पाप शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
           याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली.   हाजी शेख सलीम उद्दीन,  डॉ.परीमल मुजुमदार,  शेख जलालुद्दीन,  सुरज गुप्ता,  शफी ठेकेदार,  मोहम्मद खान,  योगेश मराठे,  जावेद बागवान,  सलमान मेहबूब,  झिशान हुसैन,  नितीन शिंपी,  सय्यद वकार,  रहीम कुरेशी,  शेख शरीफ,  सत्तार शेख,   शाकीब  फारुख,  दानिश कुरेशी,  शेख ओवेश,  शेख अयान,  रिजवान लतीफ,  असलम नागोरी,  भिकन शिकलकर,  शफिक अहमद,  आरिफ मुनाफ,  अमित मुजुमदार,  रवींद्र खैरनार,  शेख नवाज,  इलियास बागवान,  शेख मुजम्मिल,  रहीम इस्माईल  यांसह नागरिक उपस्थित होते. 

फोटो :-  शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे  सदस्य. 

          

Tuesday, 22 November 2022

जळगाव येथे महाक्रिटीकॉन संपन्न..

(इंडिया365 न्यूज़,अयाज द इंडियन)
जळगाव मध्ये प्रथमच जळगाव क्रिटिकल केअर सोसायटी ने  महा क्रीटीकॉन २०२२ हि राज्य स्तरीय परिषद १८ ,१९ ,२०  नोव्हे  रोजी हॉटेल प्रेसिडेंट इथे आयोजित करण्यात आली.
१८ तारखेला एकच दिवशी ६ वेगवेगळे  कार्यशाळा घेण्यात आले.
त्यात सोनोग्राफी आणि इको इन  आय सी यू हे  कार्यशाळा   गवर्न मेंट मेडिकल कॉलेज इथे घेण्यात आले.
गर्भवती माता सिरीयस झाल्यावर तत्काळ कसे उपचार करून  आई  व बाळ कसे सुरक्षित राहील याचे प्रयत्न शिकविले. 
व्हेंटिलेटर सिस्टीम ,  याचे शिक्षण दिले.
सर्पदंश, विषबाधा यावर एक कार्यशाळा झाली .
ब्लड प्रेशर आणि नवीन तंद्रद्यान यावर एक कार्यशाळा झाली त्याचे डायरेक्टर डॉ शीला मित्रा या राज्यस्तरीय क्रिटिकल परिषदेच्या अध्यक्ष उपस्थित होत्या. डॉ जिगिशू दिवतिया हे राज्यस्तरीय भूलतज्ज्ञ परिषदेचे अध्यक्ष हे यावेळी उपस्थिती होते.
डॉ कपिल झिरपे ,डॉ शिवकुमार आयेर , डॉ राजेश पांडे ,डॉ बाळासाहेब बांडे,  डॉ प्रदीप  डी कोस्टा डॉ सुनील पांड्या  या मान्यवरांनी
६    कार्यशाळा एकच वेळी  वेगवेगळ्या ठिकाणी शेवटपर्यंत चालले..
दुसऱ्या दिवशी १९,२० या रोजी २दिवस सगळे  क्रिटिकल केअर मधील सगळे सेमिनार घेतले .
याला faculty he पुणे ,मुंबई ,लुधियाना ,हैद्राबाद , जम्मू काश्मीर , देल्ही ,सोलापूर कोल्हापूर  , औरंगाबाद ,नांदेड ,नारायणगाव , बारामती येथून डॉक्टर्स उपस्थिती होती.

ही राज्य परिषद
डॉ पराग चौधरी,डॉ सुनील सूर्यवंशी 
डॉ राजेश डlबी अध्यक्ष 
डॉ राहुल महाजन .उपाध्यक्ष
डॉ लीना पाटील . सेक्रेटरी 
डॉ रवींद्र पाटील सेक्रेटरी
खजिनदार - डॉ पल्लवी राणे.
डॉ अमित हीवरकर 

यांच्या टीम द्वारे पार पडली. 
सिनियर फिजिशियान डॉ के  डी पाटील , डॉ किरण मुठे
डॉ सुभाष चौधरी यांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभले .
परिषदेचे उद्घाटन 
डॉ उल्हास पाटील ,  डॉ  मारुती पोटे ( goverment medical collage ,)
यांच्या हस्ते झाले .
परिषदेला  डॉ सुनील चौधरी  
डॉ दीपक पाटील ,डॉ दिलीप पाटील ,डॉ राजेश मांवतकर 
डॉ हरणखेडकर , डॉ प्रकाश सुरवाडे , डॉ विनोद किणगे डॉ शशिकांत गाजरे ,  डॉ चेतन चौधरी ,डॉ अभय जोशी डॉ  फराज  बोहरी

डॉ कल्पेश गांधी ,डॉ सूयोग चौधरी , डॉ स्वप्नील चौधरी ,डॉ ललित पाटील ,डॉ अमित राजपूत,डॉ सोनाली महाजन , 

