Friday, 14 May 2021

अब्बू ईद के दिन भी कम्प्युटर से चिपके


 युनुसची मुलगी ॲनी म्हणाली, *ईद के दिन भी अब्बू कंप्युटर पे लगे रहते है*


*अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील युनुस शहा यांची सलग दुसरी ईदही कर्तव्य पाळून साजरी*


(संकलन-अयाज मोहसिन, इंडिया365 लाईव्ह) 9273403088.


अमरावती--- अब्बू जब देखो तब कंप्युटरपे लगे रहते है… कोरोना साथीच्या काळात गत वर्षापासून सतत कार्यरत असलेल्या युनुस शहा यांची ॲनी अस्मिर ही चार वर्षांची चिमुकली सांगत होती. कोरोना साथीच्या काळात आयसीएमआर व आरोग्य यंत्रणेसाठी डेटा संकलनाची व समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्‍या युनुस शहा यांची सलग दुसरी ईदही कर्तव्य पाळून साजरी झाली.

श्री.शहा हे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत आहेत. कोविडबाधितांवरील उपचारांना गती देण्याबरोबरच आरोग्य यंत्रणेचे काम विविध पातळ्यांवर सुरु असते. सीएस ऑफिसमधील सहकाऱ्‍यांना कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल वेळोवेळी मिळवणे, याद्या तयार करणे, त्यासाठी लॅब, रुग्णालये व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय राखणे, आयसीएमआर पोर्टलसाठी डेटा संकलन करणे, त्यात वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेऊन तशा नोंदी घेणे अशी अनेकविध कामे अव्याहतपणे करावी लागतात.

दवाखान्यात नवे रूग्ण येणे, नव्या चाचण्या, नवे निष्कर्ष प्राप्त होणे, नव्याने काही दुरुस्त्या कराव्या लागणे हे सातत्याने सुरुच असते. या सगळ्या नोंदी त्या-त्या वेळीच घ्याव्या लागतात. त्यामुळे थांबून चालत नाही. सगळ्या बाबी नीट लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे मी व माझ्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या वाटून घेतल्या. गौरव इंगळे, शिवानी गहलोत, अविनाश शेंडे, साखरकर मॅडम, श्रीकांत शहाणे, दीपक लकडे, विशाल काळे, अनिकेत खाडे असे अनेक सहकारी कोविड रिपोर्टिंग सेंटरमध्ये अविरत कार्यरत आहेत…युनुस शहा सांगत होते.

डेटा अपडेशन सतत सुरु असते

जे काम जी व्यक्ती करत असते, तिने एक दिवसही थांबून चालत नाही. कारण, त्याच्या वर्गीकरणाच्या पद्धती, आयसीएमआरचे नियम, रुग्णालयांची माहिती व समन्वय प्रक्रिया याबाबतची अनेकविध प्रकारची माहिती ते काम नित्य करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यालाच अधिक चांगले अवगत असते. साथीच्या या काळात हे काम अधिकाधिक निर्दोष होणे आवश्यक आहे.  त्यामुळे रजा घेता येत नाही व अनेक कामे एकहातीही करावी लागतात. सायंकाळी ऑफिस सोडले तरी घरी गेल्यावर उशिरापर्यंत काम सुरूच असते. सकाळी उठल्यावरही माहिती अपडेशनचे काम सुरु होते.

घरी गेल्यावर कुटुंबासोबत असतो, मात्र, कार्यालयीन काम सुरुच ठेवावे लागते. मध्ये मध्ये मुलांशी खेळायला वेळ मिळतो. युनुसला ॲनी अस्मिर ही चार वर्षांची मुलगी व दीड वर्षांचा अकदस हा मुलगा आहे. आज मुलांसोबत राहून पण आपले कार्यालयीन कर्तव्य पूर्ण करून युनुसने ईद साजरी केली. अब्बू जब देखो तब कंप्यूटर पे लगे रहते है, अशी त्याच्या चिमुकलीची तक्रार आहे.