,डॉ प्रियिंका पाटील , डॉ ऋतुराज , डॉ दीपाली साठे, , डॉ संदीप भारुडे   ,डॉ धीरज चौधरी , डॉ नेहा भंगाळे, डॉ अमित भंगाळे ... डॉ सुवर्णा  जोशी ..डॉ गुणवंत महाजन  ,डॉ मनोज पाटील  यांनी वर्कं शॉप  coordinators  यांची मदत झाली ..
५०० हून अधिक वर्कशॉप आणि कॉन्फरन्स मध्ये रजिस्टर केले .आणि या परिषदे लाभ घेतला.
पेपर प्रेझेंटेशन -२५ जणांनी केला
पोस्टर  प्रेझेंटेशन २७  जणांनी  केले.
ऑर गन डोनेशन स्की ट शो डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज  येथील  इन्टरन  आणि  आय एस सी सी एम  चे डॉक्टर्स  डॉ रवी गावात (जुपितर हॉस्पिटल मुंबई )यांनी पार पडला..त्यावेळी आय एम ए अध्यक्ष - डॉ दीपक आठवले
सेक्रेटरी - डॉ जितेंद्र कोल्हे हे उपस्थित.होते .
यावेळी जळगावमधील महिलेचे जीचे ब्रेन डेड म्हणून औरंगाबाद मघे नेऊन सगळे ऑर्गन डोनेशन साठी पाठवले त्यांचे पती व वडील यांचे आभार मानले..
मेडी को लीगल पॅनल च्या सेमिनार मध्ये आपले जळगाव जिल्ह्यातील  एस पी..आर राजकुमार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Thursday, 13 October 2022

अबब मंडळ अधिकाऱ्याने मागितली 2 लाखाची लाच,पण अडकला..

*==*  *प्रेसनोट* *==*
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* जळगाव.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-30
रा.अमळनेर ,ता.अमळनेर, जि.जळगाव.
▶️ *आलोसे-*  
*१)* गणेश राजाराम महाजन,वय-४६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर. रा.नविन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव जि.जळगाव  वर्ग-३
*२)* दिनेश आनंद सोनवणे, वय-४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी,अमळनेर रा.फरशी रोड,अमळनेर. ता.अमळनेर जि.जळगाव. वर्ग-3                                                                                        
▶️ *लाचेची मागणी-* 2,00,000/-रुपये तडजोडीअंती 1,50,000/-रुपये.
▶️ *लाच स्विकारली-* 1,50,000/-रु.
▶️ *हस्तगत रक्कम-* 1,50,,000/-रू.
▶️ *लाचेची मागणी -* दि.12/10/2022 
▶️ *लाच स्विकारली-* दि.13/10/2022
▶️  *लाचेचे कारण -*.  
तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.MH18 AA 1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते. सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या  मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.1 व 2 यांनी पंचासमक्ष 1,50,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम 1,50,000/-रुपये आरोपी क्रं.1 यांनी तलाठी कार्यालय अमळनेर येथे पंचांसमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा.              
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी-* 
श्री.शशिकांत एस.पाटील,पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
▶️ *तपास अधिकारी-* 
एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक, 
अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
▶️ *सापळा व मदत पथक-*  
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी.
▶️ *मार्गदर्शक-* 
*1)* मा.श्री.सुनिल कडासने साो, 
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. 
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* 
*1)* आलोसे क्रं.1 यांचे सक्षम अधिकारी 
मा.उपविभागीय अधिकारी साो, अमळनेर विभाग,अमळनेर.          
*2)* आलोसे क्रं.2 यांचे सक्षम अधिकारी 
मा.जिल्हाधिकारी सो,जळगाव.
-----------------------------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.  अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव.
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
===================

Sunday, 11 September 2022

क्या होते है 'उर्दु घर'-जलगांव मे भी उर्दु घर की मांग...

उर्दु घर म्हणजे काय?
क्या होते है उर्दु घर?
जलगांव मे भी हो उर्दु घर....
(अयाज़ मोहसिन,चिफ एडिटर "इंडिया365" की रिपोर्ट,सूत्र महाराष्ट्र सरकार)

*महाराष्ट्रातील उर्दू घरे*

भारतात जन्मलेल्या आणि त्यामुळे अस्सल भारतीय असलेल्या उर्दू भाषेची वाङमयीन प्रगती व्हावी, तसेच मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण वाढावी यासाठी राज्यामध्ये ४ उर्दू घरांची निर्मिती करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या या उपक्रमाविषयी माहिती देणारा हा विशेष लेख...

००००

बात करनेका हसीं तौर-तरीक़ा सीखा, हमने उर्दूके बहानेसे सलीक़ा सीखा...