Monday, 19 April 2021

फुफ्फुस सोपी टेस्ट

 *फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती*


मुंबई, दि. १९: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

*चाचणी कोणी करावी*

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात. 

*अशी करावी चाचणी*

ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.

सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.

*चाचणीचा निष्कर्ष*

जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्या सारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. 

ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये, ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालुन ही चाचणी करू शकतात.


Friday, 2 April 2021

रेमदेसीविर-MRP वर विकू नये

 रेमदेसीविर इंजेक्शन संदर्भात होणारा काळाबाजार,कृत्रिम टंचाई,साठेबाजी थांबविण्या बाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिशानिर्देश नव्याने 3 एप्रिल रोजीजारी केले आहेत

*आता रेमदेसीविर इंजेक्शन पेशन्ट ला विकताना नेट प्राईस+10 टक्के,फक्त इतक्या मर्यादेतच विकता येईल*

1) होलसेलर विक्रेत्यांनी रेमदेसीविर, Tosilizumab,Itiizumab विकतांना सरकारी कोविड सेंटर,जिल्हा शल्य चिकित्सक (C.S.) यांनी मान्यता दिलेले कोविड सेंटर, यांना प्राधान्य देण्यात यावे.परवाना धारक औषध विक्रेते,शासन मान्य वैद्यकीय व्यवसयी यांनाच पुरवठा करावा.


2)शासनमान्य वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर च्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खासगी व्यक्ती ला सदर इंजेक्शन विकू नये.


3) सदर औषधे यांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी,औषध होलसेल आणि रिटेल यांनी घ्यावी.

रेमदेसीविर विक्रीवर लागला प्रोटोकॉल

 रेमदेसीविर इंजेक्शन संदर्भात होणारा काळाबाजार,कृत्रिम टंचाई,साठेबाजी थांबविण्या बाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिशा निर्देश जारी केले आहेत

1) होलसेलर विक्रेत्यांनी रेमदेसीविर, Tosilizumab,Itiizumab विकतांना सरकारी कोविड सेंटर,जिल्हा शल्य चिकित्सक (C.S.) यांनी मान्यता दिलेले कोविड सेंटर, यांना प्राधान्य देण्यात यावे.परवाना धारक औषध विक्रेते,शासन मान्य वैद्यकीय व्यवसयी यांनाच पुरवठा करावा.


2)शासनमान्य वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर च्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खासगी व्यक्ती ला सदर इंजेक्शन विकू नये.


3) सदर औषधे यांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी,औषध होलसेल आणि रिटेल यांनी घ्यावी.


Friday, 5 March 2021

अरे बापरे -772 पॉजिटिव...

इंडिया365--हार्ट ब्रेकिंग न्यूज़,

दूसरी लहर में मचा कहर,

जिले में 772 (जलगांव शहर 266+93=359)

सतर्क हो जाओ,जिला वासियो,चैन की नींद सोना है तो जाग जाओ...


दूसरी लहर के सबसे बड़े पोजटिव आंकड़े

Sunday, 22 November 2020

डॉ. उल्हास पाटिल यांचा विशेष सन्मान..

*डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालया चे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांचा गौरव*

 जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात चालवली जाणारी एकमेव वैद्यकीय संस्था म्हणून  डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय असून कोविड या महामारी मध्ये शासनाला १००℅ सहाय्य करणारी ती एकमेव वैद्यकीय संस्था ठरली असून त्याच सोबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुद्धा कार्य त्यांनी हाताळले व रुग्णांना सेवा दिली त्याबद्दल अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांचा जळगाव कोविड केअर युनिट व नशिराबाद मन्यार बिरादरी तर्फे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


 *कोविड , नॉन कोविड व सामान्य रुग्णालयाची जबाबदारी* 


मार्च महिन्यात अकस्मातपणे लॉक डाऊन घोषित झाल्यावर कोविंड संशयास्पद व पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असताना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे अपूर्ण पडल्याने व इतर खाजगी रुग्णालयांनी शासनाला असहकार्य दर्शीवल्याने  तत्कालिन जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव चे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्वरित जळगावकरांच्या सेवेसाठी सदर महाविद्यालय व तेथील स्टाफ उपलब्ध असून त्यांनी त्वरित सेवा देण्याची तयारी दर्शविली त्या दिवसा पासून आज पर्यंत डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड रुग्णा सोबतच नॉन कोविड व जिल्हा सामान्य रुग्णालयाची भूमिका पार पाडत आहे.


 *शासनाचे देयके अद्याप थकीत*

 सर्वसामान्यांचा एक गैरसमज आहे की कोविड अथवा इतर रुग्णां बाबत शासनाच्या विविध योजना आहेत त्या माध्यमाने त्वरित अनुदान मिळते परंतु महात्मा गांधी फुले योजना असो अथवा इतर मंजुरी मिळाल्यानंतर सुमारे एक ते दीड महिन्याच्या आत पेमेंट मिळते परंतु आपण बघितले की आजही शासनाच्या खर्चामध्ये आरोग्य विभागावर महाराष्ट्र शासनाचे खर्चाचे प्रमाण तिसऱ्या क्रमांकावर आहे याचा अर्थ त्यांनी वैद्यकीय संस्थांना अद्याप शासनाने अनुदान दिलेले नाही किंवा कमी प्रमाणात दिलेले असावे त्यामुळे डॉक्टर उल्हास पाटील महाविद्यालयाला सुद्धा पूर्णपणे अनुदान मिळालेले नाही.


 *रुग्णांची सेवा हेच माझे कर्तव्य -डॉक्टर पाटील*

  शनिवारी जळगाव कोविड केअर युनिट चे संस्थापक समन्वयक फारुक शेख, औशोधोपचार वाटप समितीचे प्रमुख अतिक शेख,  नशिराबाद  बिरदारीचे प्रमुख रियाज शेख व इस्माईल शेख यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलला जाऊन पाहणी, तपासणी व रुग्णां सोबत चर्चा केली असता जे खरोखरच गरीब रुग्ण होते परंतु त्यांच्याकडे योजने च्या माध्यमातून  खर्च करण्या साठी कागदपत्र नसल्यामुळे अथवा त्या कागदपत्रात तांत्रिक दुरुस्तीमुळे ते योजनेपासून वंचित राहिल्याने त्यांना खर्च करणे परवडत नव्हते म्हणून डॉक्टर उल्हास पाटील यांची भेट घेतल्यावर त्यांनी त्वरित त्या तिन्ही  लहान बाळा ची फी  माफ केली.


 *योजने च्या सवलती साठी कागदपत्र जवळ बाळगा*


 आजही समाजातील गोरगरीब व्यक्तींकडे रेशन कार्ड व आधार कार्ड नाही असल्यास त्यावर आडनाव नावांमध्ये तफावत किंवा पत्ता बदललेला असतो त्यामुळे त्या योजनेत रुग्णाला सवलत मिळत नाही.

वैद्यकीय महाविद्यालय व  हॉस्पिटल चालवण्यासाठी पैशांची सुद्धा गरज असल्याने डॉक्टर पाटील वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा पैसे आकारते त्या मुळे समाजात गैरसमज निर्माण होतो म्हणून जेव्हा आम्ही डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा ज्या ठिकाणी योजनेला शासकीय मान्यता आहे त्या ठिकाणी जाताना आपल्याजवळ आधार कार्ड रेशन कार्ड न चुकता घेऊन जाणे असे आवाहन सुद्धा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केलेले आहे.


फोटो

डॉ उल्हास पाटील यांचा गौरव कर त्यांना फारुक शेख सोबत डावीकडून इस्माईल शेख रियाज शेख अतीक शेख व जाकिर मौजन आदी दिसत आहे

Sunday, 18 October 2020

प्रत्येक वेळी डॉक्टरच चुकीचे असतात काय??