उर्दू भाषेचे वर्णन करताना कवी मनीश शुक्ला यांनी हा शेर रचला आहे. उर्दू ही एक अतिशय गोड भाषा मानली जाते. भारतीय साहित्याच्या विकासात उर्दू भाषेने बहुमोल असे योगदान दिले आहे. मुळात उर्दू भाषेचा जन्म भारतातच झालेला असल्याने ही एक अस्सल भारतीय भाषा आहे. महाराष्ट्रामध्येही उर्दू भाषेचा मोठा प्रभाव असून विशेषतः  बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीमध्ये उर्दू भाषेने आपल्या रसाळ वाणीने गोडवा आणला आहे. मराठवाडा, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये उर्दू भाषेच्या रसिकांची संख्या फार मोठी आहे. अशा या रसाळ उर्दू भाषेची वाङमयीन प्रगती व्हावी, तसेच मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाण-घेवाण वाढावी यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येतात. उर्दू भाषेच्या विकासासाठी एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील काही उर्दू भाषिकबहुल शहरांमध्ये उर्दू घर उभारण्यात येत आहेत.

सद्य:स्थितीत नांदेड, मालेगाव, सोलापूर आणि नागपूर येथे उर्दू घरे उभारण्यात येत आहेत. नांदेड आणि मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण झाले असून सोलापूर उर्दू घराचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागपूर उर्दू घराचे काम सुरु आहे. नांदेड उर्दू घराचे उद्घाटनही करण्यात आले आहे. या उर्दू घरामध्ये कॉन्फरन्स हॉल, वाचनालय, क्लासरुम, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १ कक्ष, पाहुण्यासांठी २ कक्ष तसेच १ ग्रीन रुम बांधण्यात आलेली आहे.

या घरांचा वापर, देखभाल, दुरुस्ती तसेच ती सुस्थितीत ठेवण्यासाठी धोरण आखण्यात आले असून सविस्तर नियमावली जारी करण्यात आलेली आहे. उर्दू घराच्या इमारती या राज्य शासनाच्या मालकीच्या राहतील, उर्दू घराचे नियंत्रण व व्यवस्थापन संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले उपजिल्हाधिकारीपेक्षा कमी नाही अशा दर्जाचे अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले आहे. 

उर्दू घरांचा वापर हा प्रामुख्याने व प्राधान्याने उर्दू भाषेचा प्रसार व विकास, उर्दू साहित्याचा व कलात्मतेचा प्रसार व विकास, नाट्य, शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य व त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी करण्यात यावा. इतर वेळी संबंधित जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने उर्दूशिवाय अन्य भाषांच्या साहित्यिक व सांस्कृतिक स्वरुपाचे कार्यक्रम घेण्यासाठी उर्दू घराचा वापर करता येईल, असेही धोरण निश्चित करण्यात आले आहे. उर्दू भाषा, मराठी भाषा आणि इतर भाषांमध्ये देवाण-घेवाण वाढावी, हा यामागे उद्देश आहे. उर्दू घरांमध्ये आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समिती तसेच प्राधिकृत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे.

उर्दू घरांमध्ये वर्षातील अधिकाधिक दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रम इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय/ ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील. नवी दिल्ली येथील नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण, अभ्यासक्रम चालविण्यासाठी काऊन्सिलकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविण्याचे प्रयत्न केले जातील. त्या अनुदानातून काऊन्सिलमार्फत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या धर्तीवर उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी उर्दू घरामध्ये वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न केले जातील.

कोणत्याही परिस्थितीत उर्दू घराचा वापर राजकीय, खाजगी किंवा धार्मिक उद्दीष्टांकरिता करण्यात येणार नाही, असे निदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाकरिता उर्दू घर प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यासाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही. तसेच उर्दू भाषा व उर्दू साहित्याशी संबंधित कार्यक्रमांकरिता सवलतीचे दर आकारण्यात येतील, असे धोरण निश्चित करून तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

भाषा ही नेहमीच समाजाला जोडण्याचे काम करते. उर्दू भाषेने आपल्यातील गोडवा, इतरांप्रती व्यक्त होणारा आदरभाव अशा अनेक गुणांनी इतर भाषिक लोकांच्या मनातही स्थान निर्माण केले आहे. उर्दू भाषा, त्यातील गजला, शेरोशायरी लोकांना नेहमीच आवडतात, सर्वच भाषकांची याला नेहमीच दाद मिळते. त्यामुळे उर्दू भाषेने देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यालाच अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक विकास विभागामार्फत उर्दू घरांची निर्मिती करून या भाषेच्या विकासाला तसेच मराठी-उर्दूची देवाणघेवाण वाढविण्याला चालना देण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये उभी राहत असलेली ही ४ उर्दू घरे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक विकासात बहुमोल योगदान देतील, असे निश्चितपणे वाटते.

शेवटी अशोक साहिल यांच्या उर्दू भाषेविषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या या शायरीने या लेखाचा समारोप करतो. ते म्हणतात - 
उर्दूके चंद लफ़्ज़ हैं जबसे ज़बान पर, तहज़ीब मेहरबाँ है मेरे ख़ानदान पर...

००००