 *हा सूर्य हा जयद्रथ..*


*डॉ. उल्हास पाटिल यांचा त्वरित प्रतिसाद व पाठपुरावा...*


*गोदावरी मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलबद्दल मिळालेली माहिती निघाली चुकीची...*


*पत्रकारितेत आला विचित्र अनुभव,मात्र अनुभवानेच वाचवली संभाव्य चूकीची बातमी..*


कदाचित, प्रत्येक वेळेस डॉक्टर आणि रुग्णालयच चुकीचे असेल अशे नाही....


न घडलेली बातमी-

(✒️अयाज मोहसिन,रिपोर्टर 'न्यूज24' चॅनल)

----------------------------

आज दुपारी एका नॉनकोविड रुग्णा संदर्भात फोन आला की ,एक रुग्ण काल पासून गोदावरी फौंउडेशन संचलित 'डॉ.उल्हास पाटिल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल'मध्ये मृत झालेला आहे मात्र रुग्णाची परिस्थिती हलाखीची असल्याने 60,000 रु बिल भरण्याची क्षमता त्याच्या कुटुंबियांकडे  नाही,पैसे नसल्याने रुग्णालय व्यवस्थापन पेशन्ट चे पार्थिव देण्यास टाळाटाळ करित आहे.


खरं बघितलं तर कोविड च्या या महासंकट काळात ही मोठी ब्रेकिंग न्यूज ठरली असती मात्र पत्रकारिता नितीमूल्या नुसार माहिती ची शहानिशा करणे अत्यावश्यक होते.यासंदर्भात माहिती घेण्यासाठी डॉ उल्हास पाटिल यांना कॉल लावला.डॉक्टरांनी सांगितले की लगेच फॉलोअप घेऊन कॉल बॅक करतो.थोड्या वेळात जनसंपर्क अधिकारी राहुल कुळकर्णी यांचा सुध्दा फोन आला की 2 मिनिटात सर्व माहिती देतो.त्यानुसार  डॉ उल्हास पाटिल यांचा फोन आला,त्यांनी स्वतः संबंधित रुग्णाबद्दल,त्या वार्डात कार्यरत असलेले डॉक्टर यांच्याशी चर्चा केली असता धक्कादायक माहिती मिळाली की सदर रुग्ण हा जिवंत असून,तो कालच मेला ही माहिती पुर्णतः चुकीची आहे,शिवाय रुग्ण गंभीर जरी असला तरी त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत याची कल्पना नातेवाईकाना वेळोवेळी दिली जात आहे.तुम्ही स्वतः रुग्णालयात येऊन शहानिशा करू शकता...


हे ऐकून मी चकित झालो, कारण जी माहिती मला मिळाली होती ती अगदीच उलट होती.कदाचित बातमी 'ब्रेक' करण्याच्या उत्साहात न्यूज लावली गेली असती तर चुकीचा संदेश गेला असता,मात्र अनुभव अशावेळी कामी आला की थोडा वेळ उशीर झाला तरी चालेल मात्र शहानिशा न करता चुकीची बातमी लागायला नको.शिवाय डॉ उल्हास पाटिल यांनी त्वरित दखल घेत,लगेच प्रतिसाद दिल्याने गैरसमज दूर झाला.. *हा सूर्य,हा जयद्रथ*.

यानिमित्ताने पुन्हा एकदा  पत्रकारितेच्या त्या गुरुवर्यांचे स्मरण झाले ज्यांनी पत्रकारिता शिक्षणा दरम्यानच हे शिकविले होते की कुठलीही बातमी ही एकांगी न लावता योग्य ती परिपूर्ण माहिती घेऊन तसेच नैसर्गिक न्याय हक्काने दुसऱ्या बाजूला सुध्दा खुलासा सादर करण्याची पुरेपूर संधी द्यावी,हे बाळकडू पुन्हा अनुभवास आले..


कदाचित, प्रत्येक वेळेस डॉक्टर आणि रुग्णालयच चुकीचे असेल अशे नाही....